साहित्य अकादमी पुरस्कार
साहित्य अकादमी पुरस्कार साहित्याच्या क्षेत्रात महत्त्वाचे योगदान करणाऱ्या २४ भाषांतील साहित्यिकांना दिला जातो. साहित्यिकांमध्ये मानाचे स्थान असणाऱ्या या पुरस्काराचे वितरण दिल्ली येथे होते. एक लाख रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
साहित्य अकादमी पुरस्कार | |
---|---|
साहित्य अकादमी पुरस्कार | |
देश | भारत |
प्रदानकर्ता | साहित्य अकादमी, भारत सरकार |
प्रथम पुरस्कार | १९५५ |
शेवटचा पुरस्कार | २०१७ |
संकेतस्थळ | http://sahitya-akademi.gov.in |
इ.स. २००८ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मराठीतील लेखक व कादंबरीकार श्याम मनोहर यांना उत्सुकतेने मी झोपलो या कादंबरीसाठी मिळाला. इ.स. २०१० सालचा पुरस्कार सरोज देशपांडे यांना ’अशी काळवेळ’ नावाच्या, मूळ शशी देशपांडेलिखित अ मॅटर ऑफ टाइम या पुस्तकाच्या अनुवादासाठी मिळाला.
भाषा
संपादनखालील २४ भारतीय भाषांमधील योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात येतो.[१]
आसामी, इंग्रजी, उर्दू, उडिया, कन्नड, काश्मिरी, कोकणी, गुजराती, डोग्री, तमिळ, तेलुगू, नेपाळी, पंजाबी, बंगाली, बोडो, मणिपुरी, मराठी, मल्याळम, मैथिली, राजस्थानी, संथाळी, संस्कृत, सिंधी व हिंदी.
मराठीतील पुरस्कार विजेते
संपादन- श्याम मनोहर - मराठी
- अशोक कामत - कोकणी
- गोविंद मिश्रा - हिंदी भाषा
- रिता चौधरी - आसामी
- विद्या सागर नाझरे - बोडो
- श्रीनिवास बी. विद्या - कन्नड
- मिथीर सेन मीत - पंजाबी
- सरतकुमार मुखोपाध्याय - बंगाली
- चंपा शर्मा - डोग्री
- ए. ओ. मेमोचोबी - मणिपुरी
- प्रमोदकुमार मोहंती - उडिया
- ओम प्रकाश पांडे - संस्कृत
- जयंत परमार - उर्दू
साहित्य अकादमीतर्फे देण्यात येणारे बालसाहित्य पुरस्कार(२०१२)
संपादनहा पुरस्कार वितरण समारंभ पुणे शहरात २० नोव्हेंबर २०१२ रोजी, लेखक आणि समाजसेवक अनिल अवचट यांच्या हस्ते झाला. त्यावेळी नऊ कथासंग्रह, चार कवितासंग्रह, दोन निबंधसंग्रह, एक विज्ञानकथा संग्रह आणि आठ अन्य बाल साहित्यासाठी योगदान करणारे लेखक पुरस्कारप्राप्त ठरले. मराठी भाषेतील लेखक बाबा भांड यांपैकी एक आहेत.
- पुरस्कार्थी (एकूण २४)
- अयूब साबीर
- ओमप्रकाश ठाकुर
- के.एम. कोथांडम
- के. श्रीकुमार
- जगदीश लच्छानी
- दीनदयाल शर्मा
- पलक्ल भट
- पीतांबर हंसदा
- बन्सीलाल शर्मा
- बलराम बसाक
- बाबा भांड (मराठी बालसाहित्यकार)
- बाला शौरी रेड्डी
- मनझीर आशिक हरगानवी
- मनमोहन सिंहदाऊँ
- मुरलीधर झा
- योसेफ मेकवान
- रस्किन बाँड
- राम प्रसाद मोहंती
- रेड्डी राघवैय्या
- शंतनू तमूली
- शिशुपाल शर्मा
- सगोलसेम सिंह
- सुधा खरांगटे
- हरी चरण बोडो
साहित्य अकादमी सुवर्ण महोत्सवी पुरस्कार
संपादनसुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने, साहित्य अकादमी ने भारतीय भाषांमधील अनुवादातील उत्कृष्ट काव्यरचनांसाठी खालील पारितोषिके दिली.
- राणा नायर शीख संत बाबा फरीद च्या पंजाबी मधील श्लोकांच्या अनुवादासाठी.
- तपन कुमार प्रधान स्वतःच्या ओडिया कविता कालाहांडी संग्रहाच्या इंग्रजी अनुवादासाठी
- पारमिता दास पार्वती प्रसाद बरुवा यांच्या आसामी कवितांच्या इंग्रजी अनुवादासाठी.
जीवनगौरव आणि तरुण यशासाठी सुवर्ण महोत्सवी पारितोषिक नामदेव ढसाळ, रणजीत होस्कोटे, मंदाक्रांता सेन, अब्दुल रशीद, सीतारा एस. आणि नीलाक्षी सिंग.
अधिक वाचन
संपादनसाहित्यातील इतर पुरस्कार
संपादनपहा : पुरस्कार विजेते मराठी साहित्यिक ; ज्ञानपीठ ; पुरस्कार
बाह्य दुवे
संपादनसाहित्य अकादमीचे संकेतस्थळ (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
संदर्भ
संपादन- ^ पुरस्कारासाठी मान्यता प्राप्त भाषांची यादी (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |