खासदार

संसदेचा सदस्य

संसदेच्या सदस्यांना (Member of Parliament) खासदार किंवा संसद सदस्य म्हणतात. भारतात संसदेची दोन सदने/सभागृहे आहेत — राज्यसभालोकसभा. संसदेमध्ये जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्ती लोकसभेचे सदस्य असतात तर राज्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्ती राज्यसभेच्या सदस्य असतात. या दोन्ही गृहांतील सदस्यांना खासदार किंवा संसद सदस्य असे म्हणतात.

लोकसभेतील खासदार

संपादन

भारताच्या राज्यघटनेप्रमाणे लोकसभेचे सध्या ५४३ सदस्य आहेत. यामधील ५३० सदस्य भारताच्या राज्यांचे प्रतिनिधी आहेत, १३ पर्यंत सदस्य केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी आहेत. पूर्वी २ सदस्य ॲंग्लो-इंडियन समाजाचे प्रतिनिधी होते.

लोकसभेच्या खासदारांचा कार्यकाळ हा सहसा ५ वर्षांचा असतो‌. हा काळ आणीबाणीच्या काळात वाढविता येतो. सध्या लोकसभेत उत्तर प्रदेश राज्यात सर्वाधिक ८० खासदार आहेत, तर महाराष्ट्रात ४८ आहे.

राज्यसभेतील खासदार

संपादन

राज्यसभेत २४५ खासदार असून त्यापैकी २३३ खासदार राज्यांच्या विधीमंडळातील सदस्यांद्वारे निवडले जातात, तर कला, साहित्य, सामाजिक कार्य, इ. क्षेत्रांमधून १२ सदस्य हे राष्ट्रपतींद्वारे नियुक्त करण्यात येतात‌. राज्यसभेचे खासदार राज्यांचे व त्यांच्या हक्कांचे प्रतिनिधित्व करतात. राज्यसभेत दर दोन वर्षांनी एक तृतीयांश खासदार निवृत्त होतात. राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ हा सहसा ६ वर्षांचा असतो‌.[]

राज्यानुसार खासदारांची संख्या

संपादन
राज्य लोकसभा खासदारांची संख्या राज्यसभा खासदारांची संख्या
अंदमान आणि निकोबार लागू नाही
आंध्र प्रदेश २५ ११
अरुणाचल प्रदेश
आसाम १४
छत्तीसगड ११
बिहार ४० १६
चंदिगढ लागू नाही
दादरा आणि नगर-हवेली लागू नाही
दमण आणि दीव लागू नाही
गोवा
गुजरात २६ ११
हरियाणा १०
हिमाचल प्रदेश
जम्मू काश्मीर
झारखंड १४
कर्नाटक २८ १२
केरळ २०
लक्षद्वीप लागू नाही
मध्यप्रदेश २९ ११
महाराष्ट्र ४८ १९
मणिपूर
मेघालय
मिझोरम
नागालॅंड
राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली
ओरिसा २१ १०
पुदुच्चेरी
पंजाब १३
राजस्थान २५ १०
सिक्कीम
तमिळनाडू ३९ १८
तेलंगणा १७
त्रिपुरा
उत्तरप्रदेश ८० ३१
उत्तराखंड
पश्चिम बंगाल ४२ १६

हे सुद्धा पहा

संपादन
  1. ^ "तुम्हीही होऊ शकता राज्यसभा सदस्य, अशी असते प्रक्रिया". divyamarathi. 2019-06-27 रोजी पाहिले.