छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई (आहसंवि: BOM, आप्रविको: VABB), शहरातील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा विमानतळ पूर्वी सहार विमानतळ म्हणून ओळखला जात असे. सुमारे १८५० एकर परिसरात विस्तारलेला हा विमानतळ भारतातील सर्वात मोठा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. मुंबई शहरातील अंधेरी या रेल्वे स्टेशनपासून हा सर्वात जवळ आहे . हा विमानतळ भारतातील तसेच दक्षिण आशियातील प्रवासी वाहतुकीच्या संदर्भात, सर्वात व्यस्त विमानतळ आहे.[२][३] यामुळे यास भारतीय उपखंडाचे प्रवेशद्वार म्हटले जाते.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ | |||
---|---|---|---|
![]() | |||
आहसंवि: BOM – आप्रविको: व्हीएपीओ
| |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | सार्वजनिक | ||
मालक | GVK, भारतीय विमानतळ प्राधिकरण | ||
प्रचालक | मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मर्यादित(MIAL) | ||
कोण्या शहरास सेवा | मुंबई | ||
स्थळ | मुंबई, महाराष्ट्र, भारत | ||
हब |
| ||
समुद्रसपाटीपासून उंची | ३७ फू / ११ मी | ||
गुणक (भौगोलिक) | 19°05′19″N 072°52′05″E / 19.08861°N 72.86806°E | ||
संकेतस्थळ | |||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
मी | फू | ||
१४/३२ | २,९२५ | ९,५९६ | डांबरी धावपट्टी |
०९/२७ | ३,४४५ | ११,३०२ | डांबरी धावपट्टी |
सांख्यिकी (२००८-२००९) | |||
प्रवासी | २ ते ४ कोटी[१] | ||
कार्गो हाताळणी | ५३०,२७८ टन |
या विमानतळाला लागूनच देशांतर्गत वाहतुकीचा विमानतळ आहे. त्याचे नावही छत्रपती शिवाजी विमानतळ आहे. त्याचे प्रवेशद्वार मुंबईतील विलेपार्ले या रेल्वे स्टेशनजवळ आहे.
विमानतळाची माहिती
तांत्रिक माहिती
- IATA नाव: BOM
- ICAO नाव: VABB
- स्थान : 19°05′19″N, 72°52′05″E
- टर्मिनल १ए १बी - राष्ट्रीय उड्डाणे
- टर्मिनल २ए २बी २सी - आंतरराष्ट्रीय उड्डाणे
इ.स. २०१४चे सरासरी आकडे-
- ७८० व्यावसायिक उड्डाणे
- ३ कोटी ७५ लाख प्रवासी
- ४०,०००० टन सामानवाहतूक (कार्गो)
हा विमानतळ एअर इंडिया आणि जेट एअरवेज यांचा मुख्य विमानतळ आहे. येथून सध्या ४६ आंतरराष्ट्रीय विमानकंपन्यांची विमाने उडतात. याशिवाय इंडियन, जेट लाइट, गो एअर, डेक्कन, स्पाइसजेट, इंडिगो एअरलाइन्स व किंगफिशर एअरलाइन्स या कंपन्यांची अनेक उड्डाणे येथून होतात. या विमानतळावर सकाळी १०:०० ते संध्याकाळी ६:३० दरम्यान दिवसातील ४५ % उड्डाणे होतात. रात्री १०:०० नंतर बव्हंशी आंतरराष्ट्रीय उड्डाणे होतात.
इतिहास
मुंबईत सुरुवातीस जुहू विमानतळ हा एकच प्रवासी विमानतळ होता. दुसर्या महायुद्धानंतर स्वातंत्र्यप्राप्तीच्या सुमारास मुंबईत मोठा विमानतळ बांधण्याचा बेत आखण्यात आला. जुहूचा विमानतळ समुद्राच्या किनारपट्टीस लागून असल्यामुळे पावसाळ्यात विमानांच्या उड्डाण-अवतरणांना हवामानाचा अडथळा होत असे तरी हा नवीन विमानतळ आतल्या बाजूस सांताक्रुझ आणि विले पार्ले या उपनगरांदरम्यान बांधण्यात आला. त्याला नाव मात्र सांताक्रुझ विमानतळ हे देण्यात आले. इ.स. १९४८ मध्ये येथील बांधकाम झाले व जून १९४८मध्ये एअर इंडियाने येथील पहिले प्रवासी उड्डाण लंडनला केले. हा नवीन विमानतळ सुरुवातीस सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत होता व नंतर तो प्रवासी एव्हिएशन मंत्रालयाच्या अंमलाखाली आला. १९७९साली सांताक्रुझ विमानतळाला आग लागून मोठे नुकसान झाले होते तेव्हा काही काळाकरता एक तात्पुरते टर्मिनल बांधण्यात आले. त्यानंतर १९८१मध्ये सांताक्रुझच्या पूर्वेस सहार गावाजवळ अजून एक नवीन टर्मिनल[मराठी शब्द सुचवा] बांधण्यात आले व आंतरराष्ट्रीय उड्डाण/अवतरणे तेथून सुरू झाली. ते जुने टर्मिनल आता कार्गो टर्मिनल म्हणून ओळखले जाते.
प्रत्यक्षात हे सर्व विमानतळ एकाच मैदानाच्या विविध बाजूंना आहेत. मुंबईत जुहू नावाचा एक छोटा विमानतळ आहे, तो मात्र स्वतंत्र आहे.
२००६मध्ये मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मर्यादित कंपनीने जी.व्ही.के. इंडस्ट्रीज लिमिटेड आणि एअरपोर्ट्स कंपनी साउथ आफ्रिका या कंपन्यांना विमानतळाचे आधुनिकीकरण करण्याचे कंत्राट दिले आणि नवीन विमानतळ बांधवून घेतला.
सांख्यिकी
हा विमानतळ भारतीय उपखंडातील दुसर्या क्रमांकाचा सगळ्यात व्यस्त विमानतळ आहे. ऑफिशियल एअरलाइन गाइड (ओएजी) ने मुंबई-दिल्ली मार्गाला साप्ताहिक उड्डाणांनुसार जगातल्या तिसर्या क्रमांकाचा सगळ्यात व्यस्त मार्ग म्हणून मान्यता दिली आहे.
एप्रिल २००६ ते फेब्रुवारी २००७ दरम्यान छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर १,८०,००० उड्डाणे व उतरणे झाली तर २,००,००,००० प्रवाशांनी येथून ये-जा केली, पैकी १,३५,६०,००० प्रवास देशांतर्गत उड्डाणांवर होते तर ६७,३०,००० प्रवासी परदेशांहून आले-परदेशांस गेले. २००५-०६ पेक्षा हा आकडा २१.२८ % जास्त आहे.[४] विमानतळावरुन ये-जा करण्यात उशीर झालेल्या विमानांच्या संख्येनुसार २००७ आणि २००८ मध्ये हा विमानतळ जगातील सगळ्यात पहिल्या क्रमांकाचा होता. फक्त ४९.९५ % विमाने वेळेवर आली-गेली. उशीर झालेल्या विमानांपैकी ५८ % विमाने अर्ध्या तासापेक्षा जास्त खोळंबली.[५]
रचना
टर्मिनल
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन मुख्य प्रवासी टर्मिनले आहेत. टर्मिनल १ (सांताक्रुझ) देशांतर्गत तर टर्मिनल २ (सहार) आंतरराष्ट्रीय उड्डाण-अवतरणांसाठी वापरली जातात. यांमध्ये साधारण १०-१५ मिनिटांचे अंतर आहे. दोन्ही टर्मिनलवरून निघालेली विमाने एकाच धावपट्टी व इतर सुविधांचा (एअरसाइड सर्व्हिसेस) उपयोग करतात. या दोन्ही टर्मिनलदरम्यान प्रवाशांची ने-आण विमानतळाच्याच गाड्या करतात.
- टर्मिनल १ - देशांतर्गत उड्डाणे
- १अ - इंडियन एअरलाइन्स, एअर इंडिया रीजनल तसेच किंगफिशर एअरलाइन्सची उड्डाणे असलेले हे टर्मिनल एप्रिल १९९२मध्ये बांधले गेले.
- १ब - जेटलाइट, स्पाइसजेट, गोएअर, इंडिगो एअरलाइन्स आणि इतर छोट्या विमानकंपन्यांची उड्डाणे येथून होतात. हे टर्मिनल १९९८ मध्ये बांधले गेले.
- १क - जेट एअरवेजची उड्डाणे येथून होतात. हे टर्मिनल एप्रिल २०१०मध्ये बांधले गेले
- टर्मिनल २ - आंतरराष्ट्रीय उड्डाणे
- देशांतर्गत टप्पा असलेली आंतरराष्ट्रीय उड्डाणेसुद्धा याच टर्मिनलवरून ये-जा करतात
- सध्या याचा पुनर्विकास चालू आहे व याची रचना स्किडमोर, ओविंग्स ॲंड मेरिल या कंपनीने केली आहे.[६][७]
- मालवाहतूक टर्मिनल
सुविधा[८]
सुविधा | प्रस्तावित | सध्या |
---|---|---|
विमाने थांबण्याचे गाळे | १०६ | ९२ |
विमानात चढण्यासाठीचे पूल | ६६ | १९ |
चेक-इन टेबले | ३३९ | १८२ |
कार पार्किंग | १२,००० | ३,६०० |
गेल्या काही वर्षांत धावपट्टीवरील ताण कमी करण्यासाठी नवीन टॅक्सीवे बांधले गेले आहेत. एकाच माहितीदर्शकावर सांताक्रुझ आणि सहार अशा दोन्ही विमानतळांवरील विमानांच्या येण्याजाण्याची माहिती देण्यासाठीची प्रणालीही विकासाधीन आहे. ही माहिती एअर ट्राफिक कंट्रोल, आरपोर्ट रॅम्प, विमानतळांची संकेतस्थळे तसेच आसपासच्य हॉटेलांमध्येही एकाच वेळी प्रसारित करण्याचाही प्रयत्न असेल. जरी अजून एक धावपट्टी बांधणे शक्य नसले तरी विमानांना ये-जा करण्यासाठी अधिक जागा मिळावी यास्तव एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवरची जागा बदलण्यात येणार आहे.
विमानतळावर प्रवाशांसाठी फुकट वायफाय सुविधा आहे.[९]
टर्मिनल २
नविनच बांधलेल्या या टर्मिनलद्वारे प्रवाशांना अनेक सुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत.यासाठी एक इंग्लिश अक्षर 'X' या आकाराची एक इमारत बनविण्यात आलेली आहे. या नव्या इमारतीचे व या नव्या टर्मिनलचे बांधकाम, असलेल्या कोणत्याही सेवा,सुविधा बंद न करता,करण्यात आलेले आहे. असलेल्या सुविधा खालील प्रकारे आहेत:
पोहोचमार्ग
मुंबईतील सांताक्रुझ, विलेपार्ले, व अंधेरी या स्थानकांवरून,तसेच पश्चिम द्रुतगती महामार्गावरुनही, वाहतुकीच्या कोंडीमुळे या विमानतळावर येण्यास बराच कालापव्यय होत असे. त्यावर उपाय म्हणून १२ फेब्रुवारी २००१४ रोजी सहार उन्नत मार्ग वाहतुकीस खुला करण्यात आला. हा सहा मार्गिका (लेन) असलेला रस्ता आहे. २०२६ पर्यंत वाहतुकीत होणार्या वाढीचा अंदाज घेऊन हा मार्ग बनविण्यात आलेला आहे.
सजावट
भारतातील विविध संस्कृती व कला पर्यटकांची ओळख व्हावी म्हणून तेथे एक संग्रहालय उभे करण्यात आले आहे. त्यात अनेक चीजवस्तू आहेत. यातील वैशिष्ट्य म्हणजे येथे एक तीन किलोमीटर. लांबीची एक आर्टवॉल आहे. यात सजावटीसाठी २७२ आकाशदिव्यांचा वापर करण्यात आला आहे. मोरपिसांनी सजविलेल्या ३० मोठ्या खांबांचा वापर येथे करण्यात आलेला आहे.[ चित्र हवे ]
यासाठी एकूण ४,३९,२०३ चौरस मीटर क्षेत्रफळाचा वापर करण्यात आला.यासाठी सुमारे ५,५०० कोटी इतका खर्च आला. याद्वारे वर्षाकाठी सुमारे ४० लाख प्रवासी हाताळता येणार आहेत. हे सध्या कार्यान्वयाधीन असून तेथील तयारी पूर्ण झाल्यावर दि. १२ फेब्रुवारी इ.स. २०१४ रोजी ते वापरासाठी खुले करण्यात येईल.
सेवा व सुविधांची यादी
सुविधेचा प्रकार | क्षमता | तपशील/ शेरा |
---|---|---|
सुरक्षा तपासणी | ९,६०० बॅग्ज | प्रतितास |
आसनव्यवस्था | १०,९९० | व्यक्ति |
पार्किंग | ५,००० मोटारी | बहुमजली |
इमिग्रेशन | ६० काउंटर्स | - |
प्रसाधनगृहे | १०२ | स्त्री व पुरुष मिळून |
चेक काउंटर्स | २०८ | - |
पादचारी पूल | ५२ | - |
कायमस्वरूपी संलग पूल | २५ | - |
आंतरराष्ट्रीय ट्रांसफर डेस्क | ८ | - |
पुनर्तपासणी डेस्क | १९ | - |
इमिग्रेशन लगेज डिस्प्ले | ३० | - |
उद्वहन | ७३ | - |
सरकते जिने | ४७ | - |
सीसीटीव्ही कॅमेरे | ३११२ | - |
जाहिरात पटल | ५०० | - |
उद्घोषणा(दररोज) | ३४९० | - |
झुंबरे | ९४६ | हस्तकलांनी सजविण्यात आलेली |
एलईडी दिवे | - | चार किलोमीटर परिसरात |
विमानसेवा व गंतव्यस्थान
संदर्भ
- ^ मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (अधिकृत संकेतस्थळ)[मृत दुवा]वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती नोव्हेंबर २१, २०१० (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)
- ^ Mumbai airport’s traffic control tower design bags award - Thaindian News
- ^ Smart cities under JNNURM-II: Kamal Nath | Business Standard
- ^ मुंबई विमानतळावर ११ महिन्यांत २ कोटी प्रवाशांची ये-जा
- ^ Forbes.com - The World's Most-Delayed Airports for 2008.
- ^ "विमानतळ तांत्रिकी" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल प्रकल्प पान" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)[मृत दुवा]वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती ऑगस्ट २३, २०१२ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)
- ^ CSIA.in[मृत दुवा]वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती नोव्हेंबर २१, २०१० (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)
- ^ मुंबई विमानतळावर मोफत वाय-फाय
- ^ http://www.flykingfisher.com/pdf/Flight_schedule_23March2012.pdf
- ^ VS resuming BOM[मृत दुवा]वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती मे १४, २०१२ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)
बाह्य दुवे
- मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मर्यादित (अधिकृत संकेतस्थळ)
- छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर.
संदर्भ आणि नोंदी
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |