पद्मविभूषण पुरस्कार
पद्मविभूषण हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा नागरी सन्मान आहे. याचे स्वरूप एक पदक आणि प्रशस्तीपत्र असे असून भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार दिला जातो.
पद्मविभूषण | ||
![]() | ||
पुरस्कार माहिती | ||
---|---|---|
प्रकार | नागरिक | |
वर्ग | सामान्य | |
स्थापित | १९५४ | |
प्रथम पुरस्कार वर्ष | १९५४ | |
अंतिम पुरस्कार वर्ष | २०१२ | |
एकूण सन्मानित | २३५ | |
सन्मानकर्ते | भारत सरकार | |
पूर्व नावे | पहिला वर्ग | |
सुलट | ![]() | |
उलट | ![]() | |
रिबन | ![]() | |
प्रथम पुरस्कारविजेते | सत्येन्द्र नाथ बसु व इतर. | |
अंतिम पुरस्कारविजेते | डॉ.अनिल काकोडकर व इतर. | |
पुरस्कार क्रम | ||
भारतरत्न ← पद्मविभूषण → पद्मभूषण |
जानेवारी २, १९५४ मध्ये याची स्थापना करण्यात आली. याचे महत्त्व भारतरत्न पेक्षा कमी आणि पद्मभूषण पेक्षा जास्त असे समजले जाते. कोणत्याही क्षेत्रात देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या लोकांना हा पुरस्कार दिला जातो. जुलै १३, १९७७ ते जानेवारी २६, १९८० पर्यंत हा पुरस्कार स्थगित करण्यात आला होता.
सुरुवातीच्या काळात १.३७५ इंच व्यासाचे गोलाकार सुवर्णपदक पद्मविभूषण पुरस्कारासाठी तयार करण्यात आले होते. त्यावर मधोमध उठावाचे नक्षीकाम केलेले कमळ, पद्मविभूषण अशी अक्षरे आणि खालच्या बाजूला कमळाच्या फुलांचे चक्र होते. दुसऱ्या बाजूस सरकारी राजमुद्रा, देश सेवा अशी कोरलेली अक्षरे आणि कमळाच्या फुलांचे चक्र होते. पण अशा पदकाची फक्त नोंद सापडते ती कुणाला प्रदान करण्यात आल्याचा कुठेही उल्लेख सापडत नाही.
लगेचच दुसऱ्या वर्षी, म्हणजे १९५५ साली या पदकाचे स्वरुप बदलण्यात आलं. सोन्याऐवजी कांस्य धातूच्या १.१८७५ इंच व्यासाचे साधारण गोलाकार पदक तयार करण्यात आले. पदकाच्या एका बाजूला उठावदार कमळ कोरण्यात आले. त्याच्या समोरच्या चार पाकळ्या पांढऱ्या सोन्याने (सोने आणि निकेल किंवा सोने आणि पॅलाडियम धातूंपासून बनविलेला मिश्र धातू) मढविल्या गेल्या. वरच्या आणि खालच्या बाजूस चांदीचा मुलामा असलेली अनुक्रमे पद्म आणि विभूषण अशी अक्षरे कोरली केली. १९५५ पासून १९५७ पर्यंत ही अशी पदके वितरित करण्यात आली. त्यानंतर १९५८ सालापासून आजपर्यंत याच्या स्वरुपामध्ये ब्रॉन्झच्या धातूतील थोडा केलेला बदल वगळता कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या पदकाच्या वरच्या बाजूला फिक्या गुलाबी रंगाची फीत लावलेली असते.
सन २०१० पर्यंत एकूण २६४ व्यक्तींना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. दिल्लीच्या खालोखाल महाराष्ट्रात जन्मलेल्या किंवा महाराष्ट्र कार्यक्षेत्र असलेल्या व्यक्तींना हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे.
महाराष्ट्रातील पद्मविभूषणप्राप्त महान विभूतींची संख्या ४९ आहे, तर ५० दिल्लीवासियांनी हा पुरस्कार प्राप्त केलेला आहे
पद्मविभूषण पुरस्कारविजेतेसंपादन करा
संदर्भसंपादन करा
संदर्भसूचीसंपादन करा
- "प्रसिद्धिपत्रक, २०१९" (PDF). २५ जानेवारी २०१९ रोजी पाहिले.
बाह्य दुवेसंपादन करा
- "This Year's Padma Awards announced". Ministry of Home Affairs. 25 January 2010.
- "Padma Awards". Ministry of Communications and Information Technology. Archived from the original on २५ ऑगस्ट २०१४.
- "Padma Awards Directory (1954-2007)" (PDF). Ministry of Home Affairs. 2007-05-30. Archived from the original (PDF) on २६ नोव्हेंबर २०१३.