हॉलीबॉल (इंग्लिश: Volleyball) हा एक सांघिक खेळ आहे. ह्यामध्ये प्रत्येकी ६ खेळाडू असलेले दोन संघ उंच जाळी लावलेल्या कोर्टवर एकमेकांविरुद्ध खेळतात. प्रत्येक संघ बॉल दुसऱ्या संघाच्या कोर्टमध्ये ढकलून टप्पा पाडण्याचा प्रयत्न करतो.मैदानाची लांबी १८ मीटर आणि रुंदी ९ मीटर असते.

Vhollyball
व्हॉलीबॉलमधील एक खेळी

व्हॉलीबॉल खेळ सर्वप्रथम इ.स. १८९५ साली अमेरिकेच्या मॅसेच्युसेट्स राज्यामध्ये खेळला गेला. १९६४ सालापासून हा खेळ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये खेळला जात आहे.

बीच व्हॉलीबॉल हा व्हॉलीबॉलचा एक लोकप्रिय प्रकार आहे. आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल महामंडळ (Fédération Internationale de Volleyball) ही लोझान येथे मुख्यालय असलेली संस्था व्हॉलीबॉलचे नियंत्रण करते.

बाह्य दुवे

संपादन