भारतात देशात ३४० ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत. त्यांपैकी २३२ झरे पुढील राज्यांत आहेत. (कंसात राज्यातील झऱ्यांची संख्या) :

  • अरुणाचल प्रदेश (३१)
  • आंध्र प्रदेश (२५)
  • उत्तराखंड (६२)
  • ओरिसा (५)
  • गुजरात (२१)
  • जम्मू काश्मीर (३०)
  • महाराष्ट्र (२८)
  • हिमाचल प्रदेश (३०).

महाराष्ट्रातील २८ झऱ्यांपैकी १८ कोकणात आहेत.

गरम पाण्याचे झरे असलेली महाराष्ट्रातील ठिकाणे

संपादन

वीज निर्मिती

संपादन

गरम पाण्याच्या उष्णतेपासून प्रदूषणविरहित वीजनिर्मिती करता येते. जगातील अमेरिका, जपान, इटली आदी २५ देशांमध्ये या तंत्रज्ञानाद्वारे वीजनिर्मिती सुरू आहे. देशात कोळसा, पवनचक्की अणुऊर्जा प्रकारांतून वीजनिर्मिती केली जाते; परंतु गरम पाण्याच्या उष्णतेपासून वीजनिर्मिती करणे खर्चिक असल्याने ती केली जात नाही.

कोकणात १८ ठिकाणी अशा प्रकारची वीजनिर्मिती करता येऊ शकेल. सध्या संगमेश्वर तालुक्यातील राजवाडी (रत्‍नागिरी जिल्हा)येथे तीन मेगावॉटचा भू औष्णिक प्रकल्प उभारण्याचा विचार चालू आहे.

पर्यटन

संपादन

गरम पाण्याचे झरे असणारी ठिकाणे सध्या पर्यटन क्षेत्रे म्हणून प्रसिद्ध आहेत. तेथे गरम पाण्यावर आधारित छोटे प्रकल्पही उभारता येतात.

हे सुद्धा पहा

संपादन