हेमंत कुमार
हेमंत मुखोपाध्याय (बांगला: হেমন্ত কুমার মুখোপাধ্যায়) (१६ जून इ.स. १९२०-१६ सप्टेंबर इ.स. १९८९) हे एक सुप्रसिद्ध भारतीय गायक, संगीतकार व निर्माता होते. हिंदी क्षेत्रात ते हेमंत कुमार आणि हेमंत मुखर्जी या नावांनी प्रसिद्ध होते.
हेमंत कुमार | |
---|---|
जन्म |
हेमंत कुमार मुखोपाध्याय १६ जून इ.स. १९२० वाराणसी |
मृत्यू |
२६ सप्टेंबर इ.स. १९८९ कोलकाता, पश्चिम बंगाल |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | गायक, संगीतकार |
कारकीर्दीचा काळ | इ.स. १९४४ - १९८९ |
भाषा | हिंदी |
जन्म आणि बालपणीचा काळ
संपादनहेमंतदांचा जन्म १६ जून १९२० ह्या दिवशी वाराणसी येथे झाला. त्यांचे बालपण बंगालमधील एका खेड्यात गेले. त्याकाळी खेड्यात होत असलेली नाटके पहात आणि लोकसंगीत ऐकत हेमंतदा मोठे झाले, पण संगीताचे औपचारिक शिक्षण हेमंतदांना मिळाले नाही. त्यांचा कुटुंबीयांचा संगीतक्षेत्राशी काहीही संबंध नव्हता. कोलकाता येथील महाविद्यालयात शिकताना १९३५ साली त्यांनी आकाशवाणीवर गाण्याची चाचणी परिक्षा दिली आणि गायक म्हणून ते आकाशवाणीवर गायला पात्र झाले.
गायनात गती असणाऱ्या हेमंतदांना साहित्यक्षेत्रातदेखिल रस होता. १९३७ साली त्यांनी लिहिलेली एक लघुकथा आणि गायलेले एक गाणे ह्या दोन्ही गोष्टी प्रसिद्ध झाल्या आणि हेमंतदांमधील कलाकार जन्मास आला. वर्षभर विद्युत अभियांत्रिकी शिकल्यावर त्यांनी शिक्षणाला रामराम ठोकला आणि पूर्णवेळ संगीतकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली.
गायक आणि संगीतकार
संपादन१९४० साली 'निमोई संन्यासी' ह्या बंगाली चित्रपटासाठी तर १९४४ साठी 'ईरादा' ह्या हिंदी चित्रपटांसाठी गाणी गाऊन हेमंतदांचा चित्रपटातील पार्श्वगायकाच्या कारकिर्दीस सुरुवात केली. पैकी बंगाली चित्रपटासाठी संगीतकार हरि प्रसन्नो दास ह्यांच्या हाताखाली सहाय्यक संगीत दिग्दर्शक म्हणूनही हेमंतदांनी काम केले. स्वतंत्र संगीतकार म्हणून त्यांनी १९४५ सालच्या पूर्बोरंग ह्या बंगाली तर १९५२ सालच्या आनंदमठ ह्या हिंदी चित्रपटाला संगीत दिले.
१९५४ सालच्या नागिन चित्रपटासाठी संगीतदिग्दर्शित केलेले त्यांची गाणी खूप गाजली. ह्याच चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेरचा सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून पुरस्कारदेखिल मिळाला. गायक म्हणून हेमंतदांनी हिंदी चित्रपटसंगीत क्षेत्रातील जवळपास सर्व आघाडीच्या संगीतकारांकडे गाणी गाईली.
निर्माता
संपादन१९५९ साली हेमंतदांनी मृणाल सेन दिग्दर्शित नील आकाशेर नीचे ह्या चित्रपटाद्वारे चित्रपटनिर्मीती क्षेत्रात प्रवेश केला. त्यांच्या गीतांजली प्रॉडक्शन्स ह्या चित्रपटकंपनीने निर्माण केलेले बीस साल बाद (१९६२), कोहरा (१९६४), खामोशी (१९६९) ह्यांसारखे हिंदी चित्रपट त्यांतील गाण्य़ांसकट लोकप्रिय झाले. ह्या सर्व चित्रपटांसाठी संगीतदिग्दर्शनाची जबाबदारीदेखिल हेमंतदांनी यशस्वीपणे संभाळली होती.
मराठी गाणी
संपादनहेमंतदांनी गाईलेली मोजकी मराठी गाणी लोकप्रिय झाली. ’हा खेळ सावल्यांचा’ ह्या चित्रपटातील ’गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय’, लता मंगेशकर ह्यांच्याबरोबरचे ’मी डोलकर, डोलकर दर्याचा राजा’ ही हेमंतदांच्या लोकप्रिय मराठी गाण्यांची काही उदाहरणे आहेत.
पुरस्कार आणि सन्मान
संपादन- १९५४ फिल्मफेर सर्वोत्कृष्ट संगीतकार
- १९७० निमंत्रण चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (चित्रपट निर्माता)
- १९८४ ललान फकिर चित्रपटासाठी उत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
- संगीत नाटक अकादमी पुरस्कार
- १९८५ साली रविंद्र भारती विश्वविद्यालयासाची डि. लिट. ही पदवी
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
बाह्य दुवे
संपादन- हेमंत कुमार ह्यांचे अल्पचरित्र - (इंग्लिश भाषेत) Archived 2011-07-09 at the Wayback Machine.