शीला दीक्षित

भारतीय राजकारणी

शीला दीक्षित (रोमन लिपी: Sheila Dikshit जन्म : ३१ मार्च १९३८; मृत्यू : २० जुलै २०१९) या भारतीय राजकारणी असून भारताच्या दिल्ली राज्याच्या मुख्यमंत्री होत्या. त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सदस्य होत्या. इ.स. १९९८ सालापासून तीन वेळा त्या दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदावर निवडून आल्या व त्यांनी एकूण १५ वर्षे मुख्यमंत्रीपद सांभाळले. परंतु २०१३ दिल्ली विधानसभा निवडणूकीमध्ये आम आदमी पार्टीच्या अरविंद केजरीवालनी दीक्षित ह्यांना नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघामध्ये पराभूत केले.

शीला दिक्षित

कार्यकाळ
३ डिसेंबर १९९८ – २८ डिसेंबर २०१३
मागील सुषमा स्वराज
पुढील अरविंद केजरीवाल

जन्म ३१ मार्च, १९३८ (1938-03-31) (वय: ८३)
कपुरथाला, पंजाब,भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

ह्याआधी इ.स. १९८४ सालातील लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश राज्यातील कनोज लोकसभा मतदारसंघातून त्या लोकसभेवर निवडून गेल्या होत्या.

बाह्य दुवेसंपादन करा