नंदुरबार जिल्हा

भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा.


हा लेख नंदुरबार जिल्ह्याविषयी आहे. नंदुरबार शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या

नंदुरबार जिल्हा
नंदुरबार जिल्हा
महाराष्ट्र राज्याचा जिल्हा

२१° १३′ ४०.८″ N, ७४° ०८′ ३१.९२″ E

देश भारत ध्वज भारत
राज्य महाराष्ट्र
मुख्यालय नंदुरबार
क्षेत्रफळ ५,०३५ चौरस किमी (१,९४४ चौ. मैल)
लोकसंख्या १३,०९,१३५ (२०११)
लोकसंख्या घनता २६० प्रति चौरस किमी (६७० /चौ. मैल)
साक्षरता दर ४६.६३%
लोकसभा मतदारसंघ नंदुरबार (लोकसभा मतदारसंघ)
विधानसभा मतदारसंघ अक्कलकुवानंदुरबारनवापूरशहादा
खासदार हिना गावित (भाजपा)
संकेतस्थळ

नंदुरबार जिल्हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे. नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती सन १९९८ मध्‍ये झाली. त्यापूर्वी हा जिल्हा धुळे जिल्ह्याचा एक भाग होता. मात्र विकासाच्या दृष्टीने व प्रादेशिक समतोल याच्या दृष्टीने नंदुरबार हा स्वतंत्र जिल्हा करण्यात आला आदिवासींची मोठी संख्या या जिल्ह्यामध्ये आहे

चतुःसीमासंपादन करा

नंदुरबार जिल्ह्याला दोन राज्यांच्या सीमा लाभल्या आहेत. गुजरात राज्य वायव्य सीमेवर, तर मध्य प्रदेश राज्य जिल्ह्याच्या ईशान्य सीमेवर आहे. सीमा भागातील काही गावे (उदा. खेडदिगर व खेतिया) ही महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश ह्या दोन्ही राज्यांत विभागली गेली आहेत. आर्थिक दृष्ट्या मागासलेला हा जिल्हा आहे बहुसंख्य आदिवासी समाज या जिल्ह्यांमध्ये स्थायिक असलेला दिसून येतो विकासाच्या दृष्टीने सर्वतोपरी आर्थिक मदत शासनाकडून या जिल्ह्यासाठी देण्यात आलेली आहे

जिल्ह्यातील तालुकेसंपादन करा

पर्यटनसंपादन करा

 
यशवंत तलाव
  • तोरणमाळ हे सातपुड्यातील थंड हवेचे ठिकाण आहे. तेथे यशवंत तलाव व सिताखईची दरी आहे आणि एक धबधबाही आहे.
  • उनपदेव-सुनपदेव (शहादा तालुका) येथे गरम पाण्याचे झरे आहेत.
  • प्रकाशा हे शहादा मधील शंकराचे जागृत देवस्थान आहे, हे तापी नदीच्या काठावर वसलेले आहे.

इतरसंपादन करा

नंदुरबार हा आदिवासीबहुल जिल्हा असून येथील लोकसभा व [विधानसभा]] मतदार संघ हे अनुसूचित जमाती साठी राखीव आदिवासी मतदार संघ आहेत.

जमाती :-

भिल्ल, पावरा, टोकरे कोळी ,कोकणा-कोकणी,गावित, पारधी,मावची, इत्यादी प्रमुख आदिवासी जमाती आहेत.EKLAYA SCHOOL IN NANDURBAR