हॅरी ट्रुमन
हॅरी एस. ट्रुमन (मे ८, १८८४ - डिसेंबर २६, १९७२) हे अमेरिकेचे ३३ वे राष्ट्राध्यक्ष होते. ट्रुमन हे इ.स. १९४५ ते इ.स. १९५३ पर्यंत राष्ट्राध्यक्षपदावर होते.
हॅरी एस. ट्रुमन | |
सही |
---|
परिचय
संपादनराजकारणात प्रवेश करण्यापूर्वी ते शेतकरी आणि व्यापारी होते. इ.स. १९२० साली त्यांनी राजकारणात प्रवेश केला.डेमॉक्रॅटिक पक्षाचे उमेदवार म्हणून सर्वप्रथम इ.स. १९३४ मध्ये सिनेटवर निवडून गेले. राष्ट्राध्यक्ष होण्याआधी ते फ्रँकलिन डिलानो रूझवेल्टच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या काळात इ.स. १९४४ मध्ये उपराष्ट्राध्यक्ष झाले व रूझवेल्टच्या मृत्यूनंतर इ.स. १९४५ साली आपोआप राष्ट्राध्यक्षपदावर आले.
कामगिरी
संपादनजपानवर अणुबाँब टाकण्याचा निर्णय यांनीच घेतला होता. साम्यवादाच्या प्रसाराच्या विरोधात इ.स. १९५० मध्ये कोरियामध्ये अमेरिकी सैन्य पाठवले. सोव्हियत रशिया व अमेरिकेतील शीतयुद्धाचा प्रारंभ हॅरी ट्रुमन यांच्या काळातच झाला.
हे सुद्धा पहा
संपादनबाह्य दुवे
संपादन- "व्हाइट हाउस संकेतस्थळावरील अधिकृत परिचय" (इंग्लिश भाषेत). 2015-01-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-09-25 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती फेब्रुवारी ७, २००९ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)
- "हॅरी ट्रुमन: अ रिसोर्स गाइड (हॅरी ट्रुमन: संसाधनांची मार्गदर्शिका)" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |