मुख्य मेनू उघडा

भोपाळ

भारतातील मध्य प्रदेश राज्याची राजधानी व महत्त्वाचे शहर.

गुणक: 23°15′N 77°25′E / 23.25°N 77.42°E / 23.25; 77.42

  ?भोपाळ
मध्य प्रदेश • भारत
—  राजधानी  —

२३° १५′ ००″ N, ७७° २५′ १२″ E

गुणक: 23°15′N 77°25′E / 23.25°N 77.42°E / 23.25; 77.42
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची
३०८.१४ चौ. किमी
• ४२७ मी
जिल्हा भोपाळ
लोकसंख्या
घनता
१४,८२,७१८ (२००१)
• १६०/किमी
महापौर सुनिल सुद
आयुक्त निकुंज श्रीवास्तव
कोड
पिन कोड
दूरध्वनी
UN/LOCODE
आरटीओ कोड

त्रुटि: "462 001" अयोग्य अंक आहे
• +०७५५
• INBHO
• MP-04
संकेतस्थळ: भोपाळ महानगरपालिका संकेतस्थळ

भोपाळ हे भारतातील मध्य प्रदेश राज्याची राजधानी व महत्त्वाचे शहर आहे.

इतिहाससंपादन करा

भोपाळ शहराची स्थापना अफगाण शिपाई दोस्त मोहम्मद (१७०८-१७४०) याने केली. औरंगजेबाच्या मृत्यूनंतरच्या अफरातफरीमध्ये जेंव्हा दोस्त मोहम्मद दिल्लीतून पळाला तेंव्हा त्याची ओळख गोंड राणी कमलापती हिच्याशी झाली.नबांचे या शहराचे नाव भूपाल या राजाच्या नावावरून पडले.भोपाल राज्यची स्थापना परमार राजा भोजन ने ई. सन् १०००-१०५५ मध्ये केली।त्या वेळी धार हे राजधानीचे स्थान होते. परमार राज नंतर भोपाळ शहरात अफगाण शिपाई दोस्त मोहम्मदचे शासन आले म्हणून याला नवाबी शहर म्हणून ही ओळखले जाते.आज पण येथे मुगल संस्कृती पाहायला मिळते. १७२०-२६दोस्त मोहम्मद खानने भोपाळ गावाची किल्ले बंदी करून याला एका शहरात रूपांतरीत केले. तसेच त्यांनी नवाब ही पदवी घेतली आणि या प्रकारे भोपाळ राज्य ची स्थापना झाली. मुगल दरबार मधील सिद्दीकी बंधुंबरोबर मैत्री च्या निमित्ताने खान ने हैदराबादच्या मीर कमरुद्दीन बरोबर शत्रुत्व घेतले. सिद्दीकी बंधुंबरोबर निपटारा केल्यावर १७२३ मध्ये निजाम ने भोपाळ राज्य वर आक्रमण केले आणि दोस्त मोहम्मद खान ला भोपाळ राज्याचे आधिपत्य स्वीकार करायला लावले. मराठ्यांनी भोपाळ राज्याकडून कर वसूल केले १७३७ मध्ये मराठ्यांनी मुघलांना भोपाळच्या लढाईत मात दिली. खानच्या वारसदारांनी १८१८ मध्ये ब्रिटीश हुकूमत बरोबर हातमिळवणी केली आणि भोपाळ राज्य ब्रिटिश राज्याची रियासत झाला. १९४७ साली जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भोपाळ राज्याची वारीस आबादी सुलतान या पाकिस्तान ला गेल्या व त्यांच्या लहान बहीण बेगम साजिदा सुलतान को उत्तराधिकारी घोषित केले. १ जून १९४९ मध्ये भोपाळ राज्याचे भारतात विलीनीकरण झाले.

[[File:Gol ghar bhopal.jpg|

 1. thumb|गोळघर]

भोपाळ येथे भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड कंपनी आणि भारतीय वन प्रबंधन संस्था आहे. ही भारतातील अशा प्रकारची एकमात्र संस्था आहे. भोपाळमध्ये अनेक विश्वविद्यालये आहेत. उदा० एन आय टी, राजीव गांधी प्रौद्योगिक विश्वविद्यालय, बरकतउल्लाह विश्वविद्यालय, अटलबिहारी वाजपेयी हिंदी विश्वविद्यालय, मध्यप्रदेश भोज मुक्त विश्वविद्यालय, माखनलाल चतुर्वेदी पत्रकारिता विश्वविद्यालय, भारतीय राष्ट्रीय विधी विश्वविद्यालय, त्याच बरोबर अनेक राष्ट्रीय संस्था, जसे की नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी आहेत.अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, भारतीय वन प्रबंधन संस्था, भारतीय विज्ञान शिक्षा एवं अनुसंधान संस्था, भोपाळ इंजिनियरिंग महाविद्यालय, गांधी चिकित्सा महाविद्यालय तथा अनेक शासकीय व पब्लिक शाळा आहेत.

दळणवळणसंपादन करा

भोपाळ देशातील बऱ्याच भागांशी विविध मार्गांनी जोडले आहे.

अर्थव्यवस्थासंपादन करा

जुन्या शहरातील प्रमुख उद्योगांमध्ये विद्युत वस्तू, औषधी, कापूस, रसायने आणि दागिने आहेत. इतर उद्योगांमध्ये सूती आणि कपड्यांचे विणकाम, पीठ गिरणी आणि चित्रकला, तसेच क्रीडा उपकरणे यांचा समाविष्ट आहेत.

आगगाडीसंपादन करा

विमानसेवासंपादन करा

भोपाळ विमानतळापासून मुंबईदिल्लीला दररोज विमानसेवा उपलब्ध आहे.

भूमार्गसंपादन करा

 
कुशाभाऊ ठाकरे आंतरराज्यीय बस अड्डा (संपूर्ण दृश्य)

विशेषसंपादन करा

३ डिसेंबर इ.स. १९८४ मध्ये या शहरात अमेरिकी कंपनी 'युनियन कार्बाइड'मधून मिथाइल आइसोसायनेट वायूची गळती झाल्याने जवळजवळ वीस हजार लोक मृत्युमुखी पडले. या भोपाळ वायुदुर्घटनेचा प्रभाव आजवर वायुप्रदूषण, भूमिप्रदूषण, जलप्रदूषण आणि शारीरिक अपंगत्व इत्यादि स्वरूपांमध्ये शिल्लक आहे.

पर्यटनसंपादन करा

भोपाळ शहरातील प्रेक्षणीय स्थळेसंपादन करा

 • वनविहार : मोकळ्या जागेत राहणारे जंगली प्राणी आणि पक्षी पहाता येतील असे ठिकाण
 • भोपाळच्या नवाबांचे वाडे/राजवाडे/महाल
 • सैरसपाटा (एक उत्तम निगा राखलेले उद्यान)
 • कालियासोत, केरवा, भदभदा आणि इतर पाच-सहा धरणे
 • भोपाळचा बडा तलाव (आणि छोटा तलाव)
 • इंदिरा गांधी राष्ट्रीय मानव संग्रहालय आणि इतर ३-४ संग्रहालये
 • मोती मशीद आणि इतर ३-४ मशिदी
 • ताज उल मस्जिद - यह भारत की विशाल मस्जिदों में से एक हैं।
 • भारत भवन, वगैरे.

भोपाळच्या आसपासची प्रेक्षणीय ठिकाणेसंपादन करा

 • सांचीचा स्तूप (भोपाळपासून ४५ किलोमीटरवर)
 • विदिशा (सांचीपासून ९ किलोमीटरवर) : येथे ग्रीक राजा ॲन्टिअल्किडासचा दूत हेलिओडोरस याने बांधलेला स्तंभ आहे.
 • उदयगिरी गुंफा (विदिशापासून चार किलोमीटरवर बेस नदीच्या काठी) : येथील भूवराहाचे देऊळ आणि दुसरा चंद्रगुप्त आणि कुमारगुप्त यांचे शिलालेख.
 • भीमबेटका (भोपाळच्या दक्षिणेला ४५ किलोमीटरवर) : येथील गुहांमध्ये आदिमानवाने काढलेली चित्रे आहेत.
 • भोजपूर गाव (भीमबेटकाच्या दक्षिणेला २५ किलोमीटरवर) : येथे भोजेश्वर महादेवाच्या अतिपुरातन देवळात १८ फूट उंचीची शंकराची पिंडी आहे.

हेसुद्धा पहासंपादन करा