बोडो भाषा
(बोडो या पानावरून पुनर्निर्देशित)
बोडो ही भारत देशाच्या आसाम राज्यामधील एक भाषा आहे. ही भाषा बोडो जमातीचे सुमारे १३ लाख लोक वापरतात.
बोडो | |
---|---|
बड़ो | |
स्थानिक वापर | भारत |
प्रदेश | आसाम |
लोकसंख्या | १३ लाख |
भाषाकुळ |
चिनी-तिबेटी
|
लिपी | देवनागरी |
अधिकृत दर्जा | |
प्रशासकीय वापर | भारत |
भाषा संकेत | |
ISO ६३९-३ | brx[मृत दुवा] |
भारताच्या संविधानामधील आठव्या अनुसूचीनुसार बोडो ही भारताच्या २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे.
बोडो हा चिनी-तिबेटी भाषासमूहातील भाषांचा आसामातला गट आहे. बोडो गटात गारो, त्रिपुरी व मीकीर याही महत्त्वाच्या बोली आहेत. बोडो भाषेतील उपसर्ग किंवा प्रत्यय अत्यंत तोकडे असून भाषिक परिवर्तनात बोडो गटातील बोलींचे बहुतेक सर्व उपसर्ग नष्ट झाले आहेत. केवळ क्रियापदांचे कारक किंवा सकर्मक रुपदर्शक फ-किंवा प-हा उपसर्ग तग धरून आहे.[१]