दिल्लीचे मुख्यमंत्री
अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. दिल्लीचा मुख्यमंत्री हा भारताच्या दिल्ली ह्या केंद्रशासित प्रदेशाचा सरकारप्रमुख आहे. भारतीय संविधानानुसार केवळ दिल्ली व पुडुचेरी ह्या दोन केंद्रशासित प्रदेशांनाच स्वतःचे सरकार बनवण्याची संमती आहे. भारताच्या राज्यांमध्ये राज्यप्रमुख राज्यपाल असतो परंतु दिल्ली व पुडुचेरीमध्ये राज्यपाल हे पद अस्तित्वात नसून उपराज्यपालाची निवड भारताचे राष्ट्रपती करतात. परंतु दिल्लीची सर्व सुत्रे व निर्णयक्षमता मुख्यमंत्र्याच्या व त्याच्या मंत्रीमंडळाच्या हातात असते. दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या राजकीय पक्षाला उपराज्यपाल सरकारस्थापनेसाठी आमंत्रित करतो. त्या पक्षाच्या विधिमंडळ समितीद्वारे मुख्यमंत्र्याची निवड केली जाते. बहुमत सिद्ध करून मुख्यमंत्री आपल्या पदावर पाच वर्षे राहू शकतो.
१९५२ सालापासून आजवर ७ व्यक्ती दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावर राहिल्या आहेत.
गोवा, दमण व दीव केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री
संपादनक्रम | नाव[१] | पदावरील काळ (कार्यकाळ) |
पक्ष[a] |
---|---|---|---|
1 | चौधरी ब्रह्म प्रकाश | 17 मार्च 1952 – 12 फेब्रुवारी 1955 ( २ वर्षे, ३३२ दिवस) |
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
2 | गुरुमुख निहाल सिंग | 12 फेब्रुवारी 1955 – 1 नोव्हेंबर 1956 ( १ वर्ष, २६३ दिवस) | |
पद बरखास्त, 1956–1993 | |||
3 | मदनलाल खुराणा | 2 डिसेंबर 1993 – 26 फेब्रुवारी 1996 ( २ वर्षे, ८६ दिवस) |
भारतीय जनता पक्ष |
4 | साहिबसिंग वर्मा | 26 फेब्रुवारी 1996 – 12 ऑक्टोबर 1998 ( २ वर्षे, २२८ दिवस) | |
5 | सुषमा स्वराज | 12 ऑक्टोबर 1998 – 3 डिसेंबर 1998 ( ० वर्षे, ५२ दिवस) | |
6 (1) | शीला दीक्षित | 3 डिसेंबर 1998 – 28 डिसेंबर 2013 ( १५ वर्षे, २५ दिवस) |
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
7 | अरविंद केजरीवाल | 28 डिसेंबर 2013 – 14 फेब्रुवारी 2014 ( ० वर्षे, ४९ दिवस) |
आम आदमी पार्टी |
- | राष्ट्रपती राजवट | 14 फेब्रुवारी 2014 – 14 फेब्रुवारी 2015 ( १ वर्ष, ० दिवस) |
– |
7 (2) | अरविंद केजरीवाल | 14 फेब्रुवारी 2015 – विद्यमान ( ९ वर्षे, २०८ दिवस) |
आम आदमी पार्टी |
टीपा
संपादन- ^ येथे केवळ मुख्यमंत्र्याचा राजकीय पक्ष देण्यात आला आहे.
संदर्भ
संपादन- ^ "States of India since 1947". 9 March 2011 रोजी पाहिले.