तीन बाजूंनी जमीन असलेल्या जलाशयाला त्याच्या आकारमानाप्रमाणे क्रमश: खाडी, आखात किंवा उपसागर म्हणतात. या तिघांत उपसागर सर्वात मोठा. भारत , बांगलादेश आणि ब्रह्मदेश यांच्या भूमींनी वेढला गेलेला बंगालचा उपसागर (बांग्ला: বঙ্গোপসাগর ; तमिळ: வங்காள விரிகுடா ; तेलुगू भाषा: బంగాళాఖాతము ; इंग्लिश: Bay of Bengal, बे ऑफ बंगाल) हा हिंदी महासागराच्या ईशान्येकडील भाग व्यापणारा व जगातील उपसागरांपैकी सर्वांत विस्तीर्ण उपसागर आहे. ढोबळमानाने त्रिकोणी आकाराचा हा उपसागर पश्चिमेकडे श्रीलंका व भारताची पूर्व किनारपट्टी, उत्तरेला बांग्लादेशाची दक्षिण किनारपट्टी या भूभागांनी, तर पूर्वेकडे म्यानमारची किनारपट्टी व भारताची अंदमान आणि निकोबार बेटे यांनी वेढला आहे. या उपसागराचे क्षेत्रफळ २१,७२,००० चौरस कि.मी. आहे

बंगालचा उपसागर
क्रम मथळा मजकूर
महासागर हिंदी महासागर
संबंधित देश श्रीलंका, भारत, बांग्लादेश, म्यानमार, थायलंडइंडोनेशिया
महत्तम लांबी २०९० किलोमीटर
महत्तम रुंदी १६१० किलोमीटर
क्षेत्रफळ २१,७२,००० किमी²
सरासरी खोली २६०० मीटर
महत्तम खोली ४६९४ मीटर