केरसुणी
सफाई करायचे यंत्र
(झाडू या पानावरून पुनर्निर्देशित)
केरसुणी हे घर आणि परिसरातील कचरा साफ करण्यासाठी वापरले जाणारे साधन आहे. मोळ नावाच्या गवतापासून किंवा शिंदीच्या झाडाच्या पानांपासून केरसुणी बनते. महाराष्ट्रात लक्ष्मीपूजनाच्या दिवशीची केरसुणीची पूजा करण्याचा रिवाज आहे. पुण्याला जवळच्याच जुन्नर शहरातून केरसुण्यांचा पुरवठा होतो. औरंगाबादजवळच्या सोयगाव तालुक्यात शिंदीच्या पानांच्या केरसुण्या बनविणे हा पिढीजात व्यवसाय आहे. महाराष्ट्राच्या जंगलांतून शिंदीची झाडे संपत आल्याने आता ही पाने परराज्यांतून आणावी लागतात. केरसुणी हा कमी भांडवलातून चालणारा व्यवसाय आहे.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |