एप्रिल २३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ११३ वा किंवा लीप वर्षात ११४ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा

सतरावे शतक

 • १६३५: अमेरिकेतील पहिली सार्वजनिक शाळा बोस्टन लॅटिन स्कूल स्थापन झाली.

अठरावे शतकसंपादन करा

एकोणिसावे शतकसंपादन करा

 • १८१८: दोनशे युरोपियन व दोनशे एतद्देशीय शिपायांसह इंग्रज अधिकारी मेजर हॉल यास कर्नल प्रॉयर याने रायगड किल्ल्याची टेहळणी करण्यास पाठविले. [चैत्र व. ३]

विसावे शतकसंपादन करा

 • १९२७ : 'बालदिना'ची सुट्टी साजरी करणारा टर्की हा पहिला देश ठरला.
 • १९४२ : हिटलरपासून सुटका मिळवण्यासाठी अमेरिकेत स्थायिक झालेला ज्यूवंशी लेखक श्टेफान झ्वाईग आणि त्याची पत्नी यांनी आत्महत्या केली (२२ किंवा २३ एप्रिल). वाढती असहिष्णुता, वर्चस्ववाद आणि नाझी विचार यांमुळे मानवजातीच्या भविष्याविषयी सर्व आशा संपुष्टात आल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. "I think it better to conclude in good time and in erect bearing a life in which intellectual labour meant the purest joy and personal freedom the highest good on Earth"
 • १९६७ : अंतराळवीर व्लादिमिर कोमारोव्ह याला घेऊन रश्याचे अंतराळयान सोयुझ-१ अंतराळात.
 • १९७१ : रझाकार आणि पाकिस्तानी सैन्याने तत्कालीन पूर्व पाकिस्तान (आता बांग्लादेश) मध्ये ३००० हिंदूंची कत्तल केली.
 • १९८४ : एड्स होण्यामागे कारणीभूत असणाऱ्या एच.आय.व्ही. विषाणूचा शोध.
 • १९९०: नामिबियाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
 • १९९३ : मतदान करून एरित्रियनांनी इथिओपियापासून स्वातंत्र्याचा कौल दिला.

एकविसावे शतकसंपादन करा

 • २००५ : 'यूट्यूब'चा सहनिर्माता जावेद करीम याने पहिला व्हिडीओ यूट्यूबवर चढवला.

जन्मसंपादन करा

मृत्यूसंपादन करा

 • १६१६: विल्यम शेक्सपिअर – इंग्लिश नाटककार आणि अभिनेता. युनेस्कोने घेतलेल्या पुढाकारामुळे विल्यम शेक्सपिअर यांच्या सन्मानार्थ १९९५ पासून आजचा दिवस हा ’जागतिक पुस्तक दिन’ म्हणून साजरा केला जातो.
 • १८५०: काव्यातील स्वच्छंदतावादाचे प्रणेते इंग्लिश कवी विल्यम वर्डस्वर्थ
 • १९२६: ब्रिटिश वनस्पतिशास्त्रज्ञ हेन्री बी. गुप्पी
 • १९५८: निष्ठावान समर्थभक्त, समर्थ वाङ्‌मयाचे आणि संप्रदायाचे अभ्यासक व प्रकाशक शंकर श्रीकृष्ण देव
 • १९८६: इंग्लिश क्रिकेट खेळाडू जिम लेकर
 • १९९२: ख्यातनाम चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक सत्यजित रे
 • १९९७: इंग्लिश क्रिकेटपटू डेनिस कॉम्पटन
 • २०००: ४० वर्षे लालबागमधील भारतमाता चित्रपटगृह चालवणारे बाबासाहेब भोपटकर
 • २००१: जयंत श्रीधर तथा जयंतराव टिळक – संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे एक नेते, गोवा मुक्ती संग्रामातील एक झुंजार सेनापती, लोकमान्य टिळकांचे नातू, राजकारण, समाजकारण, साहित्य, पत्रकारिता, तत्त्वज्ञान, विज्ञान, निसर्ग आणि शिकार इ. विविध क्षेत्रांमधे दीर्घकाळ सक्रिय असणारे महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष व केसरीचे संपादक

प्रतिवार्षिक पालनसंपादन करा

 • जागतिक पुस्तक दिन
 • जागतिक प्रताधिकार दिवस
 • संयुक्त राष्ट्रांचा इंग्रजी भाषा दिन

बाह्य दुवेसंपादन करा


एप्रिल २१ - एप्रिल २२ - एप्रिल २३ - एप्रिल २४ - एप्रिल २५ - (एप्रिल महिना)