आतिशी मारलेना (८ जून, १९८१:दिल्ली, भारत - ) ह्या आम आदमी पार्टीच्या नेत्या आहेत. त्या पक्षाच्या राजकीय कामकाज समितीच्या सदस्या आहेत. त्या सध्याच्या दिल्लीच्या उपमुख्यमंत्री, मनीष सिसोदियाच्या शिक्षण खात्याच्या त्या सल्लागारही आहेत. त्यांनी मुख्यतः वैकल्पिक शिक्षण आणि अभ्यासक्रमाच्या क्षेत्रात काम केले आहे. दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या जाहीरनाम्या तयार करण्यामध्येही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मारलेना आम आदमी पक्षाच्या प्रवक्त्या देखील आहेत आणि अनेकदा त्या टीव्हीच्या वादविवादांवर दिसतात.

मारलेना यांनी काही काळ आंध्र प्रदेशातील ऋषी व्हॅली विद्यालयात शिक्षण देण्याचे काम केले. तेथे त्यांनी सेंद्रीय शेती आणि प्रगतिशील शिक्षण प्रणाली यासारख्या गोष्टींमध्ये सहभाग घेतला आणि त्यांनी अनेक गैर-लाभकारी संस्थांबरोबर काम केले. मध्यप्रदेशातील भोपाळजवळील एका छोट्या गावात त्यांनी सामाजिक काम केले आहे.