दत्तात्रय बाळकृष्ण कालेलकर

भारतीय सामाज सुधारक, इतिहासकार, शिक्षणतज्ज्ञ आणि पत्रकार

दत्तात्रय बाळकृष्ण कालेलकर ऊर्फ काकासाहेब कालेलकर (जम्म:१ डिसेंबर १८८५; - २१ ऑगस्ट १९८२) हे मराठी, गुजराती लेखक, इतिहासकार, गांधीवादी पत्रकार होते. आचार्य कालेलकर ऊर्फ काका कालेलकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते.

दत्तात्रय बाळकृष्ण कालेलकर
जन्म नाव दत्तात्रय बाळकृष्ण कालेलकर
टोपणनाव काका कालेलकर
काकासाहेब कालेलकर
जन्म १ डिसेंबर १८८५
मृत्यू २१ ऑगस्ट १९८१
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य, समाजकारण
भाषा मराठी
साहित्य प्रकार निबंध
पुरस्कार पद्मविभूषण पुरस्कार (इ.स. १९६४)
साहित्य अकादमी पुरस्कार (इ.स. १९६५)

कालेलकरांचा जन्म इ.स. १८८५ साली महाराष्ट्रातील सावंतवाडीजवळच्या बेलगुंडी या गावी झाला. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजात त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण झाले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही काळ त्यांनी 'राष्ट्रमत' या दैनिकात त्यांनी संपादकीय विभागात काम केले. काही काळ बडोदा येथील गंगाधर विद्यालयात ते शिक्षक म्हणून रुजू झाले. त्या विद्यालयात सरकारविरोधी कारवाया चालतात, असे कारण दाखवून ब्रिटिश शासनाने हे विद्यालय बळजबरीने बंद करवले.

विद्यालय बंद पडल्यानंतर कालेलकर मोहनदास करमचंद गांधी यांच्या गुजरातमधील साबरमती आश्रमाचे सदस्य झाले. तिथे असतानाच त्यांनी गांधींजींच्या 'सर्वोदय' या नियतकालिकाचे संपादक म्हणून काम पाहिले. गांधीजींच्या प्रेरणेमुळे गुजरात विद्यापीठाच्या स्थापनेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. काही काळ ते या विद्यापीठाचे कुलगुरूही होते.

हिंदी भाषेच्या प्रचारासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतकले. त्यासाठी हिंदुस्तानी प्रचारसभेच्या कामात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. भारताच्या एकात्मतेसाठी हिंदी भाषेचा प्रसार होणे, त्यांना महत्त्वाचे वाटे. त्यासाठी त्यांनी भारतभर दौरे केले. त्यांच्या या भारत भ्रमणाच्या अनुभवांवर त्यांनी गुजराती, हिंदी आणि मराठी भाषांमध्ये विपुल लेखन केले.

भारत स्वतंत्र झाल्यानंतर काकासाहेब बारा वर्षे राज्यसभेचे सदस्य होते. भारत स्वतंत्र झाल्यानंतर सहा वर्षांनी, म्हणजे इ.स. १९५३ साली 'मागासवर्गीय आयोग' नेमण्यात आला. कालेलकर या आयोगाचे अध्यक्ष होते. या आयोगाने इ.स. १९५५ साली आपला अहवाल सरकारला सादर केला. या अहवालात दलित आणि अस्पृश्यांसाठी अनेक कल्याणकारी योजनांची शिफारस करण्यात आली होती.

इंग्रजी, हिंदी, मराठी आणि गुजराती अश्या चार भाषांमधून कालेलकरांनी लेखन केले. त्यांच्या लेखन आणि शिक्षणक्षेत्रातील कामगिरीबद्दल त्यांना भारतीय केंद्रशासनाने इ.स. १९६४ साली [[पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवले. त्यांच्या साहित्यक्षेत्रातील कामगिरीबद्दल त्यांना इ.स. १९६५ साली साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान झाला, तर इ.स. १९७१ साली त्यांना साहित्य अकादमीचे सन्मान्य सदस्यत्व बहाल करण्यात आले.

आचार्य कालेलकरांचे २१ ऑगस्ट १९८१ रोजी वयाच्या ९६व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.

काकासाहेब कालेलकरांनी लिहिलेली मराठी पुस्तके

संपादन
  • नैवेद्य (साहित्य आणि समीक्षा)
  • रवींद्र झंकार (टागोरांच्या साहित्यावरील समीक्षात्मक लेखन)
  • रवींद्र मनन (टागोरांच्या साहित्यावरील समीक्षात्मक लेखन)

काकासाहेब कालेलकरांविषयी मराठी पुस्तके

संपादन
  • आचार्य काका कालेलकरांचे जीवनचिंतन (संकलन - ग.श. खोले/संपादन - ग.ना. जोशी)

पुरस्कार

संपादन