जानेवारी १
दिनांक
(१ जानेवारी या पानावरून पुनर्निर्देशित)
<< | जानेवारी २०२४ | >> | |||||
सो | मं | बु | गु | शु | श | र | |
१ | |||||||
२ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ | |
९ | १० | ११ | १२ | १३ | १४ | १५ | |
१६ | १७ | १८ | १९ | २० | २१ | २२ | |
२३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ | २९ | |
३० | ३१ |
जानेवारी १ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १ वा किंवा लीप वर्षात १ वा दिवस असतो.
ख्रिस्ती नववर्षारंभ
ठळक घटना आणि घडामोडी
संपादन१ जानेवारीचे दिनविशेष Archived 2009-02-19 at the Wayback Machine.
पंधरावे शतक
संपादनसोळावे शतक
संपादनअठरावे शतक
संपादन- १७५६ - डेन्मार्कने निकोबार बेटे काबीज करून त्यांना न्यू डेन्मार्क असे नाव दिले.
- १७८८ - द टाइम्स या लंडनहून प्रकाशित होणाऱ्या वृत्तपत्राची पहिली आवृत्ती उपलब्ध.
एकोणिसावे शतक
संपादन- १८०८ - अमेरिकेत गुलामांच्या आयातीस बंदी घालण्यात आली.
- १८१८ - भीमा कोरेगाव येथे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कॅप्टन. एफ.एफ. स्टॉंटन यांच्या नेतृत्वाखालील बॉंबे नेटिव्ह इन्फन्ट्री बटालियनने २५,००० संख्याबळाच्या पेशवे सैन्याचा पराभव केला.
- १८४२ - बाबा पद्मनजी यांचे ज्ञानोदय वृत्तपत्र सुरू झाले.
- १८४८ - महात्मा फुले यांनी पुणे येथे भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली.
- १८६२ - इंडियन पीनल कोड अस्तित्वात आले.
- १८८० - विष्णूुास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गो.ग. आगरकर आणि माधवराव नामजोशी यांनी पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूल, पुणेची स्थापना केली.
- १८८३ - पुणे येथे नूतन मराठी विद्यालयाची स्थापना
- १८९९ - क्युबामधील स्पेनची राजवट संपुष्टात आली.
विसावे शतक
संपादन- १९०८ - संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी हुबळी येथे ललित कलादर्श ही नाटक कंपनी स्थापन केली.
- १९०८ - पुण्याच्या कृषी महाविद्यालयाची स्थापना.
- १९१९ - गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अॅक्ट १९१९ द्वारे भारतात कायदेमंडळे स्थापन झाली.
- १९२३ - चित्तरंजन दास आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वराज्य पार्टीची स्थापना केली.
- १९३२ - डॉ. ना.भि. परूळेकर यांनी सकाळ वृत्तपत्र हे सुरू केले.
- १९५९ - क्युबामध्ये फिडेल कॅस्ट्रोच्या नेतृत्वाखालील क्रांतिकारकांचा राजधानी हवानावर ताबा.
- १९७८ - सम्राट अशोक हे बोईंग ७४७-२०० प्रकारचे विमान मुंबई विमानतळावरून उड्डाण करीत असताना समुद्रात कोसळले.
एकविसावे शतक
संपादन- २००२ - युरोपीय महासंघातील १२ देशांत युरो चलन अमलात आले. मानवी इतिहासातील हा सर्वात मोठा चलनबदल होता.
- २०१० - आत्मघातकी दहशतवाद्याने पाकिस्तानच्या लक्की मारवात गावात चालू असलेल्या व्हॉलीबॉल स्पर्धेच्या ठिकाणी कारबॉम्ब स्फोट केला. १०५ ठार, १०० जखमी.
- २०१३ - कोट दि आईव्होरच्या आबिजान शहरात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जमलेल्या गर्दीत चेंगराचेंगरी होऊन ६० व्यक्ती ठार, २०० जखमी..
जन्म
संपादन- १६६२ - बाळाजी विश्वनाथ भट, पेशवा.
- १८९२ - महादेव हरिभाई देसाई गांधीवादी कार्यकर्ते.
- १८९४ - सत्येंद्रनाथ बोस भारतीय भौतिकशास्त्रज्ञ.
- १९०० - श्रीकृष्ण नारायण रातंजनकर, आग्रा घराण्याचे गायक, शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक व संगीत गुरू
- १९०२ - कमलाकांत वामन केळकर भारतीय भूवैज्ञानिक.
- १९१८ - शांताबाई दाणी, सामाजिक कार्यकर्त्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायी
- १९२३ - उमा देवी खत्री उर्फ टुनटुन, अभिनेत्री व गायिका
- १९२८ - डॉ. मधुकर आष्टीकर, लेखक आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष.
- १९३६ - राजा राजवाडे साहित्यिक
- १९४१ - गोवर्धन असरानी ऊर्फ असरानी, चित्रपट अभिनेता.
- १९४३ - रघुनाथ माशेलकर, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक.
- १९५० - दीपा महेता, भारतीय वंशाच्या कॅनेडियन दिग्दर्शिका आणि पटकथालेखिका.
- १९५१ - नाना पाटेकर, चित्रपट अभिनेता.
- १९७८ - विद्या बालन, हिंदी चित्रपट अभिनेत्री.
मृत्यू
संपादन- १७४८ - योहान बर्नोली, स्विस गणितज्ञ.
- १९४४ - सर एडविन लुटेन्स, नवी दिल्लीचे नगररचनाकार.
- १९५५ - शांतिस्वरूप भटनागर भारतीय रसायनशास्त्रज्ञ.
- १९७५ - शंकरराव वासुदेव किर्लोस्कर, मराठी उद्योजक, साहित्यिक व चित्रकार.
- २००५ - कुसुमताई पटवर्धन, समाजवादी नेत्या.
प्रतिवार्षिक पालन
संपादन- धूम्रपान विरोधी दिन
- आंग्ल नववर्ष दिन
- जागतिक शांतता दिन
- राष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन : ब्रुनेई, हैती, सुदान
- आर्मी मेडिकल स्थापना दिवस
डिसेंबर ३० - डिसेंबर ३१ - जानेवारी १ - जानेवारी २ - जानेवारी ३ - (जानेवारी महिना)
बाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर जानेवारी १ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)