श्रीलंकन एरलाइन्स (सिंहला:ශ්‍රී ලන්කන් ගුවන් සේවය, तमिळ: சிறீலங்கன் எயர்லைன்ஸ்; जुने नाव: एर लंका) ही श्री लंका देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. ही कंपनी सध्या आशियायुरोपातील ३५ देशांमधील ६१ शहरांना प्रवासी विमानसेवा पुरवते. १९४७ साली स्थापन झालेली एर सिलोन ही विमान कंपनी १९७८ साली बंद पडली व त्याऐवजी एर लंका ही कंपनी १९७९ मध्ये सुरू करण्यात आली. १९९८ मध्ये एर लंकाचे नाव बदलून श्रीलंकन असे ठेवण्यात आले.

श्रीलंकन एरलाइन्स
आय.ए.टी.ए.
UL
आय.सी.ए.ओ.
ALK
कॉलसाईन
SRILANKAN
स्थापना १९४७ (एर सिलोन ह्या नावाने)
हब भंडारनायके आंतरराष्ट्रीय विमानतळ, कोलंबो
मुख्य शहरे सुवर्णभूमी विमानतळ, बँकॉक
फ्रिक्वेंट फ्लायर फ्लायस्माइल्स
अलायन्स वनवर्ल्ड
विमान संख्या २२
मुख्यालय कोलंबो
संकेतस्थळ http://www.srilankan.lk
श्रीलंकन एरलाइन्सचे तिरुचिरापल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर थांबलेले विमान

श्रीलंकेची प्रवासी वाहतूक करणारी ही विमान कंपनी असून कोलंबो येथील बंदरनायके आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आणि हंबाटोटा येथील माटाला राजपक्ष आंतरराष्ट्रीय विमानतळावरून युरोप , मध्य पूर्व , दक्षिण आशिया , दक्षिणपूर्व आशिया , पूर्व , उत्तर अमेरीका , ऑस्ट्रेलिआ आणि आफ्रिका इत्यादी अशा ३५ शहरांना ६५ स्थानकांद्वारे जोडलेले आहे.

इतिहास

संपादन

एर लंकाने सिंगापूर व मेअर्स एरलाईनकडून भाडयाने घेतलेल्या अनुक्रमे बोईंग ७० ७ व ७३ ७ विमानांच्या उड्डाणांनी विमानप्रवासाला सुरुवात केली. १५ एप्रिल १९८२ रोजी प्रथमच निप्पोन एरवेझकडून एल १०११ हे विमान खरेदी करण्यात आले.

२८ मार्च १९८० रोजी एर लंकाने सुप्रसिद्ध विमान कंपनीबरोबर दोन नवीन अत्याधुनिक विमाने खरेदी करण्यासाठी करार केला. त्यानुसार २ ६ ऑगस्ट , १९८२ रोजी पहील्या ट्रायस्टार ५०० या विमानाची खरेदी कॅलिफोर्नियामधील पालमडेल येथे स्विकारली गेली.

८ जून १९८५ रोजी ‘ राजे विजया ’ नावाने ओळखले जाणारे पहिले बोईंग ७४ ७-२०० बी खरेदी केले.

एर लंका ही श्रीलंका सरकारची कंपनी असून १९९८ मध्ये त्याचे खाजगीकरण झाले. दुबईस्थित एमिराइट्स समूहाची ४० टक्के भागीदारी या कंपनीमध्ये असून राज्य शासनाबरेाबर दहा वर्षाचा करार केलेला आहे. १९९८ मध्ये एर लंकाचे श्रीलंका एरलाइन्स असे नामकरण करण्यात आले.

स्थानके

संपादन

जुलै २०१३ रेाजी श्रीलंका एरलाइन्सची विमाने ३४ शहरांमधील ६४ स्थानकांवरून उड्डाण करत होती. प्रत्येक आठवडयात ३८ उड्डाणांद्वारे माले आणि कोलंबोदरम्यान मोठया संख्येने परकीय नागरिकांना प्रवास घडवून आणणारी विमान वाहतूक कंपनी आहे.

विश्रांतीस्थळ आणि मार्गावरील शहरे

संपादन

विश्रांतीस्थळ

संपादन
  • भंडारनायके आंतरराष्ट्रीय विमानतळ
  • मिहिन लंका, लंकन कार्गो, एक्पो एर आणि सिनामोन एर विमानांचा थांबा आहे.
  • मताला राजपक्ष आंतरराष्ट्रीय विमानतळ
  • बँकॉक, बिजिंग, माले, रियाध आणि शांघायला जाणारी विमाने येथे थांबतात.

मार्गावरील शहरे

संपादन

केलानी नदी – पेलियागोडा वॉटरड्रोम सुवर्णभूमी विमानतळ (बँकॉक)

सांकेतिक करार

संपादन

उड्डाणे

संपादन

एरबस युग

संपादन

१९९२ मध्ये पहिले एरबस ए ३२० - २०० हे विमान मालदीव , पाकिस्तान आणि दक्षिण भारतातील काही राज्यातील मार्गावरून धावले. त्यानंतर १९९४ मध्ये ए ३४० - ३०० हे विमान संपूर्ण आशियामध्ये प्रथमच या कंपनीने प्रवासासाठी वापरले.

फलीट डेव्लपमेंट प्लॅन्स

संपादन

पुढील ४ वर्षामध्ये या कंपनीचा ३०अत्याधुनिक विमाने ताफयात सामावून घेण्याचा मानस आहे. त्याचप्रमाणे भविष्यात एरबस आणि बोईंग अशा ९ नवीन विमानांचा समावेश होणार आहे.[][]

वैमानिकांना प्रशिक्षण

संपादन

एरबस ए ३२० / ३३० विमानांच्या उड्डाणासाठी या कंपनीच्या तसेच श्रीलंकेमधील इतर विमान कंपनीच्या वैमानिकांना प्रशिक्षण देण्यासाठी केंद्र उभारणारी पहिली कंपनी आहे.

चालू उड्डाणे

संपादन
श्रीलंका एरलाइन्स फलीट
विमाने चालू मागणी प्रवासी
एफ जे वाय एकूण
एरबस ए३२०-२०० - २० १२० १४०
- १२ १३८ १५०
एरबस ए ३२१-२०० - १२ १६५ १७७
एरबस ए३३०-२०० - १८ २३६ २५४
- १८ २५६ २७४
- १२ २७५ २८७
- १८ २७९ २९७
एरबस ए ३३०-३०० - -- -- -
एरबस ए३४०-३०० - १८ २९६ ३१४
- १८ २९९ ३१७
- २० २२३ २४३
एरबस ए३५०-९०० -- - - -
डीएचसी - ६- १०० - - १५ १५
एकूण २३ १७

कार्गो

संपादन

माले, मध्यपूर्व, भारत येथे जाण्यासाठी कार्गो विमाने कार्यरत आहेत.

श्रीलंका एर टॅक्सी

संपादन

कॅनेडीयन बांधणीच्या डीएचसी - ६-४०० विमानांच्या सहाय्याने स्थानिक पातळीवर एर टॅक्सी सेवा श्रीलंकेच्या दक्षिण आणि मध्य शहरांमध्ये सुरू केलेली आहे.

लिव्हरी

संपादन

श्रीलंका एरलाइन्सची विमाने सफेद रंगाने रंगविलेले असून त्यावर ‘ श्रीलंकन ’ एरलाइन्स असे मोठया अक्षरामध्ये नांव लिहिलेले आहे. विमानाच्या शेपटीवर लाल , हिरवा व नारिंगी अशा तीन रंगामध्ये अतिशय देखण्या पद्धतीने मोराचे चित्र रंगविलेले आहे.

केबिन

संपादन

प्रथम वर्ग

संपादन

एरबस ए ३३०-३०० आणि एरबस ए ३५० विमानांना प्रथम वर्गाच्या जागा उपलब्ध करून दिलेल्या आहेत.[]

व्यापारी वर्ग

संपादन

व्यापारी वर्गासाठी निळसर रंगाच्या जागा असून त्यांना वेगवेगळया भाषेमधील चित्रपट बघण्याची तसेच आगाउु नोंदणी केल्यास जेवणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

आर्थिक वर्ग

संपादन

या वर्गाच्या प्रवाशांना सॅटलाईट दूरध्वनी तसेच जेवणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

मनोरंजनात्मक सुविधा

संपादन

हॉलीवूडचे प्रसिद्ध चित्रपट, भारतीय चित्रपट बघण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

मान सन्मान आणि यश

संपादन
  • २००८ व २००९ साठी सर्वोत्कृष्ट एरलाईन
  • २०१० साठी सर्वोत्कृष्ट एरलाईन
  • दक्षिण आशियामधील सर्वोत्कृष्ट एरलाईन
  • मध्य आशियामधील सर्वोत्कृष्ट एरलाईन
  • २००४ साठी सर्वांत जास्त टर्नओव्हर प्राप्त एरलाईन
  • एपीईएक्स ॲवॉर्ड
  • केएलआयए ॲवॉर्ड

दुर्घटना आणि अपघात

संपादन

३ मे १९८ ६ रोजी लिबरेशन टायगर्सच्या तामिळ दहशतवादयांनी बंदरनायके आंतरराष्ट्रीय विमानतळावरील यू एल ५१२ विमानामध्ये बॉम्बस्फोट घडवून आणल्यामुळे १२८ पैकी १४ प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले होते.

सध्या श्रीलंकन एरलाइन्सकडे ८ एरबस ए-३२०, ७ एरबस ए-३३०, ६ एरबस ए-३४० अशी एकूण २१ मोठी विमाने वापरात आहेत.

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

संदर्भ

संपादन
  1. ^ "एसी - यूएल कोड शेअर" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "एसआरसी" (इंग्लिश भाषेत). 2013-05-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-11-21 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ "मलेशिया आणि श्रीलंका एरलाईन्सबरोबर सांकेतिक करार" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ "एथिआड बरोबर भागीदारी" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  5. ^ "श्रीलंका आणि एथिआड एरलाईन्सबरोबर भागीदारीतील करार" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: unrecognized language (link)
  6. ^ "श्रीलंका आणि मिहिन लंका यांनी ९ विमाने खरेदी केली" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  7. ^ "श्रीलंका एरलाईन आता नव्या स्वरुपात" (इंग्लिश भाषेत). 2014-05-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-05-06 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  8. ^ "श्रीलंकन एरलाइन्स" (इंग्लिश भाषेत). 2014-07-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-05-06 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)