एप्रिल ११
दिनांक
एप्रिल ११ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १०१ वा किंवा लीप वर्षात १०२ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनतेरावे शतक
संपादनएकोणिसावे शतक
संपादनविसावे शतक
संपादन- १९१९ - इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनची स्थापना झाली.
- १९३० - ऋषिकेश येथील राम झुला लोकांसाठी खुला करण्यात आला.
- १९३० - पंडित मोतीलाल नेहरु यांनी आनंदभवन आपले घर राष्ट्राला दिले.
- १९४५ - दुसरे महायुद्ध - अमेरिकेच्या सैन्याने बुखेनवाल्ड कॉॅंसेन्ट्रेशन कॅम्प मधून कैद्यांची मुक्तता केली.
- १९५१ - कोरियन युद्ध - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रुमनने जनरल डग्लस मॅकआर्थरकडून सरसेनापतीपद काढून घेतले.
- १९५५ - चीनच्या नेता झू एनलै मारण्याच्या प्रयत्नात एर इंडियाच्या काश्मीर प्रिन्सेस विमानात स्फोट होउन विमान दक्षिण चीन समुद्रात कोसळले.
- १९५७ - सिंगापूर युनायटेड किंग्डमपासून स्वतंत्र झाले.
- १९६१ - बॉब डिलनने आपली गायकीची सुरुवात केली.
- १९६५ - अमेरिकेच्या मध्य भागात ५१ टोर्नेडोंचा उत्पात. २५६ ठार.
- १९६८ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष लिन्डन बी. जॉन्सनने इ.स. १९६८ च्या नागरी हक्क कायद्यावर सही केली. या कायद्यानुसार घराच्या खरेदी, विक्री, ई. व्यवहारात वंशानुसार भेदभाव करणे कायदेबाह्य ठरले.
- १९७० - अपोलो १३चे प्रक्षेपण.
- १९७६ - ऍपल कंपनीचे ऍपल १ हा संगणक विकला जाण्यास सुरुवात झाली.
- १९७९ - युगांडाचा हुकुमशहा ईदी अमीन पदच्युत.
- १९८१ - दक्षिण लंडनच्या ब्रिक्स्टन भागात हिंसा. ६५ नागरिक व ३०० पोलीस जखमी.
- १९८६ - हॅलेचा धूमकेतू पृथ्वी पासून साडेसहा कोटी किलोमीटर अंतरावरून गेला.
- १९९९ - अग्नी-२ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी.
एकविसावे शतक
संपादन- २००२ - ट्युनिसीयात अल कायदाकडून बॉम्बहल्ला. २१ ठार.
- २००२ - व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्ष ह्युगो चावेझविरुद्ध फसलेला उठाव सुरू.
जन्म
संपादन- १४६ - सेप्टिमियस सेव्हेरस, रोमन सम्राट.
- १३५७ - होआव पहिला, पोर्तुगालचा राजा.
- १७५५ - जेम्स पार्किन्सन, इंग्लिश डॉक्टर.
- १७७० - जॉर्ज कॅनिंग, युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान.
- १८२७ - जोतीबा फुले, भारतीय विचारवंत, समाजसुधारक.
- १८६९ - कस्तुरबा गांधी, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, महात्मा गांधींच्या पत्नी
- १८८७ - जेमिनी रॉय, भारतीय चित्रकार.
- १९०४ - के.एल्. सैगल, हिंदी भाषा पार्श्वगायक
- १९०६ - डॉ. सुमित्र मंगेश कत्रे, संस्कृत, प्राकृत, कोकणी या भाषांचे अभ्यासक.
- १९०८ मासारू इबुका, सोनी कंपनीचे सहसंस्थापक.
- १९३७ रामनाथन कृष्णन, भारतीय टेनिस खेळाडू.
- १९५१ रोहिणी हट्टंगडी, भारतीय अभिनेत्री.
- १९५३ - गाय व्हेरोफ्श्टाट, बेल्जियमचा पंतप्रधान.
- १९६३ - बिली बाउडेन, क्रिकेट पंच.
मृत्यू
संपादन- १०३४ - रोमानस तिसरा, बायझेन्टाईन सम्राट.
- १६१२ - इमॅन्युएल फान मेटरेन, फ्लेमिश इतिहासकार.
- १९२६ - ल्यूथर बरबँक, अमेरिकन वनस्पतिशास्त्रज्ञ आणि कृषितज्ज्ञ.
- १९६७ - डोनाल्ड सॅंगस्टर, जमैकाचा पंतप्रधान.
- १९७७ - फणीश्वर नाथ रेणू, भारतीय लेखक.
- २००० - कमल समर्थ ऊर्फ कमल रणदिवे, भारतीय कर्करोग संशोधक.
- २००३ - सेसिल हॉवर्ड ग्रीन, टेक्सास इन्स्ट्रूमेंट्सचे स्थापक.
- २००९ - विष्णू प्रभाकर, भारतीय साहित्यिक.
- २०१५ - हनुतसिंग राठोड, भारतीय सेनापती.
प्रतिवार्षिक पालन
संपादन- हुआन सांतामारिया दिन - कॉस्टा रिका.
- जागतिक पार्किन्सन दिवस
- भारतीय रेल्वे सप्ताह
बाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर एप्रिल ११ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
एप्रिल ८ - एप्रिल ९ - एप्रिल १० - एप्रिल ११ - एप्रिल १२ - (एप्रिल महिना)