रझाकार

निःसंदिग्धीकरण पाने

रझाकर (उर्दू:رضا کار) हा एक अरबी शब्द आहे ज्याचा शाब्दिक अर्थ 'स्वयंसेवक' असा आहे. हा शब्द उर्दू भाषेत सुद्धा वापरला जातो. दुसरीकडे बांगलादेशात, रझाकार हा शब्द हीन भावनेतून वापरला जातो, तेथे ज्याचा अर्थ 'देशद्रोही' किंवा यहूदा असा होतो. []

हैदराबाद मधील प्रचलन

संपादन

हैदराबादचा शेवटचा निझाम मीर उस्मान अली खान याने हैदराबाद संस्थान भारतात विलीन होण्यापासून वाचवण्यासाठी कासीम रझवीच्या नेतृत्वाखाली एक क्रूर अर्धसैनिक दल स्थापन केले होते. या दलास त्यावेळेस रझाकार असे संबोधले जात असे.[] हैदराबादच्या या रझाकार दालने तेथील बहुसंख्यांक हिंदूंवर अत्याचार करताना क्रौर्याची परिसीमा गाठली होती. अत्याचाराची तुलना क्रूरकर्मा हिटलरच्या नाझी सैन्याशी केली जाते. त्यामुळे आजही मराठवाडा आणि तेलंगणात या शब्दाकडे शिवी या भावनेने पाहिल्या जाते.[][]

 
कासीम रझवी

बांगलादेशामधील प्रचलन

संपादन

बांगलादेशाचे स्वातंत्र्ययुद्ध मोडून काढण्यासाठी आणि बांगला मुक्ती वाहिनी नष्ट करण्यासाठी तत्कालीन पश्चिम पाकिस्तान, म्हणजे आजचे पाकिस्तान येथील सरकारने एक अर्धसैनिक बल निर्माण केले होते. या पाकिस्तानी रझाकरांच्या टोळीने तत्कालीन पूर्व पाकिस्तान म्हणजे आजच्या बांगलादेशात हैदराबादच्या रझाकरांच्या सम अत्याचार सुरू केला. उलट याचा परिणाम असा झाला की बांगलादेश स्वातंत्र्य लढ्याने अजून जोर धरला आणि शेवटी इ.स. १९७१ मध्ये स्वतंत्र बांगलादेश अस्तित्वात आला.[][]

पाकिस्तान मधील प्रचलन

संपादन

पोलीस कौमी रझाकार ही पाकिस्तानमधील एक स्वयंसेवी संघटना असून हे रझाकार तेथील पोलिसांना विविध प्रकारच्या कामात मदत करतात.[][]

संदर्भ

संपादन
  1. ^ "Definitions for razaka" (इंग्रजी भाषेत). १० मे २०२१ रोजी पाहिले.
  2. ^ Moraes, Frank, Jawaharlal Nehru, Mumbai: Jaico. 2007, p.394
  3. ^ "मराठवाडा (हैदराबाद) मुक्तीसंग्रामाचा दैदिप्यमान लढा..." ११ मे २०२१ रोजी पाहिले.
  4. ^ "अत्याचाराविरूद्धचा प्रखर लढा म्हणजे 'रझाकार'..." ११ मे २०२१ रोजी पाहिले.
  5. ^ "Bangladesh Publishes List of 'Razakars' Who Sided with Pakistan Army During 1971 Liberation War" (इंग्रजी भाषेत). ११ मे २०२१ रोजी पाहिले.
  6. ^ "रजाकार - किशोरीलाल व्यास Rajakar - Hindi book by - Kishorilal vyas" (हिंदी भाषेत). ११ मे २०२१ रोजी पाहिले.
  7. ^ "THE PUNJAB QAUMI RAZAKARS ORDINANCE, 1965". Punjab Laws. ११ मे २०२१ रोजी पाहिले.
  8. ^ Faisal, Muhammad (4 March 2014). "Failure to check corruption: Police mull razakar force abolition". The Dawn. 6 January 2015 रोजी पाहिले.