जानेवारी ७
दिनांक
<< | जानेवारी २०२४ | >> | |||||
सो | मं | बु | गु | शु | श | र | |
१ | |||||||
२ | ३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ | |
९ | १० | ११ | १२ | १३ | १४ | १५ | |
१६ | १७ | १८ | १९ | २० | २१ | २२ | |
२३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ | २९ | |
३० | ३१ |
जानेवारी ७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ७ वा किंवा लीप वर्षात ७ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनपंधरावे शतक
संपादनसोळावे शतक
संपादनसतरावे शतक
संपादन- १६१०-गुरूचे आयो, युरोपा, गॅनिमीड व कॅलिस्टो हे चार चंद्र गॅलिलिओने दुर्बिणीद्वारे शोधले.
- १६८० - मुंबई कौन्सिलने शिवाजी महारांजाबरोबर करायच्या कराराचा मसुदा तयार केला.
अठरावे शतक
संपादन- १७८९ - अमेरिकेतील राष्ट्रध्यक्षपदाच्या पहिल्या निवडणुकीत जॉर्ज वॉशिंग्टन विजयी.
एकोणिसावे शतक
संपादनविसावे शतक
संपादन- १९२२ - पंजाब केसरी लाला लजपतराय आणि त्यांचे सहकारी पंडित संतनाम यांना राजद्रोहाच्या आरोपावरून १८ महिन्यांची शिक्षा झाली.
- १९२७ - न्यू यॉर्क ते लंडन अशी अटलांटिक महासागर पार करणारी दूरध्वनीसेवा सुरू झाली.
- १९३५ - कोलकाता येथे इंडियन नॅशनल सायन्स अॅकेडमीचे (INSA) उद्घाटन झाले. पुढे १९५१ मधे तिचे मुख्यालय दिल्लीला हलवण्यात आले.
- १९५९ - क्यूबातील फिडेल कॅस्ट्रो यांच्या सरकारला अमेरिकेने मान्यता दिली.
- १९६८ - अमेरिकेचे सर्वेक्षक यान चंद्राच्या टायको या विवराच्या किनारी उतरले.
- १९७२ - कन्याकुमारी येथील विवेकानंद केन्द्राचे काम पूर्ण झाले.
- १९७८ - एम.व्ही. चंद्रगुप्त ही मालवाहू नौका ६९ कर्मचाऱ्याांसह होनोलुलूजवळील महासागरात बेपत्ता झाली.
- १९७९ - कंबोडियामध्ये हुकूमशहा पॉल पॉट आणि ख्मेर रूजच्या क्रूर सत्तेचा अंत.
- १९८० - आणीबाणीनंतरच्या पराभवानंतर इंदिरा गांधी प्रचंड बहुमताने पुन्हा विजयी झाल्या व केंद्रात पुन्हा काँग्रेसचे सरकार स्थापन झाले.
- १९८८ - विश्वनाथन आनंदने बुद्धिबळात ग्रॅंडमास्टर दर्जा मिळवला.
एकविसावे शतक
संपादन- २००१ - २१० मेगावॉटचा प्रकल्प खापरखेडा औष्णिक केंद्राकडून ४० महिन्यांत पूर्ण.
- २०१५ - पॅरिसमध्ये शार्ली एब्दो ह्या उपरोधिक नियतकालिकावर दहशतवादी हल्ला; संपादक व प्रमुख व्यंगचित्रकारांसह १२ मृत.
जन्म
संपादन- १५०२ - पोप ग्रेगोरी तेरावा
- १७८९ - आइल्हार्ड मिट्शेर्लिख - रसायनशास्त्रज्ञ. बेंझिन व मिथिल या रसायनांचा शोधक .
- १८०० - मिलार्ड फिलमोर, अमेरिकेचा तेरावा राष्ट्राध्यक्ष.
- १८२७ - सर सॅंडफोर्ड फ्लेमिंग, केनेडियन अभियंता.
- १८५८ - एलीझर बेन-येहुदा, हिब्रू भाषातज्ञ.
- १८८५ - माधव नारायण जोशी, मराठी नाटककार
- १८९३ - जानकीदेवी बजाज, भारतीय स्वातंत्र्यसेनानी.
- १९१० - फैझ अहमद फैझ, उर्दू कवी.
- १९१२ - चार्ल्स अॅडाम्स - न्यू यॉर्कचा व्यंगचित्रकार.
- १९२० - सरोजिनी बाबर - लोकसाहित्याच्या अभ्यासक.लेखिका, संतसाहित्याच्या अभ्यासिका व राजकारणी
- १९२१ - चंद्रकांत गोखले, मराठी रंगभूमी नट व चित्रपट अभिनेता.
- १९२५ - जोराल्ड डरेल, निसर्ग लेखक.
- १९२५ - प्रभात सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांची कन्या.
- १९२८ - विजय तेंडुलकर, मराठी पत्रकार व साहित्यिक.
- १९४५ - रैला ओडिंगा, केन्याचा पंतप्रधान.
- १९४८ - शोभा डे, भारतीय लेखिका.
- १९५० - जॉनी लिव्हर, भारतीय अभिनेता.
- १९६१ - सुप्रिया पाठक, अभिनेत्री.
- १९६४ - निकोलस केज, अमेरिकन अभिनेता.
- १९७९ - बिपाशा बासू, भारतीय चित्रपट अभिनेत्री.
मृत्यू
संपादन- १९८९ - मिचियोमिया हिरोहितो, जपानचे सम्राट.
- २००० - डॉ. अच्युतराव आपटे, विद्यार्थी सहायक समितीचे संस्थापक व स्वातंत्र्यसैनिक.
प्रतिवार्षिक पालन
संपादनसंदर्भ
संपादन
बाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर जानेवारी ७ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
जानेवारी ५ - जानेवारी ६ - जानेवारी ७ - जानेवारी ८ - जानेवारी ९ - (जानेवारी महिना)