वा.वि. मिराशी

भारतीय लेखक आणि विद्वान (१८९३-१९८५)
(वासुदेव विष्णू मिराशी या पानावरून पुनर्निर्देशित)

वासुदेव विष्णू मिराशी ( १३ मार्च, १८९३, कुवळे-सिंधुदुर्ग जिल्हा; मृत्यू: ३ एप्रिल, १९८५) हे एक मराठी लेखक, संस्कृत पंडित व भारतविद्यातज्ज्ञ होते. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांची आणि संशोधनात्मक लेखांची संख्या सुमारे ३०५ आहे.

शिक्षण

संपादन

मिराशींचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण कोल्हापुरात आणि पुढचे पुण्यात झाले. पुण्याच्या डेक्कन कॉलेजातून त्यांनी १९१७ साली संस्कृत विषयात एम.ए.ची पदवी मिळवली.

अध्यापन

संपादन

एम.ए. झाल्यावर मिराशी मुंबईच्या एलफिन्स्टन कॉलेजात संस्कृतचे प्राध्यापक झाले. १९१९ साली ते नागपूरच्या मॉरिस कॉलेजात संस्कृत अध्यासनाचे प्रमुख आणि १९४२ साली त्याच महाविद्यालयाचे प्राचार्य झाले. १९४७ ते १९५० या काळात मिराशी अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयाचे प्राचार्य होते.

Iमिराशी यांनी १९५७ ते १९६६ या कालावधीत नागपूर विद्यापीठात प्राचीन भारताचा इतिहास आणि भारतीय संस्कृती या विषयाचे मानद प्राध्यापक आणि मानवशास्त्र या विषयाच्या पदव्युत्तर विद्याशाखेचे प्रमुख झाले.

निवडक पुस्तके

संपादन
  • कलचुरी नृपति आणि त्यांचा काल (हिंदीत - कलचुरी नरेश और उनका काल)
  • The History and Inscriptions of the Sātavāhanas and the Western Kshatrapas (४ वर्षांत, ३ भाषांत ९ आवृत्त्या)
  • Indological research papers
  • Inscriptions of the Kalachuri-Chedi Era (४६ वर्षांत १४ आवृत्त्या)
  • Inscriptions of the Śilāhāras (इ.स. १९७७पर्यंत ६ आवृत्त्या)
  • Inscriptions of the Vākāṭakas (१९६३सालापर्यंत, ३ भाषांत ८ आवृत्त्या)
  • कालिदास
  • Kālidāsa; date, life, and works by (अनेक भाषांत; इ.स. १९६९पर्यंत एकूण ७ आवृत्त्या)
  • भवभूति
  • Bhavabhūti : (His Date, Life, and Works) : १९६८ ते १९९६ या कालावधीत या पुस्तकाच्या ६ भाषांत १४ आवृत्त्या प्रकाशित झाल्या.
  • भारतीय साहित्य शास्त्र
  • Mālati-Mādhava of Bhavabhūti : with the commentary of Jagaddhara (संपादित, सहसंपादक - रामकृष्ण गोपाळ भांडारकर)
  • Literary and historical studies in Indology (१९७५पर्यंत ५ आवृत्त्या)
  • विदर्भ संशोधन मंडळ वार्षिक १९५८
  • विदर्भ संशोधनाचा इतिहास
  • समुद्रगुप्त जीवन व काल (सहलेखक - शं.रा. दाते, रा.शं वाळिंबे)
  • संशोधनमुक्तावलि (सर १ ते ८)
  • सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप
  • Studies in Ancient Indian History
  • Studies in Indology (१५ वर्षात, ३ भाषांत २२ आवृत्त्या)
  • हर्षचरितसार (संपादित)

वा.वि. मिराशी यांच्याबद्दल लिहिला गेलेला गौरवग्रंथ

संपादन
  • Felicitation Volume : A Collection of 42 Indological Essays Presented to V. V. Mirashi (लेखक - गणेश टी. देशपांडे; व्ही.डब्ल्यू. करंबळेकर, अजय मित्र शास्त्री)

सन्मान आणि पुरस्कार

संपादन
  • नागपूरचे राजे फत्तेसिंह यांच्या हस्ते विशेष सन्मान
  • महामहोपाध्याय ही ब्रिटिश सरकारने दिलेली उपाधी (१९४१)
  • वा.वि. मिराशी यांना १९७३ साली दिल्लीच्या साहित्य अकादमीची फेलोशिप बहाल झाली.
  • पद्मभूषण (१९७५)