नौशाद
नौशाद अली (उर्दू: نوشاد علی , डिसेंबर २५, इ.स. १९१९; लखनौ - मे ५, इ.स. २००६; मुंबई) हा भारतीय संगीतकार होता. नौशादने अनेक बॉलीवूड चित्रपटांना संगीत दिले. त्याने चित्रपटसंगीतात हिंदुस्तानी शास्त्रीय रागदारीचा वापर केला. आजवरच्या सर्वश्रेष्ठ भारतीय संगीतकारांमध्ये नौशादचा उल्लेख केला जातो.

पुरस्कार संपादन
- १९५४ - सर्वोत्तम संगीतकार फिल्मफेअर पुरस्कार (बैजू बावरा)
- १९८१ - दादासाहेब फाळके पुरस्कार
- १९९२ - पद्मभूषण पुरस्कार
बाह्य दुवे संपादन
- खय्यामच्या नजरेतून नौशाद
- नौशादचा गौरव
- नौशादला श्रद्धांजली Archived 2007-03-18 at the Wayback Machine.
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील नौशाद चे पान (इंग्लिश मजकूर)