लता मंगेशकर

एक महान गायिका

लता मंगेशकर (जन्म: सप्टेंबर २८, इ.स. १९२९) भारतातील एक गायिका आहेत.[१] त्या भारताच्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या ख्यातनाम गायक-गायिकांपैकी एक आहेत. हिंदी संगीतविश्वात त्यांना 'लता दीदी' म्हणून ओळखले जाते. लता मंगेशकरांच्या कारकिर्दीची सुरुवात इ.स. १९४२ मध्ये झाली आणि ती कारकीर्द सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून आहे. त्यांनी ९८० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, विसाहून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये (प्रामुख्याने मराठी) गायन केले आहे. लता मंगेशकरांचे कुटुंब संगीतासाठी प्रसिद्ध असून, सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची सख्खी भावंडे आहेत. लता मंगेशकरांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हे मराठी नाट्य-संगीताचे प्रसिद्ध गायक होते.[ संदर्भ हवा ] लता मंगेशकराना भारतीय कोकिळा (Indian Nightingale) म्हणतात.

लता मंगेशकर
Lata Mangeshkar - still 29065 crop.jpg
लता मंगेशकर
आयुष्य
जन्म सप्टेंबर २८, इ.स. १९२९
जन्म स्थान इंदूर, मध्य प्रदेश (ब्रिटिश काळातील मध्य भारत एजन्सी)
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
नागरिकत्व भारतीय
मूळ_गाव मंगेशी, गोवा
देश भारत
भाषा मराठी, हिंदी भाषा
पारिवारिक माहिती
आई माई मंगेशकर
 मूळ गाव = थाळनेर(शिरपूर-धुळे)
वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर
नातेवाईक आशा भोसले
उषा मंगेशकर
हृदयनाथ मंगेशकर
मीना खडीकर
संगीत साधना
गुरू दीनानाथ मंगेशकर
गायन प्रकार कंठसंगीत गायन
संगीत कारकीर्द
कार्य पार्श्वगायन, सुगम संगीत
पेशा पार्श्वगायन
कारकिर्दीचा काळ इ.स. १९४२ पासून
गौरव
विशेष उपाधी गानकोकिळा
पुरस्कार भारतरत्न(२००१)
स्वाक्षरी
स्वाक्षरी

'भारतरत्‍न'पुरस्कार प्राप्त करणाऱ्या भारतातील त्या पहिल्या महिला कलाकार आहेत. हा पुरस्कार त्यांना २००१ साली मिळाला. [२]

लता मंगेशकर हे नाव 'गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्‌समध्ये इ.स. १९७४ ते इ.स. १९९१ च्या कालावधीत सर्वात जास्त ध्वनिमुद्रणांच्या (रेकॉर्डिंग्स) उच्चांकासाठी नोंदले गेले आहे.[ संदर्भ हवा ]

बालपणसंपादन करा

लता मंगेशकरांचा जन्म मध्य प्रदेश (ब्रिटिश काळात सेंट्रल इंडिया एजन्सी)च्या इंदूर शहरात झाला.[३] त्यांचे पाळण्यातले नाव हृदया. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक तसेच नाट्यकलावंत होते. लता ही आपल्या आई-वडिलांचे सर्वात ज्येष्ठ अपत्य. आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ ही त्यांची लहान भावंडे आहेत.

[ संदर्भ हवा ]

लताला पहिले संगीताचे धडे आपल्या वडिलांकडूनच मिळाले. वयाच्या पाचव्या वर्षी तिने वडिलांच्या संगीत नाटकांमध्ये बाल-कलाकार म्हणून कामाची सुरुवात केली.

[ संदर्भ हवा ]

चित्रपटसृष्टीत कारकीर्दसंपादन करा

इ.स. १९४२ मध्ये लता अवघ्या १३ वर्षांची होती, तेव्हा वडील हृदयविकाराने निवर्तले. तेव्हा मंगेशकरांचे एक आप्त तसेच नवयुग चित्रपट कंपनीचे मालक - मास्टर विनायक ह्यांनी लताच्या परिवाराची काळजी घेतली. त्यांनी लताबाईंना गायिका आणि अभिनेत्री म्हणून कामाचा प्रारंभ करून दिला.[ संदर्भ हवा ]

लताने नाचू या गडे, खेळू सारी मनी हौस भारी हे सदाशिवराव नेवरेकरांनी बसवलेले गाणे वसंत जोगळेकरांच्या किती हंसाल (इ.स. १९४२) ह्या मराठी चित्रपटासाठी गायले, पण हे गाणे चित्रपटातून वगळले गेले. मास्टर विनायकांनी लताबाईंना नवयुगच्या पहिली मंगळागौर (इ.स. १९४२) ह्या मराठी चित्रपटात एक छोटी भूमिका दिली. ह्या चित्रपटात त्यांनी नटली चैत्राची नवलाई हे दादा चांदेकरांनी स्वरबद्ध केलेले गीत गायले. इ.स. १९४५ मध्ये जेव्हा मास्टर विनायकांच्या कंपनी-कार्यालयाचे स्थानांतर मुंबईस झाले, तेव्हा लताबाई मुंबईला आल्या. त्या उस्ताद अमानत अली खाँ (भेंडीबाजारवाले) ह्यांच्याकडून हिंदुस्तानी शास्त्रोक्त संगीत शिकू लागल्या. त्यांनी वसंत जोगळेकरांच्या आपकी सेवामें (इ.स. १९४६) ह्या हिंदी चित्रपटासाठी पा लागूं कर जोरी हे गाणे गायले (दत्ता डावजेकर हे त्या गाण्याचे संगीतकार होते). लता आणि आशा (बहीण) यांनी मास्टर विनायकांच्या पहिल्या हिंदी चित्रपटात (बडी माँ - इ.स. १९४५) नूरजहाँ सोबत छोट्या भूमिका केल्या. त्या चित्रपटात लताने माता तेरे चरणोंमें हे भजन गायले. मास्टर विनायकांच्या दुसऱ्या हिंदी चित्रपटाच्या (सुभद्रा - इ.स. १९४६) ध्वनिमुद्रणाच्या वेळेस लताबाईंची ओळख संगीतकार वसंत देसाई यांच्याशी झाली.[ संदर्भ हवा ]

इ.स. १९४७ मध्ये भारताच्या फाळणीनंतर उस्ताद अमानत अलीखाँ भेंडीबाजारवाले यांनी नवनिर्मित पाकिस्तानला देशांतर केले, तेव्हा लतादीदी अमानत खाँ (देवासवाले) यांच्याकडे शास्त्रोक्त संगीत शिकायला लागल्या. उस्ताद बडे गुलाम अली खान साहेबांचे शिष्य पंडित तुलसीदास शर्मांकडूनही लताबाईंना तालीम मिळाली.[ संदर्भ हवा ]

इ.स. १९४८ मध्ये मास्टर विनायकांच्या मृत्यूनंतर संगीतकार गुलाम हैदरांनी लताबाईंनार्गदर्शन केले. त्या काळात हिंदी चित्रपटांमध्ये नूरजहाँ, शमशाद बेगम आणि जोहराबाई (अंबालेवाली), ह्यांसारख्या अनुनासिक आणि जड आवाज असलेल्या गायिका जास्त लोकप्रिय होत्या.[ संदर्भ हवा ]

ग़ुलाम हैदरांनी लताजींची ओळख तेव्हा शहीद (इ.स. १९४८) ह्या हिंदी चित्रपटावर काम करीत असलेले निर्माते शशिधर मुखर्जींशी केली, पण मुखर्जींनी लताचा आवाज "अतिशय बारीक" म्हणून नाकारला. तेव्हा हैदरांचे थोड्या रागात उत्तर होते - येणाऱ्या काळात निर्माते आणि दिग्दर्शक लताचे पाय धरतील आणि आपल्या चित्रपटांसाठी गाण्याची याचना करतील. हैदरांनी लतादीदींना मजबूर (इ.स. १९४८) ह्या चित्रपटात दिल मेरा तोडा हे गाणे म्हणण्याची मोठी संधी दिली.[ संदर्भ हवा ]

सुरुवातीला लता आपल्या गाण्यात तेव्हाच्या लोकप्रिय असलेल्या नूरजहाँचे अनुकरण करीत असे, पण नंतर लताने स्वतःच्या गाण्याची एक आगळी शैली बनवली. त्या काळात हिंदी चित्रपटांतल्या गाण्यांचे गीतकार प्रामुख्याने मुस्लिम कवी असत, त्यामुळे गाण्यांच्या भावकाव्यात भरपूर उर्दू शब्द असत. एकदा सुप्रसिद्ध अभिनेता दिलीपकुमार यांनीन लताच्या हिंदी/हिंदुस्तानी गाण्यातील "मराठी" उच्चारांसाठी तुच्छतादर्शक शेरा मारला, तेव्हा लताने शफ़ी नावाच्या मौलवींकडून उर्दू उच्चारांचे धडे घेतले.[ संदर्भ हवा ]

लोकप्रिय चित्रपट महल(इ.स. १९४९)चे आयेगा आनेवाला हे गाणे लताच्या कारकिर्दीला एक महत्त्वाचे वळण देणारे ठरले. (गाण्याचे संगीतकार खेमचंद प्रकाश होते, तर चित्रपटात गाणे अभिनेत्री मधुबालाने म्हटले होते.)[ संदर्भ हवा ]

१९५० च्या दशकात उत्कर्षसंपादन करा

१९५० च्या दशकात लताने ज्या संगीत दिग्दर्शकांनी स्वरबद्ध केलेली गाणी गायिली, अशा नामांकित संगीतकरांची नावे - अनिल विश्वास, शंकर-जयकिशन, नौशाद, सचिनदेव बर्मन, सी. रामचंद्र, हेमंत कुमार, सलिल चौधरी, खय्याम, रवी, सज्जाद हुसेन, रोशन, मदन मोहन, कल्याणजी आनंदजी, मास्टर कृष्णराव, वसंत देसाई, सुधीर फडके, हंसराज बहल आणि उषा खन्ना. (सुप्रसिद्ध संगीतकार ओ.पी.-fhhjf6pjj123456878899999999999999990ouyt4 नय्यर हे असे एकमेव अपवाद होते ज्यांनी आपल्या रचनांसाठी लताऐवजी आशा भोसले यांना प्राधान्य दिले.)[ संदर्भ हवा ]

संगीतकार नौशाद यांच्या दिग्दर्शनाखाली बैजू बावरा (इ.स. १९५२), मुग़ल-ए-आज़म (इ.स. १९६०) आणि कोहिनूर (इ.स. १९६०) ह्या चित्रपटांसाठी लताने शास्त्रोक्त संगीतावर आधारित काही गाणी गायिली. लताने नौशादांसाठी गायिलेले पहिले गाणे हे जी.एम.दुर्राणींसोबतचे द्वंद्वगीत छोरेकी जात बडी बेवफ़ा आहे. सुप्रसिद्ध संगीतकार जोडी शंकर-जयकिशन यांनी तर आपल्या जवळजवळ सर्व चित्रपटांच्या(विशेषतः राज कपूरनिर्मित) गाण्यांच्या गायिका म्हणून लताचीच निवड केली. अशा चित्रपटांमध्ये आग, आह, (इ.स. १९५३), श्री ४२० (इ.स. १९५५) आणि चोरी चोरी (इ.स. १९५६) यांचा समावेश आहे. इ.स. १९५७ पर्यंत सचिन देव बर्मन आपल्या बहुतेक चित्रपटगीतांच्या प्रमुख गायिका म्हणून लताची निवड करीत, उदा. सज़ा (इ.स. १९५१), हाउस नं. ४४, (इ.स. १९५५) आणि देवदास (इ.स. १९५५). पण इ.स. १९५७ ते इ.स. १९६२ च्या काळात बर्मनदादांनी लतादीदी ऐवजी गीता दत्त आणि आशा भोसले ह्या गायिकांना घेऊन आपली सर्व गाणी बसवली.[ संदर्भ हवा ]

इ.स. १९५० च्या दशकात लताबरोबर अतिशय लोकप्रिय गाणी बनवणाऱ्यांपैकी एक सलिल चौधरी होते. लतादीदीला "सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका" म्हणून सर्वप्रथम फ़िल्मफ़ेअर पारितोषिक सलिल चौधरींनी स्वरबद्ध केलेल्या आजा रे परदेसी ह्या मधुमती (इ.स. १९५८) मधील गीतासाठी मिळाले.[ संदर्भ हवा ]

इ.स. १९६०चे दशकसंपादन करा

१९६०च्या दशकात लता मंगेशकर निर्विवादपणे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रथम श्रेणीच्या पार्श्वगायिका ठरल्या. ह्या काळात लताने जवळजवळ सर्व संगीतकारांबरोबर गाणी ध्वनिमुद्रित केली. त्यांपैकी असंख्य गाणी अजरामर झाली. १९६० मध्ये प्यार किया तो डरना क्या हे मुग़ल-ए-आज़म (इ.स. १९६०) चे नौशादने संगीतबद्ध केलेले आणि मधुबालावर चित्रित गाणे तुफान लोकप्रिय झाले. हवाई-धरतीचे अजीब दास्ताँ है ये हे शंकर-जयकिशन दिग्दर्शित आणि दिल अपना प्रीत पराई (इ.स. १९६०) मध्ये मीना कुमारी वर चित्रित गाणेही अतिशय प्रसिद्ध झाले.[ संदर्भ हवा ]

इ.स. १९६१ मध्ये लताने सचिनदेव बर्मन यांचे साहाय्यक जयदेव यांसाठी अल्ला तेरो नाम हे भजन गाण्याचे पाऊल उचलून बर्मनदादांसोबत पुन्हा वाटचाल सुरू केली.

इ.स. १९६२ मध्ये लताने बीस साल बाद चित्रपटातील कहीं दीप जले कहीं दिल ह्या हेमंत कुमार यांचे संगीत दिग्दर्शन असलेल्या गाण्यासाठी दुसरा फिल्मफेअर पुरस्कार पटकावला.[ संदर्भ हवा ]

२७ जून, इ.स. १९६३ ला, भारत-चीन युद्धानंतर एका कार्यक्रमात लताबाईंनी कवी प्रदीप यांनी लिहिलेले आणि सी. रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेले ऐ मेरे वतन के लोगों हे देशभक्तिपर गीत भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीत गायले. तेव्हा लताच्या सुमधुर कंठातून युद्धात देशासाठी प्राण देणाऱ्या जवानांना श्रद्धांजली वाहणारे ते गीत ऐकून पंडितजींच्या डोळ्यात अश्रू उभे झाले.[ संदर्भ हवा ]

इ.स. १९६३ मध्ये सचिन देव बर्मन यांच्यासाठी पुन्हा गाणे सुरू केल्यानंतर लताने गाईड (इ.स. १९६५) मधील आज फिर जीनेकी तमन्ना है, पिया तोसे नैना लागे रे, गाता रहे मेरा दिल हे (किशोर कुमार सोबतचे द्वंद्वगीत) तसेच ज्युवेल थीफ़ (इ.स. १९६७) मधील होटोंपे ऐसी बात यांसारखी बर्मनदादांची अनेक लोकप्रिय गाणी म्हटली.[ संदर्भ हवा ]

इ.स. १९६० च्या दशकात लतादीदीने मदनमोहन ह्या आपल्या आवडत्या संगीतकाराची अनेक गाणी म्हटली. अशा गाण्यांमध्ये अनपढ (इ.स. १९६२) चे आपकी नज़रोंने समझा, वो कौन थी (इ.स. १९६४) ची लग जा गले, नैना बरसे तसेच मेरा साया (इ.स. १९६६) चे तू जहां जहां चलेगा ह्या सुरेल गाण्यांचा विशेष उल्लेख होतो.[ संदर्भ हवा ]

१९६० च्याच दशकात लक्ष्मीकांत प्यारेलाल ह्या नवोदित संगीतकार-जोडीची जवळ-जवळ सर्व गाणी लतानेच म्हटली. लता मंगेशकरच्या गाण्यांमुळेच ही जोडी हिंदी चित्रपटसंगीतक्षेत्रात अजरामर झाली. पारसमणी (इ.स. १९६३) ह्या लक्ष्मीकांत प्यारेलाल जोडीच्या पहिल्या-वहिल्या चित्रपटातली लताची गाणी अतिशय लोकप्रिय ठरली. लतादीदीने मराठी सिनेमांसाठी अनेकानेक गाणी गायिली. त्यांनी ज्या नामांकित संगीतकारांबरोबर काम केले, त्यांमध्ये हृदयनाथ मंगेशकर, वसंत प्रभू, श्रीनिवास खळे आणि सुधीर फडकेंचा विशेष उल्लेख करायला हवा. लतादीदीने स्वतः 'आनंदघन' ह्या टोपणनावाने मराठी गाणी स्वरबद्ध करून गायिलेली आहेत. १९६० आणि १९७० च्या दशकांमध्ये लताने संगीतकार सलिल चौधरी आणि हेमंतकुमारांची बंगाली भाषेतली गाणीही म्हटली आहेत.[ संदर्भ हवा ]

लता मंगेशकरने (मुकेश, मन्ना डे, महेंद्र कपूर, मोहम्मद रफी आणि किशोर कुमार यांसारख्या त्या काळातील सर्व प्रसिद्ध गायकांबरोबर युगलगीते गायिली आहेत.[ संदर्भ हवा ]

अभिजात संगीतातलेउस्ताद अमीरखाँ आणि उस्ताद बडे गुलामअली हे त्यांचे आवडते गायक आहेत.[ संदर्भ हवा ]

सन्मानसंपादन करा

 • २०१२ मध्ये झालेल्या आऊटलुक इंडियाच्या ‘द ग्रेटेस्ट इंडियन’ या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये मंगेशकर दहाव्या क्रमांकावर होत्या.[४]

लेखनसंपादन करा

 • लता मंगेशकर यांनी लिहिलेल्या लेखांचा संग्रह ग्रंथाली प्रकाशनाने सन १९९५च्या आसपासच्या वर्षी प्रसिद्ध केला होता. त्याचे संपादन मधुवंती सप्रे यांनी केले होते. पुढे हे पुस्तक मिळणे कठीण झाले. जयश्री देसाई यांच्या पाठपुराव्यामुळे ’मैत्रेय प्रकाशन’ने ’फुले वेचिता’ या नावाने ते पुस्तक पुनर्मुद्रित केले आहे.[ संदर्भ हवा ]

लता मंगेशकर यांंच्या जीवनावर आणि कार्यावर लिहिलेली पुस्तकेसंपादन करा

 • लता (इसाक मुजावर)[५]
 • लता : संगीत क्षेत्रातील चंद्रमा (सांज शकुन प्रकाशन)
 • लता मंगेशकर यांचे व्यक्तिचित्रण करणारे ’स्वरयोगिनी’ नावाचे पुस्तक मधुवंती सप्रे यांनी लिहिले आहे. त्या पुस्तकाच्या परिशिष्टात लता मंगेशकरांनी गायिलेल्या चित्रपटगीतांची यादी आहे.
 • The Voice of a Nation (मूळ लेखिका पद्मा सचदेव; मराठी अनुवाद : 'अक्षय गाणे' जयश्री देसाई)
 • ऐसा कहाँ से लाऊँ (हिंदी- पद्मा सचदेव)
 • लतादीदी आणि माझ्या कविता (सुचित्रा कातरकर)
 • लतादीदी : अजीब दर्शन हैं यह (मूळ लेखक : हरीश भिमाणी-हिंदी); (मराठी अनुवाद : 'लतादीदी' अशोक जैन.)
 • In search of Lata Mangeshkar. (इंग्रजी - हरीश भिमाणी)
 • Lata in her own voice (नसरीन मुन्नी कबीर)
 • लता मंगेशकर (चरित्र)- राजू भारतन
 • लता मंगेशकर गंधार स्वरयात्रा (१९४५- १९८९) - संपादन : विश्वास नेरूरकर
 • गाये लता, गाये लता- डॉ.मंगेश बिच्छू. प्रकाशक- पल्लवी प्रकाशन
 • हे रत्‍न भारताचे - लता मंगेशकर (लेखक : रेखा चवरे)
 • मोगरा फुलला (संपादक : रेखा चवरे)
 • संगीतक्षेत्रातील चंद्रमा (प्रसाद महाडकर, विवेक वैद्य)
 • सप्तसुरांच्या पलीकडे : लता मंगेशकर (हरीश भिमाणी)
 • लता मंगेशकर - संगीत लेणे (मोरया प्रकाशन)[ संदर्भ हवा ]

प्रथम गायन:-संपादन करा

लता मंगेशकर यांनी पहिली मंगळागौर या चित्रपटासाठी प्रथम पार्श्वगायन केले आहे.[ संदर्भ हवा ]

हे ही पहासंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा

संदर्भ आणि नोंदीसंपादन करा

 1. ^ कुंटे, चैतन्य (२०१४). विवेक आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण शिल्पकार चरित्रकोश - खंड ७. मुंबई: साप्ताहिक विवेक (हिंदुस्थान प्रकाशन संस्था). pp. ८११-८१५.
 2. ^ देसाई, माधवी (२०११). गोमन्त सौदामिनी. कोल्हापूर: माणिक प्रकाशन. pp. ६८.
 3. ^ Arondekar, A. (2014-12-01). "In the Absence of Reliable Ghosts: Sexuality, Historiography, South Asia". differences (इंग्रजी भाषेत). 25 (3): 98–122. doi:10.1215/10407391-2847964. ISSN 1040-7391.
 4. ^ https://www.outlookindia.com/magazine/story/a-measure-of-the-man/281949
 5. ^ Mujawar, Isak (1993). Nūrajahām̐ te Latā. Vasudhā Prakāśana.कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.