उषा मंगेशकर

मराठी गायिका, संगीतकार

उषा मंगेशकर (१९३५ - हयात) या मराठी आणी गुजराती गायिका, संगीतकार आहेत. त्यांची आजी देवदासी व आजोबा ब्राह्मण होते. मा. दीनानाथ मंगेशकर यांच्या त्या कन्या.[] ज्वानीच्या आगीची मशाल हाती, छबीदार छबी, लागली कुनाची उचकी ही चित्रपट गीते त्यांनी गायली आहेत.[] पंडित दीनानाथ मंगेशकर आणि शेवंती (शुधामती) यांची  ती सर्वात लहान मुलगी. लता मंगेशकर, आशा भोसले आणि मीना खडीकर यांच्यामधील ती सर्वात लहान बहीण आणि संगीत-दिग्दर्शक भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांची मोठी बहीण  आहेत. ऑलटाइम ब्लॉकबस्टर ठरलेल्या 'जय संतोषी मां (1975)' साठी कमी बजेट असलेल्या चित्रपटासाठी काही भक्तीगीते गायल्यानंतर त्या  पार्श्वगायिका म्हणून चर्चेत आल्या. त्या चित्रपटातील त्यांच्या "मै तो  आरती" गाण्यासाठी त्यांना फिल्मफेर बेस्ट फीमेल प्लेबॅक सिंगर पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले होते. २००६ मध्ये त्या चित्रपटाच्या रीमेकसाठी त्यांनी तीच गाणी गायली.

उषा मंगेशकर

उषा मंगेशकर
आयुष्य
जन्म स्थान मुंबई
संगीत साधना
गायन प्रकार कंठसंगीत गायन,
संगीत कारकीर्द
कार्यक्षेत्र पार्श्वगायन, सुगम संगीत

उषा यांना चित्रकलेची आवड आहे. त्यांच्या "मुंगडा" या प्रसिद्ध गाण्यासाठी आणि पिंजरा या मराठी चित्रपटाच्या गाण्यांसाठी त्या प्रामुख्याने ओळखलया  जातात.

त्यांनी दूरदर्शनसाठी 'फूलवंती' संगीत नाटकही तयार केले होते.

पुरस्कार

संपादन

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नवी मुंबई शाखेच्या वतीने स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या सन्मानार्थ पुरस्कार लता दीदींच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.[ संदर्भ हवा ]

संदर्भ

संपादन
  1. ^ a b देसाई, माधवी (२०११). गोमन्त सौदामिनी. कोल्हापूर: माणिक प्रकाशन. pp. १०१.

बाह्य दुवे

संपादन