अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ

अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ - १ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, अक्कलकुवा मतदारसंघात नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा आणि अक्राणी तालुक्यांचा समावेश होतो. अक्कलकुवा हा विधानसभा मतदारसंघ नंदुरबार लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जमातीच्या (ST) उमेदवारांसाठी राखीव आहे.[][]

२०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूकद्वारे निवडून आल्यानंतर शिवसेना पक्षाचे आमश्या फुलजी पाडवी हे अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. आमदारकीचा सध्या त्यांचा हा पहिला वहिला कार्यकाळ सुरू आहे.

मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती

संपादन

अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात खालील परिसरांचा समावेश होतो :

  • अक्कलकुवा तालुका
  • अक्राणी तालुका

अक्कलकुवा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार

संपादन
वर्ष आमदार[] पक्ष
२००९ पूर्वी : तळोदे विधानसभा मतदारसंघ आणि अक्राणी विधानसभा मतदारसंघाचा भाग
२००९ ॲड. कागडा चंद्या पाडवी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२०१४
२०१९
२०२४ आमश्या फुलजी पाडवी शिवसेना

निवडणूक निकाल

संपादन

२००९ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

संपादन
२००९ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ॲड. कागडा चंद्या पाडवी ५२,२७३ ३६.४८%
अपक्ष विजयसिंग रूपसिंग पराडके ४९,७१४ ३४.६९%
अपक्ष नरेंद्रसिंग भगतसिंग पाडवी २५,२३८ १७.६१%
अपक्ष हेमंत भिका वाळवी ६,७४१ ४.३२%
शिवसेना मंगलसिंग कोमा वाळवी ६,१८४ ४.३२%
बहुजन समाज पक्ष अभिजीत अत्या वसावे ३,१५१ २.२%
बहुमत २,५५९ १.७९%
झालेले मतदान १,४३,३०१ ६८.३९%
नोंदणीकृत मतदार २,०९,५२१
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने जागा जिंकली (नवीन जागा) उलटफेर

२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

संपादन
२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ॲड. कागडा चंद्या पाडवी ६४,४१० ३६.७९% ०.३१%
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विजयसिंग रूपसिंग पराडके ४८,६३५ २७.७८% ६.९१%
भारतीय जनता पक्ष नागेश दिलवारसिंग पाडवी ३२,७०१ १८.६८%
शिवसेना आमश्या फुलजी पाडवी १०,३४९ ५.९१%
अपक्ष नरेंद्रसिंग भगतसिंग पाडवी ७,९०५ ४.५१% १३.१%
नोटा ४,१६१ २.३८%
महाराष्ट्र नवनिर्माण सेना ममता रविंद्र वाळवी २,०२६ १.१६%
अपक्ष मदन जहांगीर पाडवी १,९६१ १.१२%
अपक्ष मधुकर शामसिंह पाडवी १,७६६ १.०१%
बहुजन मुक्ती पक्ष ॲड. रणजित जुगला पाडवी १,१७८ ०.६७%
बहुमत १५,७७५ ९.०१% ७.२२%
झालेले मतदान १,७५,०९२ ७०.८७% २.४८%
नोंदणीकृत मतदार २,४७,०७०
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने जागा राखली उलटफेर

२०१९ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

संपादन
२०१९ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ॲड. कागडा चंद्या पाडवी ८२,७७० ४१.२६% ४.४७%
शिवसेना आमश्या फुलजी पाडवी ८०,६७४ ४०.२१% ३४.३०%
अपक्ष नागेश दिलवारसिंग पाडवी २१,६६४ १०.८०% ७.८८%
नोटा ४,८५७ २.४२% ०.०४%
आम आदमी पक्ष ॲड.कैलास प्रतापसिंह वसावे ४,०५५ २.०२%
अपक्ष भरत जल्या पवारा ३,७८४ १.८९%
भारतीय ट्रायबल पार्टी डॉ. संजय रावल्या वाळवी २,८२४ १.४१%
बहुमत २,०९६ १.०४% ७.९७%
झालेले मतदान २,००,६२८ ७१.९४% १.०७%
नोंदणीकृत मतदार २,७८,८८८
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने जागा राखली उलटफेर

२०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

संपादन
२०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ निकाल
पक्ष उमेदवार प्राप्त मते % ±%
शिवसेना आमश्या फुलजी पाडवी ७२,६२९ ३१.५५% ८.६६%
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ॲड. कागडा चंद्या पाडवी ६९,७२५ ३०.२९ १०.९७%
अपक्ष डॉ. हिना विजयकुमार गावित ६७,०३१ २९.१२
भारत आदिवासी पक्ष पद्माकर विजयसिंग वाळवी ८,८३२ ३.८४
नोटा ५,०७१ २.२० ०.२२
अपक्ष इंजिनियर जेलसिंग बिजला पावरा २,९११ १.२६
अपक्ष सुशीलकुमार जहांगीर पावरा २,५२९ १.१०
अपक्ष सऱ्या धर्मा पाडवी १,४७३ ०.६४
बहुमत २,९०४ २.०३% ०.९९%
झालेले मतदान २,३०,२०१ ७२.०६% ०.१२%
नोंदणीकृत मतदार ३,१९,४३९
शिवसेनाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून जागा हिसकावली उलटफेर

बाह्य दुवे

संपादन

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "Akkalkuwa Assembly Constituency Election Result - Legislative Assembly Constituency". resultuniversity.com. 2022-10-29 रोजी पाहिले.

21°33′20.0016″N 74°1′4.0008″E / 21.555556000°N 74.017778000°E / 21.555556000; 74.017778000