एप्रिल ३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ९३ वा किंवा लीप वर्षात ९४ वा दिवस असतो.


ठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा

एकोणिसावे शतकसंपादन करा

  • १८८५ : वेगवान पेट्रोल इंजिन बनवणाऱ्या गोटिलीप डाईमला यांना इंजिन रचनेचे पेटंट मिळाले. १८९५ : ऑस्कर वाईल्डची अपकीर्ती करणारा खटला सुरू. वाईल्ड समलैंगिक असल्याने त्याची रवानगी तुरुंगात झाली.

विसावे शतकसंपादन करा

  • इ.स. १९२७ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत भारत हे पाक्षिक सुरू केले.
  • १९३३ : एव्हरेस्ट शिखरावरून पहिले विमान गेले. १९४८ : जेजू, द. कोरिया इथे नागरी युद्धातून सामूहिक हत्याकांड. १९४८: ओरिसा उच्च न्यायालयाची स्थापना झाली. १९७३ : मोटोरोला कंपनीच्या मार्टीन कूपर यांनी पहिल्या मोबाईल फोनमधून बेल लॅब्जमधे पहिला कॉल केला. १९७५ : अनातोली कारपॉव्हविरोधात बॉबी फिशरने लढत नाकारल्यामुळे कारपॉव्ह विश्वविजेता बनला. १९८१ : पहिला सहज हलवता येण्यासारखा संगणक सॅन फ्रान्सिस्कोमधे प्रदर्शित. १९८४ : भारताचा पहिला अवकाश यात्री राकेश वर्मा याची अंतराळ प्रवासास सुरूवात. १९९८ : प्रवासी बॅगा बनवणाऱ्या 'सॅमसोनाईट'च्या पहिल्या भारतीय प्रकल्पाचे उद्घाटन.

एकविसावे शतकसंपादन करा

२०००: आयएनएस आदित्य हे इंधन पुरवणारे संपूर्ण भारतीय बनावटीचे वेगवान जहाज नौदलाच्या ताफ्यात दाखल झाले.

२०१०: ऍपल कंपनी ने आयपॅड या टॅब्लेट संगणकाची पहिली आवृत्ती जाहीर केली.

जन्मसंपादन करा

मृत्यूसंपादन करा

प्रतिवार्षिक पालनसंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा

एप्रिल १ - एप्रिल २ - एप्रिल ३ - एप्रिल ४ - एप्रिल ५ - (एप्रिल महिना)