श्रीलंका

दक्षिण आशियातील देश
(श्री लंका या पानावरून पुनर्निर्देशित)

श्रीलंका (सिंहली: ශ්‍රී ලංකා; तमिळ: இலங்கை ;), (जूने नाव - सिलोन / Ceylon), हा हिंद महासागरात भारतीय उपखंडाच्या दक्षिणेस वसलेला द्वीप-देश आहे. श्रीलंका व भारताच्या दक्षिण किनाऱ्यादरम्यान ३१ कि.मी. रुंदीची पाल्कची सामुद्रधुनी पसरली आहे. श्रीलंकेच्या पश्चिमेला पाल्कची सामुद्रधुनी आणि मन्नारचे आखात, उत्तरपूर्वेकडे बंगालचा उपसागर तथा दक्षिणेकडे हिंद महासागर आहे. भारत आणि मालदीव हे श्रीलंकेचे शेजारी देश आहेत. श्रीलंका इ.स. १९४८ साली राष्ट्रमंडळाचा सदस्य या नात्याने स्वतंत्र झाला.

श्रीलंका
ශ්‍රී ලංකා ප්‍රජාතාන්ත්‍රික සමාජවාදී ජනරජය (सिंहल)
இலங்கை சனநாயக சோஷலிசக் குடியரசு (तमिऴ्)
श्रीलंकेचे समाजवादी लोकशाही प्रजासत्ताक
(Democratic Socialist Republic of Sri Lanka)
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
राष्ट्रगीत: श्रीलंका माता
श्रीलंकाचे स्थान
श्रीलंकाचे स्थान
श्रीलंकाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी श्री जयवर्धनपुर कोट्टे, कोलंबो
सर्वात मोठे शहर कोलंबो
अधिकृत भाषा सिंहला, तमिळ
 - राष्ट्रप्रमुख गोताबाय राजपक्षे
 - पंतप्रधान महिंदा राजपक्षे
 - सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश के. श्रीपवन
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस फेब्रुवारी ४, १९४८
(ब्रिटनकडून) 
 - प्रजासत्ताक दिन २२ में १९७२ 
क्षेत्रफळ
 - एकूण ६५,६१० किमी (१२२वा क्रमांक)
 - पाणी (%) ४.४
लोकसंख्या
 -एकूण २,०७,४३,००० (५२वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ३१६/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ८६.७२ अब्ज अमेरिकन डॉलर (६१वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ४,३०० अमेरिकन डॉलर (१११वा क्रमांक)
राष्ट्रीय चलन श्रीलंकी रूपया (LKR)
आंतरराष्ट्रीय कालविभाग SLST (UTC+5:30) (यूटीसी +५.३०)
आय.एस.ओ. ३१६६-१ LK
आंतरजाल प्रत्यय .lk
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +९४
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


पर्यटनाच्या दृष्टीने देखील श्रीलंका या शहराला एक वैशिष्ट्यपूर्ण असे स्थान आहे. विशेष म्हणजे अगदी लहानपणापासूनच मुलांमध्ये रामायण कालीन श्रीलंका म्हणून या शहराचे कुतूहल निर्माण होते. तेच हे शहर पर्यटनाच्या दृष्टीने विचार करता अनेक महत्त्वपूर्ण ठिकाणे या देशामध्ये पाहायला मिळतात. या ठिकाणची मुख्य भाषा म्हणजे सिंहली होय. येथील सर्व नागरिक अगदी स्थानिक लोक, टॅक्सीवाले, दुकानदार, हॉटेलचे कर्मचारी या सर्वांची भाषा सिंहली हीच आहे. हिंदी तसेच काही प्रमाणामध्ये शोरूम, हॉटेल्स मॉल्स या ठिकाणी काही प्रमाणात इंग्रजी ही भाषा बोलली जाते. भारत-श्रीलंका संबंध हे अगदी प्राचीन काळापासून आहे. बौद्ध धर्म आणि तत्त्वज्ञान याचा प्रसार सुरुवातीच्या काळामध्ये अग्नी आशियाई देशातील श्रीलंका या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झाला. सम्राट अशोक सारख्या चक्रवर्ती शासकाने या देशामध्ये धर्मप्रसारासाठी आपल्या मुलांना प्रोत्साहन दिले. श्रीलंका आणि भारत यांचा इतिहास प्राचीन काळापासून एकमेकांशी निगडीत असा आहे. दीपवंश, महावंश व चूलवंश या तीन ग्रंथांमधून बुद्धपूर्व काळ आणि बुद्ध उत्तर काळात भारत आणि श्रीलंकेत होऊन गेलेले, राजवंश त्यांचे परस्पर संबंध आणि घडलेल्या ऐतिहासिक घटनाा यांची माहिती मिळते. या ग्रंथांना 'वंशग्रंथ' असे म्हणले जाते.

श्रीलंकेचे क्षेत्रफळ ६५,६१० चौरस किलोमीटर असून लोकसंख्या २ कोटी ७ लक्ष आहे.

देशातील ७०.२% जनता ही बौद्ध, १२.६% जनता ही हिंदू, ९.७% जनता ही मुस्लिम, ७.४% जनता ही ख्रिचन आणि ०.१% जनता ही इतर धर्मीय आहे.

नावाची व्याप्ती

संपादन

प्राचीन काळापासून हा देश 'सिंहल' या नावाने ओळखला जात असे. भारतीय साहित्यात या देशाला 'लंका' असेही म्हणले जाई. ब्रिटिश राजवटीमध्ये याला 'सिलोन' असे नाव पडले. इ.स. १९७२ पर्यंत हा देश 'सिलोन' या नावानेच ओळखला जाई. नंतर याचे नाव श्रीलंका असे ठेवले गेले. इ.स. १९७८ या वर्षी याचे नाव 'श्रीलंकेचे समाजवादी लोकशाही प्रजासत्ताक ' असे ठेवले गेले.

इतिहास

संपादन

प्राचीन काळापासून भारत आणि श्रीलंकेचे धार्मिक, व्यापारी व राजकीय संबंध होते. श्रीलंका या देशाचा मागील एकूण ३००० वर्षांचा लिखित इतिहास उपलब्ध आहे.

इ.स.पू. २५० पासूनच श्रीलंकेत बौद्ध धर्मसंस्कृतीचा प्रचार होण्यास सुरुवात झाली. मौर्य सम्राट अशोकाने आपला पुत्र महेंद्र व पुत्री संघमित्रा यांस बौद्ध धर्माच्या प्रसाराकरिता श्रीलंकेत पाठविले होते. गौतम बुद्धांना ज्या बोधिवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली, त्याची एक फांदी घेऊन ख्रिस्तपूर्व २४५ मध्ये संघमित्रा या देशात आल्या आणि त्यांनी ती फांदी येथे रोवली. हे जगातील सर्वात प्राचीन वृक्षारोपण समजले जाते. तसेच सम्राट अशोकाने पाठवलेले बौद्ध भिक्खू येथे आले होते व त्यांनी देखील येथे बौद्ध धर्माची सुरुवात केली. त्यांचे अस्तित्त्व अनुराधापूरच्या वायव्य भागात आजही स्पष्ट दिसते.

सोळाव्या शतकात युरोपीय राष्ट्रे श्रीलंकेतसुद्धा व्यापाराकरिता आली. या देशातून तेव्हा चहा, रबर, साखर, कॉफी, दालचिनी सहित आणखी काही मसाल्यांच्या पदार्थांचा निर्यातक देश बनला. प्रथम पोर्तुगीजांनी कोलंबोजवळ स्वतःचा गड निर्माण केला. हळूहळू आजूबाजूच्या प्रदेशावर आपली सत्ता स्थापन केली. श्रीलंकेतील निवास्यांनी पोर्तुगीजांपासून सुटकेसाठी डचांचे सहाय्य घेतले; मात्र १६२० मध्ये पोर्तुगिजांचा पाडाव करून डचांनी तेथील जनतेवर आधीपेक्षा जास्त कर लादला. १६६० पर्यंत इंग्रजांचे लक्ष श्रीलंकेवर गेले. त्यानंतर इंग्रजांनी डच प्रदेशांवर अधिकार गाजवण्यास सुरुवात केली. सन १८१८ पर्यंत श्रीलंकेतील अंतिम राज्य असणाऱ्या कॅन्डीच्या राजाने आत्मसमर्पण केले.

चहा, कॉफी, नारळ, रबर व मुळात श्रीलंकेची असलेली दालचिनी या पदार्थांच्या निर्यातीसाठी श्रीलंकेची ख्याती आहे. उष्णकटिबंधीय वने, समुद्रकिनारे यांमुळे लाभलेले निसर्गसौंदर्य हे पर्यटनाच्या दृष्टीने श्रीलंकेचे आकर्षण आहे. येथे नैसर्गिक मौल्यवान खड्यांच्या खाणी आहॆेत. श्रीलंका हा शेतीप्रधान देश आहे. सखल भागात आणि डोंगरउतारावर भातशेती केली जाते. डोंगरउतारावर पायऱ्या-पायऱ्यांची शेती असते. पूर्वी श्रीलंकेत तांदुळ उत्पादन कमी होते; परंतु आधुनिक तंत्रज्ञान वापरून तांदळाच्या उत्पादनाच्या बाबतीत स्वावलंबी झाला आहे.

डोंगराच्या वरच्या भागात उतारावर चहाचे मळे आढळतात. चहाची निर्यात करणारा श्रीलंका हा एक महत्त्वाचा देश आहे. डोंगर उतारावर पायथ्याकडील भागात रबराचे मळे आहेत. पश्चिम व दक्षिणकडील सखल किनारी भागात नारळीच्या बागा आहेत. येथील श्रीलंकेत आंबा, केळी, फणस, पपई, अननस यांच्या बागा आहेत. लवंग, मिरी, दालचिनी इत्यादी मसाल्याच्या पदार्थांच्या शेती होते.

चहा, नारळ, रबर यांची शेती व्यापारी पद्धतीने केली जाते. हे उत्पादन अधिक वाढिण्यासाठी शासनाने संशोधन संस्थ्या स्थापन केल्या आहेत. तसेच शेती व्यवसायात यांत्रिकीकरण सुरू झाले आहे. या देशात डोंगरउतारावर मळे, शेतीचा झालेला विस्तार तसेच वेगवान नद्या यामुळे जमिनीची होणारी धूप ही प्रमूख पर्यावरणीय समस्या आहे. तसेच नद्यांनी वाहून आणलेला गाळ नद्यांच्या मुखाजवळ साचतो. यासाठी भूसंधारनासारखे उपाय सातत्याने तेथे करावे लागतात. खाणकाम: श्रीलंकेत माणिक, टोपाज यांसारख्या मौंल्यवान रत्नांचे खाणकाम चालते. याशिवाय ग्राफाइट, टंगस्टन, अभ्रक इत्यादीच्या खणीही येथे आहेत.

व्यापार

संपादन

श्रीलंका देश खनिज तेल, कापड यंत्रे, कोळसा, वाहने इत्यादी वस्तूंची आयात करतो. चहा, नारळ, रबराच्या वस्तू, मौल्यवान रत्ने, खोबरे, मसाल्याचे पदार्थ, दोरखंड इत्यादी वस्तूंची निर्यात करतो.

लोकजीवन

संपादन

श्रीलंकेतील सींहली लोकांची सिंहली ही प्रमुख भाषा आहे. पश्चिम किनारट्टीवर व उत्तरेकडील मैदानी प्रदेशात सिंहली लोकांची दाट लोकवस्ती आहे. या देशाच्या मध्य डोंगराळ भागात वेदद जमातीचे आदिवासी राहतात. श्रीलंकेत बहुसंख्य लोक बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत.

भात व मासे हे श्रीलंकेतील लोकांचे मुख्य अन्न आहे. नारळाचा व फळांचाही आहारात समावेश असतो. उष्ण व दमट हवामानामुळे लोक सुती कपडे वापरतात. लुंगी व सदरा हा पुरुषांचा पोशाख असतो.

वनस्पती

संपादन

या देशातील पर्वतमय भागात पर्जन्याचे प्रमाण जास्त आहे. तेथे विषुववृत्तिय सदाहरित प्रकारची वने आहेत. कमी पर्जन्याच्या प्रदेशात पानझडी वृक्ष तर अतिकमी पर्जन्याच्या प्रदेशात गवत आढळते.

मोठी शहरे

संपादन

श्री जयवर्धनेपुरा कोट ही श्रीलंकेची राजधानी आहे. कोलंबो ही श्रीलंकेची पूर्वीची राजधानी होती व सध्या देशातील सर्वात मोठे शहर आहे.

श्रीलंकेचा परिचय करून देणारी पुस्तके

संपादन
  • शोध श्रीलंकेचा (लेखक - डाॅ. सच्चिदानंद शेवडे)(प्रकाशन इ.स. २०१७) :

श्रीलंकेची वेगळी ओळख करून देणारे हे पुस्तक आहे. श्रीलंकेचा इतिहास, रामायणाच्या तिथे असलेल्या खुणा, बौद्ध राजवटीचा उदय, सिंहली-तमीळ संघर्ष, एलटीटीईचा उदय आणि अस्त आणि आजची श्रीलंका अशा सगळ्या गोष्टींचा वेध त्यांनी घेतला आहे. प्रवासवर्णन, ताजे संदर्भ अशा गोष्टींचीही जोड दिल्यामुळे पुस्तक वाचनीय झाले आहे.

बाह्य दुवे

संपादन