विमान
विषय प्रवेश
संपादनविमान हे आजच्या जगातील एक महत्त्वाचे जलद दळणवळणाचे साधन बनले आहे. प्रवासी, माल, युद्धसाहित्य इत्यादींची वाहतूक करण्यासाठी विमानाचा परिणामकारक वापर करता येतो. विमान आकाशात उडण्यासाठी व आकाशातून उतरण्यासाठी विमानतळाचा वापर होतो.
ओळख
संपादनविमानाची ढोबळ रूपरेषा, विमानाचे धड, पंख आणि शेपूट अशी विभागता येते. धडामध्ये प्रवासी, माल, तथा युद्धसाहित्य, तसेच वैमानिक कक्ष, इंधन, नियंत्रणसाधने असतात. पंखांचा मुख्य उपयोग तरंगणे, उड्डाण, वळणे यासाठी होतो. शेपूट मुख्यतः वळण्यासाठी वापरले जाते.
उडण्याचे तत्त्व
संपादनविमानाच्या पंखांचा आकार विशिष्ठ प्रकारचा (Aerofoil) असतो. विमानाने जमीनीवर धावताना वेग घेतला की पंखांखालील हवेचा दाब पंखांवरील हवेच्या दाबापेक्षा जास्त होतो आणि विमान हवेत उडू लागते.
◆इतिहास.
संपादनपौराणिक काळापासूनच धार्मिक/आध्यात्मिक ग्रंथात /पुस्तकात उडत्या गोष्टींचा उल्लेख सापडतो. रामायणातील प्रसिद्ध 'पुष्पक' विमान असे विविध उल्लेख प्राचीन भारतीय इतिहासात सापडतात.आणि महर्षी भरद्वाज यांनी वेग-वेगळे विमान कसे बनवावे यावर ५००० वर्षांपूर्वी पुस्तक ही लिहिले आहे.
आधुनिक काळात विमानाचा शोध हे शिवकर बापूजी तळफदे यांनी साल १८९५ मध्ये लावला. तेही भारतातील ५००० वर्ष पूर्वी महर्षी भरद्वाज यांच्या हत्ते लिखित पुस्तकातून तयार केला. जो १५०० फूट उंच उडाला.पण जगामध्ये राईट ब्रदर्स यांना याचा शोध करता म्हणून ओळखले जाते. पण हे पूर्णपणे चुकीचे आहे. त्याकाळी इंग्रजांची भारतावर सत्ता होती अन् शिवकर बापूजी तळफदे यांना फसवून विमानाची माहिती युरोप मध्ये नेहली अन् तीतून अमेरिकेत आली मग या राईट ब्रदर्स यांच्या हातात आली,त्यांनी विमानची नकल करून १९०३ मध्ये विमान १०० फूट उंच उडवली अन् ही शोध स्वतःच्या नावाने करून घेतले.
विमानांचे वर्गीकरण
संपादनविमानांचे वर्गीकरण अनेक प्रकारे करता येते.
उपयोगानुसार:
संरचनेनुसार:
- पंखयुक्त (फिक्स्ड विंग)
- शिरचक्रयुक्त (रोटेटिंग विंग)
- (गायरो?)
वेगानुसार:
- स्वनातीत (सुपर सॉनिक)
शक्तीस्रोतानुसार:
- दट्ट्यायंत्र (प्रॉपेलर)
- उष्णवायुझोतयंत्र (जेट)
उड्डाणतत्त्वानुसार:
- हवेपेक्षा जड (नेहमीचे विमान)
- हवेपेक्षा हलके (वायुफुगा)
बाह्य दुवे
संपादनविमानाच्या ब्लॅकबॉक्स बद्दल माहिती Archived 2010-06-01 at the Wayback Machine.
- विमान आपत्कालिन कसे उतरवितात? Archived 2010-06-03 at the Wayback Machine.