विठ्ठल रामजी शिंदे

मराठी समाजसुधारक, धर्मसुधारक व लेखक


Vitthal Ramji Shinde (es); Vitthal Ramji Shinde (fr); Vitthal Ramji Shinde (ast); विठ्ठल रामजी शिंदे (mr); Vitthal Ramji Shinde (de); ਵਿੱਠਲ ਰਾਮਜੀ ਸ਼ਿੰਦੇ (pa); Vitthal Ramji Shinde (en); विट्ठल रामजी शिंदे (hi); விட்டல் ராம்ஜி ஷிண்டே (ta) मराठी समाजसुधारक, धर्मसुधारक व लेखक (mr); Indian activist (en-gb); Indian activist (en-ca); ناشط هندي (ar); warrior who tried to fight the untouchable (en) Mahrshi Vitthal Ramji Shinde (en); रजनीश (mr)

विठ्ठल रामजी शिंदे (जन्म : जमखिंडी, २३ एप्रिल १८७३; - २ जानेवारी १९४४) हे मराठी समाजसुधारक, धर्मसुधारक व लेखक होते. त्यांना कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदेमहर्षी शिंदे असेही म्हणले जाते. शिंदे हे मानवी मूल्यांची जोपासना करण्यासाठी अविरत प्रयत्न करणारे त्यागाचे व निष्ठेचे प्रतीक होते. अज्ञानाच्या पूजेविरुद्ध वैचारिक बंड पुकारून जुन्या धार्मिक अनिष्ट परंपरांचे जोखड फेकून देणारे ते सुधारक होते. त्यांनी स्वातंत्र्य समता व बंधुत्व या तत्त्वांसाठी माणसातला माणूस जागा केला मानवाने मानवावर समभावाने प्रेम करावे तसा आचार सर्वत्र घडावा म्हणून आपले जीवन समर्पित करणारे ते कर्मयोगी होते. विद्वत्ता, संयम व सेवावृत्ती या महान आदर्शाचे महामानव म्हणजे कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे हे होत. एक समाजसुधारक, अस्पृश्यता निवारणाचे खंदे पुरस्कर्ते, निरनिराळ्या धर्मांतील तत्त्वांचे संशोधक आणि ध्येयवादी विद्वान म्हणून ते ओळखले जातात.

विठ्ठल रामजी शिंदे 
मराठी समाजसुधारक, धर्मसुधारक व लेखक
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखएप्रिल २३, इ.स. १८७३
मृत्यू तारीखजानेवारी २, इ.स. १९४४
शिक्षण घेतलेली संस्था
व्यवसाय
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

मानवतावादी विचारांची मुहूर्तमेढ रोवून मानवी समाजाच्या उत्थानासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी सुरुवातीच्या काळामध्ये केवळ शंभर रुपये मानधनावर प्रार्थना समाजाचे कार्य सुरू केले. भारतीय समाजामध्ये प्रचलित असलेल्या अनिष्ट चालीरीती, रूढी परंपरा यांना आळा बसावा व हिंदू धर्मात सुधारणा घडून यावी या उद्देशाने एकोणिसाव्या शतकात येथील काही समाजसुधारकांनी ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज व आर्य समाज यासारख्या संघटना स्थापन केल्या होत्या. ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज यांच्या उदात्त तत्त्वांचे आकर्षण महर्षी शिंदे यांना वाटले. आपला समाज रूढी व परंपरा यांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी, तसेच आपल्या लोकांमधील धार्मिक अंधश्रद्धा, भोळ्या समजुती व कर्मकांडे आहेत. त्यांपासून त्यांची सुटका करण्यासाठी त्यांनी वरील दोन्ही संघटनांच्या तत्त्वांना मान्यता देऊन त्या तत्त्वांचा प्रसार लोकांमध्ये करण्याचा प्रयत्न केला. प्रार्थना समाजाचे कार्य करत असताना त्यांनी देशातील अनेक शहरांमध्ये दौरा करून एकेश्वरी धर्मपरिषद आयोजित केलेल्या ठिकाणी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. महर्षी शिंदे व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात अस्पृश्यांसाठी राजकीय हक्कांवरून मतभेद होते.

शिंदे यांनी पुण्याच्या फर्गुसन कॉलेजमधून बी.ए.ची पदवी मिळवली. कायद्याच्या शिक्षणाचे प्रथम वर्ष उत्तीर्ण केल्यावर ते एल्एल.बी. परीक्षेकरिता मुंबईला गेले.तेथे ते प्रार्थना समाजात दाखल झाले. १८ ऑक्टोबर १९०६ रोजी महर्षी शिंदे यांनी ‘'डिप्रेस्ड मिशन’' या संस्थेची स्थापना केली. डिप्रेस्त्यां क्लास मिशन चि उदिष्ट्ये होती १. अस्पृश्य बांधवांना नोकऱ्या मिळउन देने.

नी इ.स. १९२८ साली पुणे येथे शेतकरी परिषद भरवली. अस्पृश्य उद्धाराच्या कार्यासाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी १८ ऑक्टोबर १९०६ रोजी डिस्प्रेड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया, म्हणजेच भारतीय निराश्रित सहाय्यकारी मंडळी या संस्थेची मुंबईत स्थापना केली. या संस्थेची प्रमुख उद्दिष्टे पुढीलप्रमाणे होती : अस्पृश्य समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करणॆ, अस्पृश्य बांधवांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे, त्यांच्या अडचणींचे निवारण करणे, अस्पृश्यांना खऱ्या धर्माची शिकवण देणे आणि त्यांचे शीलसंवर्धन घडून आणणे, इत्यादी. या संस्थेच्या माध्यमातून महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अनेक उपक्रम हाती घेतले. त्यांमध्ये अस्पृश्य मुलांसाठी शाळा सुरू करणे, त्यांच्यासाठी वसतिगृहे उघडणे, शिवणकामाचे वर्ग चालवणे, प्रबोधनपर व्याख्याने कीर्तने आयोजित करणे, आजारी असणाऱ्या लोकांची सेवा करणे, इत्यादी गोष्टींचा समावेश या संस्थेच्या कार्यामध्ये होता. संस्थेच्या शाखा अकोला, अमरावती, इंदूर, कोल्हापूर, ठाणे, दापोली, पुणे, भावनगर, मद्रास, मालवण, मुंबई, सातारा, हुबळी, इत्यादी ठिकाणी उघडण्यात आल्या होत्या.

महर्षी शिंदे विलायतेत सर्व धर्माचे अध्ययनासाठी गेले असताना बौद्ध धर्माचा व पाली भाषेचा त्यांनी विशेष अभ्यास केला. त्यांनी १९१० साली पुण्यात 'बौद्ध धर्माचा जीर्णोद्धार' या विषयावर जाहीर व्याख्यान दिले. 'मी बौद्ध आहे' असे ते म्हणत, बुद्ध जयंती देखील पाळीत. पण केवळ प्रत्यक्ष बौद्ध धर्मात प्रवेश केल्यामुळे दलितांचा प्रश्न सुटेल असे त्यांचे मत नव्हते.[]

शिंदे यांनी वेगवेगळ्या कालखंडांत रोजनिशी लिहिली. पहिल्यांदा १८९८ मध्ये फर्ग्युसन कॉलेजात शिकत असताना, मग १९०१-३ या काळात इंग्लंडमध्ये धर्मशिक्षण घेत असताना, व त्यानंतर कायदेभंग सहभागाबद्दल शिक्षा झाल्यानंतर १९३० साली येरवडा तुरुंगात असताना त्यांनी रोजनिशींचे लेखन केले आहे. याशिवाय १९२८ साली शिंदे यांनी 'ब्राह्मो समाज शतसांवत्सरी सफर' नावाची रोजनिशी लिहिली आहे. या चारही रोजनिशीत महर्षी शिंदे यांच्या प्रगल्भ व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडते.

पहिल्या तीन रोजनिशींचे संपादन १९७९ साली गो. मा. पवार यांचे असून 'ब्राह्मो समाज शतसांवत्सरी सफर' या नावाच्या चौथ्या रोजनिशीचे संपादन रणधीर शिंदे यांचे आहे.

वि.रा. शिंदे यांच्या आत्मपर लिखाणाचे अनेक खंड प्रकाशित झाले आहेत. पहिल्या खंडात ’भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न : संशोधन आणि चिंतन’ हे लेखन आहे. दुसऱ्या खंडात महर्षी श‌िंदे यांच्या चार रोजनिशींचा समावेश असून, 'माझ्या आठवणी व अनुभव' हे ३७५ पानी आत्मचरित्र व काही प्रवासवर्णने आहेत.

  • ग्रंथसंपदा:
  1. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न -१९३३
  2. Untouchable of India
  3. History of Parihars
  4. माझ्या आठवणी व अनुभव (Autobiography)
  5. भागवत धर्माचा विकास (लेख)
  6. मराठ्यांची पूर्वपीठिका (लेख)
  7. कानडी - मराठी संबंध (लेख)
  8. कोकणी - मराठी संबंध (लेख)
  9. Thiestic directory

आत्मचरित्र

संपादन

'माझ्या आठवणी व अनुभव' नावाचे हे आत्मचरित्र तीन भागांत विभागले असून पहिल्या भागात त्यांनी आपला जीवनवृत्तान्त सांगितला आहे. तर उर्वरित भागात शिंदे यांच्या ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, डिप्रेस्ड क्लासेस मिशन या सामाजिक व राजकीय कार्याचे विवेचन आहे. लहानपणी त्यांच्या घरी अनेकजण येत. त्यात साधू, रामदासी, संन्यासी व सिद्ध येत. त्यांचे लहानपणाचे अनुभव मोठे हृदयस्पर्शी आहेत. आपल्या वाड्यात सर्व शाळासोबती कसे जमत असत व त्यातून धांगडधिंग्याचा जिमखाना कसा बनत असे, हे ते सांगत. शेतकरी चळवळी व परिषदांचे वृत्तान्त या आत्मनिवेदनात आहेत.

प्रवासवर्णने

संपादन

इंग्लंडमधील रोजनिशीत त्यांनी प्रथम त्यांच्या बोटीवरील प्रवासाबद्दल लिहिले आहे. तौलनिक धर्माचे अध्ययन करण्यासाठी ते ऑक्सफर्डला आले होते. ते पॅरिसला गेले व तेथील इमारतींचे कलासौंदर्य पाहून याबाबत फ्रेंचांची ग्रीकांशीच तुलना होऊ शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले. मानवी ऐश्वर्य, सौंदर्य, स्वातंत्र्य व सुधारणा यांचा मिलाफ या राष्ट्रांत झाला आहे, असे त्यांस वाटले.

ब्राह्मो समाजास शंभर वर्षे झाली, त्यानिमित्ताने शिंदे यांनी पश्चिम बंगालची सफर केली. तेव्हा ते ब्राह्मो उपासना केंद्रे चालवणाऱ्या रवींद्रनाथांना भेटले. 'रवींद्रनाथांचा आवाज अलगुजासारखा कोमल व हृदयप्रवेशी होता. आणि त्या उपासनेत त्यांनी लोकाग्रहाखातर छोटे सुंदर पदही म्हणले, असे त्यांनी म्हणले आहे.

त्यानंतर शिंदे पूर्व बंगालमध्ये गेले. तेथे त्यांनी वेगवेगळ्या शहरांत व गावांत ब्राह्मो धर्मावर भाषणे दिली.

शेतकरी चळवळ

संपादन

वि.रा. शिंदे यांनी इ.स. १९२० ते २६ या काळात शेतकरी चळवळ उभी केली. पण सरकारने तुकडे बंदीचे बिल मागे घेताच चळ‍वळीत वाद सुरू झाले, आणि चळवळ थांबली.

विठ्ठल रामजी शिंदे यांच्यावरील पुस्तके

संपादन
  • एक उपेक्षित महात्मा : महर्षी विठ्ठल रामजी शिंदे (प्रा.डॉ. एन.डी. पाटील)
  • एक उपेक्षित महामानव : महर्षी विठ्ठल रामजी शिंदे (बा.ग. पवार)
  • दलितांचे कैवारी विठ्ठल रामजी शिंदे (डॉ. लीला दीक्षित)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : एक दर्शन (संपादक - रा.ना. चव्हाण) (२ भाग)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : चिकित्सक लेखसंग्रह (प्रा.डाॅ. भिमाजी नामदेव दहातोंडे)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : जीवन व कार्य (गो.मा. पवार)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे धर्मविषयक विचार (अशोक चौसाळकर)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या राजकीय व सामाजिक चळवळी (तानाजी ठोंबरे)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांना समजून घेताना (सुहास कुलकर्णी)
  • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : व्यक्ती आणि विचार (प्रा डॉ. भिमाजी नामदेव दहातोंडे)
  • महाराष्ट्र चरित्र ग्रंथमाला संच : महर्षी विठ्ठल रामजी शिंदे (सुहास कुलकर्णी)
  • महाराष्ट्रातील समाजसुधारक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे (डॉ. नीला पांढरे)

संदर्भ

संपादन
  1. ^ चव्हाण, रा.ना. (ऑक्टोबर–डिसेंबर 2016). "डॉ. आंबेडकर आणि धर्मांतर". समाज प्रबोधन पत्रिका: 125.CS1 maint: date format (link)

बाह्य दुवे

संपादन

"महर्षि विठ्ठल रामजी शिंदे : समग्र साहित्य". २५-११-२०१७ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)