भंडारनायके आंतरराष्ट्रीय विमानतळ
(बंदरनायके आंतरराष्ट्रीय विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)
भंडारनायके आंतरराष्ट्रीय विमानतळ किंवा कोलंबो विमानतळ (आहसंवि: CMB, आप्रविको: VCBI) हा श्रीलंका देशामधील सर्वात मोठा व प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. राजधानी कोलंबोच्या ३५ किमी उत्तरेस नेगोंबो नावाच्या उपनगरामध्ये स्थित असलेला हा विमानतळ श्रीलंकन एरलाइन्सचा प्रमुख वाहतूकतळ आहे. श्रीलंकेचे चौथे पंतप्रधान एस.डब्ल्यू.आर.डी. भंडारनायके ह्यांचे नाव ह्या विमानतळाला देण्यात आले आहे.
भंडारनायके आंतरराष्ट्रीय विमानतळ බණ්ඩාරනායක ජාත්යන්තර ගුවන්තොටුපළ பண்டாரநாயக்க பன்னாட்டு விமான நிலையம் | |||
---|---|---|---|
आहसंवि: CMB – आप्रविको: VCBI
| |||
माहिती | |||
विमानतळ प्रकार | जाहीर | ||
कोण्या शहरास सेवा | कोलंबो | ||
स्थळ | कटुनायके, श्री लंका | ||
हब | श्रीलंकन एरलाइन्स | ||
समुद्रसपाटीपासून उंची | २६ फू / ८ मी | ||
गुणक (भौगोलिक) | 7°10′52″N 79°53′1″E / 7.18111°N 79.88361°E | ||
धावपट्टी | |||
दिशा | लांबी | पृष्ठभाग | |
मी | फू | ||
04/22 | 3,350 | 10,991 | डांबरी |