हरिहरन

भारतीय पार्श्वगायक

हरिहरन अय्यर (जन्म : ३ एप्रिल, १९५५) हे एक हिंदी, मराठी, कन्नड, मल्याळी, तमिळ, तेलुगू, भोजपुरी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय पार्श्वगायक आहेत. ते एक उत्तम गझल-गायकही आहेत. हरिहरन यांनी मुंबईत राहून विज्ञान व कायदा या शिक्षण शाखांच्या पदव्या घेतल्या आहेत. अलमेलू हे त्यांचे संगीतातले पहिले गुरू होते. २००४ साली हरिहरनला भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले.

हरिहरन

हरिहरन
आयुष्य
जन्म ३ एप्रिल, १९५५ (1955-04-03) (वय: ६८)
जन्म स्थान मुंबई
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
नागरिकत्व भारतीय
देश भारत ध्वज भारत
भाषा तमिळ
पारिवारिक माहिती
जोडीदार ललिता (लग्न १९८४)
संगीत साधना
शिक्षण बी.एस्‌सी. एल्‌एल.बी.
गुरू अलमेलू
गायन प्रकार पार्श्वगायन
संगीत कारकीर्द
पेशा गायकी
गौरव
पुरस्कार अनेक

हरिहरनने लेस्ली लुईस ह्या भारतीय पॉप गायकासोबत कॉलोनियल कझिन्स ह्या नावाने देखील अनेक गाणी म्हटली आहेत.

पूर्वायुष्य संपादन

सांगीतिक कारकीर्द संपादन

हरिहरन यांना अखिल भारतीय सूर संगीत स्पर्धेतून गायन क्षेत्रातील पहिली संधी मिळाली, ती म्हणजे ’गमन’ या चित्रपटातील गीत गाण्याची.

संगीत ध्वनिमुद्रिका (कंसात चित्रपटाचे नाव) संपादन

  • आय लव्ह माय इंडिया
  • इतना लंबा कश लो यारों, दम निकल जाएँ (हु तू तू- १९९९) (सहगायिका लता मंगेशकर)
  • काश (काश- २०००)
  • कितनी बातें (लक्ष्य- २००४)
  • कुछ भी नही था
  • कुछ मेरे दिल ने कहा, कुछ तेरे दिल ने कहा (तेरे मेरे सपने- १९९६) (सहगायिका साधना सरगम)
  • चप्पा चप्पा
  • जिया जिया न जाय
  • छोड आये हम
  • झोंका हवा का (हम दिल दे चुके सनम- १९९९)
  • तुम बिन जाऊँ कहाँ (दिल विल प्यार व्यार- २००२
  • तेरे होठों की हँसी (बिच्छू- २०००)
  • धीमी धीमी हैं खुशबू तेरा बदन (अर्थ- १९९९)
  • बाहों के दरमियाँ, दो प्यार मिल रहे है ( खामोशी- द-म्युझिकल- १९९६) (सहगायिका अलका याज्ञिक)
  • मैं कहीं भी रहूँ (एलओसी कारगिल- २००३)
  • म्हारे हिवडा में नाचे मोर ((हम साथ साथ हैं- १९९९
  • यूँ ही चला चल (स्वदेस- २००४)
  • येह तो सच है कि भगवान है (हम साथ साथ हैं- १९९९)
  • शहर दर श्हर
  • श्री हनुमान चालिसा
  • श्री हनुमान जी की आरती
  • संकटमोचन हनुमान अष्टक
  • सावन बरसे तरसे दिल, क्योंना निकले घर से दिल (दहक- १९९९) (सहगायिका साधना सरगम)
  • हम साथ साथ हैं (हम साथ साथ हैं- १९९९)

हरिहरन यांनी गायलेली गझलें संपादन

  • जब कभी बोलना वक़्त पर बोलना । मुद्दतों बोलना मुख़्तसर बोलना
  • तू ही रे तेरे बिना कैसे जीऊँ...
  • दरो दिवार पे शकलें सी बनाने आई । फिर ये बारिश मेरी तनहाईं चुराने आईं
  • बहुत बेचैन है दिल, तुम जहाँ भी हो चले आऒं
  • बेखुदा अब तो मुझे कोई तमन्ना नहीं...
  • बे ख्याली में चलन उसका..
  • हाथ रख देती है दिल पर तेरी बातें अकसर
  • हुजूर आने में भी है और बुलाते भी नहीं...

हरिहन यांची मराठी गीते संपादन

  • कंठ आणि आभाळ दाटून
  • जीव दंगला गुंगला

पुरस्कार व सन्मान संपादन

  • बॉर्डर ह्या हिंदी चित्रपटांतील मेरे दुष्मन ह्या गाण्याच्या पार्श्वगायनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (१९९८)
  • जोगवा ह्या मराठी चित्रपटातील जीव दंगला गुंगला रंगला या गाण्याच्या पार्श्वगायनासाठी राष्ट्रीय पुरस्कार (२००९)
  • अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेतर्फे दिला जाणारा आशा भोसले पुरस्कार (२९-१-२०१५)
  • पद्मश्री पुरस्कार (२००४)
  • ’पट्टु पादुवान” या गीताच्या गायनासाठी केरळ राज्य सरकराकडून उत्कृष्ट गायक पुरस्कार (२०११)
  • चित्रपट संगीतसेवेसाठी स्वरालय कैराली येसुदास पुरस्कार (२००४)
  • आसै चित्रपटातील कोंचा नाल या गाण्यासाठीचा तमिळनाडू सरकारचा पुरस्कार (१९९५)
  • अनेक चित्रपटांत दिलेल्या पार्श्वसंगीताबद्दलचा तमिळनाडू सरकारचा पुरस्कार (२००४)
  • अनार्य चित्रपटातील हिमा सेमल्लोयेल्लो या गीतासाठी नंदी पुरस्कार (१९९९)
  • आरो पदन्‍नू या कथा तुंदरुण्णामधील गीतासाठी आशियानेट पुरस्कार (२०११)
  • कलाकार संस्थेचा ८वा कलाकार पुरस्कार (२०००)
  • फिल्मफेअर पुरस्कार (२०११)
  • पिंपरी-चिंचवडच्या भारतीय मराठी नाट्यपरिषद व कलारंग प्रतिष्ठानतर्फे आशा भोसले पुरस्कार (३०-१-२०१५)
  • मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार (२०११-१२)
  • मध्य प्रदेश सरकारचा ५वा सम्राट विक्रमादित्य अलंकरण सन्मान (२००९)

संदर्भ संपादन