इ.स. १९६८
इसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १९४० चे - १९५० चे - १९६० चे - १९७० चे - १९८० चे |
वर्षे: | १९६५ - १९६६ - १९६७ - १९६८ - १९६९ - १९७० - १९७१ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
संपादन- जानेवारी ३० - व्हियेतनाम युद्ध - टेटचा हल्ला सुरू.
- जानेवारी ३१ - व्हियेतकॉंगने सैगोनमधील अमेरिकन राजदूतावासावर हल्ला केला.
- जानेवारी ३१ - नौरूला ऑस्ट्रेलिया पासून स्वातंत्र्य.
- फेब्रुवारी ६ - फ्रांसमध्ये ग्रेनोबल येथे दहावे हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू.
- फेब्रुवारी २४ - व्हियेतनाम युद्ध-टेटचा हल्ला - दक्षिण व्हियेतनामने ह्युए शहर जिंकले.
- एप्रिल ११ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष लिन्डन बी. जॉन्सनने इ.स. १९६८ च्या नागरी हक्क कायद्यावर सही केली. या कायद्यानुसार घराच्या खरेदी, विक्री, ई. व्यवहारात वंशानुसार भेदभाव करणे कायदेबाह्य ठरले.
- एप्रिल २० - साउथ आफ्रिकन एअरवेझचे बोईंग ७०७ जातीचे विमान विंडहोक शहराजवळ कोसळले. १२२ ठार.
- एप्रिल २० - पिएर ट्रुडु कॅनडाच्या पंतप्रधानपदी.
- एप्रिल २४ - मॉरिशियसला संयुक्त राष्ट्रांचे सभासदत्त्व.
- मे २२ - अमेरिकेची परमाणुचलित पाणबुडी यु.एस.एस. स्कॉर्पियन एझोर्स बेटांजवळ ९९ खलाशी व अधिकाऱ्यांसहित बुडाली.
- मे २४ - पॅरिसमध्ये निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांनी तेथील शेरबाजाराला आग लावली.
- मे २४ - कॅनडाच्या क्विबेक सिटीतील अमेरिकन वकिलातीवर बॉम्बहल्ला.
- जून ६ - आदल्या दिवशी लागलेल्या गोळीने रॉबर्ट एफ. केनेडीचा मृत्यू.
- जून ८ - मार्टिन ल्युथर किंगच्या खुनाबद्दल जेम्स अर्ल रेला अटक.
- जुलै १० - मॉरिस कुव्ह दि मुरव्हिल फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
- जुलै १८ - इंटेल कंपनीची स्थापना.
- ऑगस्ट १ - हसनल बोल्कियाह ब्रुनेइचा राज्याभिषेक.
जन्म
संपादन- फेब्रुवारी १८ - विष्णु मनोहर, भारतीय आचारी
- मार्च ११ - जॉन बॅरोमन, अभिनेता.
- एप्रिल १९ - म्स्वाती तिसरा, स्वाझीलॅंडचा राजा.
- ऑगस्ट ८ - अबेय कुरूविला, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- ऑगस्ट १५ - डेब्रा मेसिंग, अमेरिकन अभिनेत्री.
- सप्टेंबर १ - मोहम्मद अट्टा, सप्टेंबर ११, २००१ च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार.
- सप्टेंबर १३ - चंडिका हथुरासिंघे, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- ऑक्टोबर २ - याना नोव्होत्ना, चेक टेनिस खेळाडू.
मृत्यू
संपादन- फेब्रुवारी ११ - पंडित दीनदयाळ उपाध्याय, भारतीय जनसंघाचे अध्यक्ष.
- मे ३० - सावळाराम लक्ष्मण हळदणकर, मराठी चित्रकार.
- जुलै २८ - ऑट्टो हान, जर्मन रसायनशास्त्रज्ञ.