बोडो ही भारत देशाच्या आसाम राज्यामधील एक भाषा आहे. ही भाषा बोडो जमातीचे सुमारे १३ लाख लोक वापरतात.

बोडो
बड़ो
स्थानिक वापर भारत
प्रदेश आसाम
लोकसंख्या १३ लाख
भाषाकुळ
चिनी-तिबेटी
लिपी देवनागरी
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर भारत
भाषा संकेत
ISO ६३९-३ brx[मृत दुवा]
बोडो नृत्य

भारताच्या संविधानामधील आठव्या अनुसूचीनुसार बोडो ही भारताच्या २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे.

बोडो हा चिनी-तिबेटी भाषासमूहातील भाषांचा आसामातला गट आहे. बोडो गटात गारो, त्रिपुरी व मीकीर याही महत्त्वाच्या बोली आहेत. बोडो भाषेतील उपसर्ग किंवा प्रत्यय अत्यंत तोकडे असून भाषिक परिवर्तनात बोडो गटातील बोलींचे बहुतेक सर्व उपसर्ग नष्ट झाले आहेत. केवळ क्रियापदांचे कारक किंवा सकर्मक रुपदर्शक फ-किंवा प-हा उपसर्ग तग धरून आहे.[]

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ ना.गो. कालेलकर. बोडो भाषा. मराठी विश्वकोश (वेब ed.). महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ. २५ फेब्रुवारी २०१४ रोजी पाहिले.

हे सुद्धा पहा

संपादन