एरबस ए३५० हे एरबस कंपनीने विकसित केलेले मोठ्या क्षमतेचे लांब पल्ल्याचे विमान आहे.

एरबस ए३५०

ए३५०चे पहिले उड्डाण

प्रकार लांब पल्ल्याचे मोठ्या क्षमतेचे प्रवासी विमान
उत्पादक देश बहुराष्ट्रीय
उत्पादक एरबस
पहिले उड्डाण १४ जून, इ.स. २०१३
समावेश १ जानेवारी, इ.स. २०१५
सद्यस्थिती सेवारत
उपभोक्ते कतार एरवेझ, सिंगापूर एरलाइन्स, कॅथे पॅसिफिक
फिनएर, लुफ्तांसा
उत्पादन काळ इ.स. २०१० -
उत्पादित संख्या ८१ (३० एप्रिल, २०१७
एकूण कार्यक्रमखर्च ११ अब्ज युरो
प्रति एककी किंमत २७ कोटी ५१ लाख युरो (-८००)
३१ कोटी १२ लाख युरो (-९००)
३५ कोटी ९३ लाख युरो (-१०००)

या विमानाचे सुरुवातीस ए३३०ला नवीन इंजिने व सुधारित वायुअवरोधक रचनेसह तयार करण्याचे बेत होते परंतु भावी गिऱ्हाइकांनी याबद्दल नापसंती जाहीर केल्यावर २००६ मध्ये पूर्ण विमानाची पुनर्रचना करण्यात आली व त्यास ए३५० एक्सडब्ल्यूबी (एक्सट्रा वाइड बॉडी) असे नाव देण्यात आले. या विमानाच्या रचनेवर ११ अब्ज युरो खर्च आला. मे २०१७ च्या सुमारास ४७ गिऱ्हाइकांनी ८५१ नगांची मागणी नोंदवलेली होती. या विमानाचे पहिले उड्डाण १४ जून, २०१३ रोजी झाले तर पहिले प्रवासी उड्डाण १५ जानेवारी, २०१५ रोजी झाले.

उपप्रकार

संपादन
 
ए३५० च्या उपप्रकारांचा आकार. -८०० रद्द केलेला उपप्रकार आहे

ए३५० च्या -८००, -९०० आणि -१००० अशा तीन उपप्रकारांची आखणी २००६मध्ये एकत्रितपणे सुरू झाली. हे सगळे २०१३मध्ये सेवारत होणे अपेक्षित होते.[] २०११ च्या पॅरिस एरशो मध्ये एरबसने -१०००ची सेवारत तारीख २०१७पर्यंत पुढे ढकलली[] आणि जुलै २०१२ मध्ये -९००ची तारीख २०१४ पर्यंत पुढे नेली.[] शेवटी -९०० १५ जानेवारी, २०१५ रोजी ए३५० चे पहिले व्यावसायिक उड्डाण कतार एरवेझने दोहामधील हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळापासून फ्रांकफुर्टपर्यंतचे केले.[]

ऑक्टोबर २०१२ मध्ये सेवारत होऊ घातलेल्या -८०० उपप्रकाराची तारीख २०१४ पर्यंत ढकलत जाउन शेवटी हा उपप्रकारच रद्द झाला.[] त्यावर काम करणारी माणसे आणि यंत्रसामग्री एरबसने ए३३० निओच्या आखणीत जुंपली.[]

याच वेळी एरबसने एसीजे३५० हा खाजगी वापरासाठीचा उपप्रकारही विकण्यास काढला. यांत २५ प्रवाशांना २०,००० किमी (१२,४०० मैल) नेण्याची सोय असणार होती.[]

ए३५०-९००

संपादन
 
ए३५०-९०० प्रकारचे पहिले विमान

ए३५०-९०० (विमानसंकेत: ए३५९) हा या विमानाचा पहिला उपप्रकार आहे. याची क्षमता ३२५ प्रवाशांना १५,००० किमी (९,३०० मैल) नेण्याची आहे.[] हा प्रकार एरबस ए३४०-५००च्या बरोबरीचा आसून बोईंग ७७७-२००एलआर आणि ७८७-१०००चा प्रतिस्पर्धी आहे.[]

ए३५०-९००यूएलआर

संपादन

ए३५०-९०० प्रादेशिक

संपादन

ए३५०-एसीजे

संपादन

ए३५०-१०००

संपादन

क्वांटास प्रोजेक्ट सनराइझ

संपादन

ए३५०-१०००एफ

संपादन

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
  1. ^ "A350 XWB Family receives industrial go-ahead" (Press release). Airbus S.A.S. 1 December 2006. 3 October 2012 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 23 May 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "PARIS: A350-1000 delayed to 2017 as Rolls raises XWB thrust". Flightglobal. 19 June 2011. 10 February 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 10 February 2016 रोजी पाहिले.
  3. ^ "Airbus delays A350 XWB entry as EADS profits triple". BBC. 27 July 2012. 19 August 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 20 June 2018 रोजी पाहिले.
  4. ^ "A350 enters service as Qatar jet heads for Frankfurt". Flight International. 15 January 2015. 15 January 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 15 January 2015 रोजी पाहिले.
  5. ^ "Airbus advances towards first flight of A350 twinjet". Flight International. 23 October 2012. 6 October 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 7 December 2012 रोजी पाहिले.
  6. ^ "Al Baker expects A350s to be on schedule". Flightglobal. 17 September 2014. 5 March 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 10 February 2016 रोजी पाहिले.
  7. ^ "ACJ350 XWB – Airbus, a leading aircraft manufacturer". 19 January 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  8. ^ "A350-900 specs". Airbus. 25 June 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 25 June 2018 रोजी पाहिले.
  9. ^ "The Market for Large Commercial Jet Transports 2011–2020" (PDF). Forecast International. July 2011. 29 September 2011 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 26 July 2009 रोजी पाहिले.