आम आदमी पक्ष
आम आदमी पार्टी हा भारत देशातील मान्यताप्राप्त राज्यस्तरीय राजकीय पक्ष आहे. हा पक्ष समाजसेवक अरविंद केजरीवाल व इतर समविचारी लोकांनी स्थापन केला.[१] भारतातील वाढता भ्रष्टाचार दूर करणे, जनलोकपाल विधेयक संसदेत पारित करणे, निवडणूक पद्धतीत सुधारण करणे, सत्तेचे विकेंद्रीकरण करणे हे या पक्षाचे मुख्य उद्देश आहेत.[२]
अण्णा हजारे व अरविंद केजरीवाल ह्यांच्यामधील मतभेदानंतर केजरीवाल ह्यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाची अधिकृत घोषणा २६ नोव्हेंबर इ.स. २०१२, रोजी दिल्लीतील जंतर मंतर येथे करण्यात आली. डिसेंबर २०१३ मध्ये घेण्यात आलेल्या दिल्ली विधानसभा निवडणूकीमध्ये झाडू हे चिन्ह वापरून लढणाऱ्या आम आदमी पक्षाने ७० पैकी ६९ जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. ह्यांपैकी २८ जागांवर विजय मिळवून भारतीय जनता पक्षाखालोखाल आम आदमी पक्षाने दुसऱा क्रमांक पटकावला. पक्षाध्यक्ष अरविंद केजरीवाल ह्यांनी नवी दिल्ली विधानसभा मतदार संघामधून विद्यमान मुख्यमंत्री शीला दीक्षित ह्यांचा २२,००० मतांनी पराभव केला.
२०१५ मध्ये घेण्यात आलेल्या दिल्ली विधानसभा निवडणूकीमध्ये झाडू हे चिन्ह वापरून लढणाऱ्या आम आदमी पक्षाने ७० पैकी ७० जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. ह्यांपैकी ६७ जागांवर विजय मिळवून सरकार स्थापन केले.
इतिहास
संपादनआम आदमी पार्टीची स्थापना सन 2017 मध्ये इंडिया अगेंस्ट करप्शन द्वारे आण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली चाललेल्या जन लोकपाल आंदोलने झाली. जन लोकपाल बनवण्याच्या प्रति भारतीय राजकीय पक्ष प्रदर्शित उपेक्षापूर्ण वागणूकीमुळे राजकीय पर्यायाचा शोध घेतला जाऊ लागला. अण्णा हजारे भ्रष्टाचार विरोधी जनलोकपाल आन्दोलनाला राजकारणापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करत होते तर अरविंद केजरीवाल आंदोलनाचे लक्ष्य प्राप्त करण्यासाठी एक वेगळा पक्ष स्थापनेच्या आणि निवडणूकीत येण्याच्या विचारात होते. त्यांच्या विचारानुसार वार्ताच्या माध्यमातून जन लोकपाल विधेयक बनवण्यासाठीचे प्रयत्न व्यर्थ जात होते. इण्डिया अगेंस्ट करप्शन द्वारे सामाजिक जोडणी सेवांवर केले गेले सर्वे मध्ये राजकारणात प्रवेश करण्याच्या विचाराला व्यापक समर्थन मिळाले.
१९ सप्टेंबर २०१२ला आण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल या निष्कर्षा वर आले की त्यांचे राजकारणात येण्या संबंधित मतभेद संपुष्टात येणे अवघड आहे म्हणून त्यांनी समान लक्ष्य असून ही आपले मार्ग वेगळा निवडण्याचा निश्चय केला. जन लोकपाल आंदोलनाशी जुळालेले मनीष सिसोदिया, प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव इत्यादी ने अरविंद केजरीवालांना साथ दिली जेव्हा की किरण बेदी आणि संतोष हेगड़े इ.नी तर अजून काही लोकांनी हजारे यांना पाठिंबा दीला .अरविंद केजरीवालांनी २ ऑक्टोंबर २०१२ रोजी नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली या प्रकारे भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून २६ नोव्हेंबर २०१२ रोजी औपचारिक रूपाने आम आदमी पार्टी या नव्या राजकीय पक्षाची स्थापना करण्यात आली.
संदर्भ
संपादन- ^ "केजरीवालांचा आम आदमी पक्ष". 2014-08-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ नोव्हेंबर २०१२ रोजी पाहिले.
- ^ "आम आदमी पक्ष एजंडा". २७ नोव्हेंबर २०१२ रोजी पाहिले.