हा लेख कविता रचणारी व्यक्ती अशा अर्थाचा व्यक्तिवाचक शब्द याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पहा, कवी (निःसंदिग्धीकरण). कवी हा मराठी भाषेतील शब्द कविता रचणारी व्यक्ती अशा व्यक्तिवाचक अर्थाने वापरला जाणारा शब्द आहे. कविता करणाऱ्या स्त्रीस 'कवयित्री' असे म्हणतात. काही प्रसिद्ध कवी आणि कवयित्री

 1. |बालकवी (त्र्यंबक बापुजी ठोंबरे)
 2. |कुसुमाग्रज (विष्णू वामन शिरवाडकर)
 3. |केशवसुत (कृष्णाजी केशव दामले)
 4. |केशवकुमार (प्रल्हाद केशव अत्रे)
 5. |शांता शेळके
 6. |बहिणाबाई चौधरी
 7. |अनिल बाबुराव गव्हाणे
 8. |विजया वाड
 9. |भा.रा. तांबे
 10. |मंगेश पाडगावकर
 11. |प्रवीण दवणे
 12. |ग.दि. माडगुळकर
 13. |कवी अनिल [आत्माराम रावजी देशपांडे)
 14. |कवी बी (नारायण मुरलीधर गुप्ते)
 15. |गोविंदाग्रज (राम गणेश गडकरी)
 16. |ग.ह. पाटील
 17. |विठ्ठल वाघ
 18. |बा.भ बोरकर |ना.धों. महानोर
 19. |कवी यशवंत (यशवंत दिनकर पेंढरकर)(बडोद्याचे राजकवी)
 20. |साने गुरुजी
 21. |दुर्गा भागवत
 22. |शिरीष गोपाळ देशपांडे
 23. |माधव जुलिअन
 24. |दिलीप चित्रे
 25. |ग.ल. ठोकळ
 26. |गो.ना. माडगावकर
 27. |सुरेश भट
 28. |श्री. बा. रानडे
 29. |गोपीनाथ
 30. |ना.गं. लिमये
 31. |केशव मेश्राम
 32. |बा.सी. मर्ढेकर
 33. |शं.चिं. श्रीखंडे
 34. |वि.म. कुलकर्णी
 35. |ना.वा. टिळक
 36. |शंकर वैद्य
 37. |इंदिरा संत
 38. |अरुणा ढेरे
 39. |कवी ग्रेस (माणिक गोडघाटे)
 40. |वा.रा. कांत
 41. |अनंत काणेकर
 42. |आरती प्रभू (चिं त्र्य खानोलकर)
 43. |पद्मा
 44. |कवी सुधांशु
 45. |विंदा करंदीकर
 46. |पु.शि. रेगे
 47. |सदानंद रेगे
 48. |अनंत फंदी
 49. |सोपानदेव चौधरी
 50. |वसंत आबाजी डहाके
 51. |दि.पु. चित्रे
 52. |गो.नी. दांडेकर
 53. |वसंत बापट
 54. |संगीता बर्वे
 55. |शिरीष पै
 56. |वि.भि. कोलते
 57. |फ.मुं शिंदे
 58. |अज्ञातवासी (दिनकर गंगाधर केळकर)
 59. |मधुकर केचे
 60. ।दशरथ यादव
 61. |किरण शिवहर डोंगरदिवे
(निसर्गांत नसलेल्या पण प्राचीन कवींनीं कल्पिलेल्या कविकल्पना) १. चक्रवाक आणि चक्रवाकी यांच्यामध्यें फक्त एक कमळाचें पान असतें. पण तीं एकमेकांस दिसत नाहींत. सारी रात्र दोघांना विरहावस्थेंत कंठावी लागते. सूर्योदयीं त्यांचें मीलन होतें. 

२. स्त्रीच्या विविध हावभावांनीं पुढील वृक्ष बहरतात असा कविसंकेत आहे.

स्त्रीच्या स्पर्शें प्रियंगू प्रति आणि बकुला मद्य गंडूषकांनीं ।

पादाघातें अशोका, तिलक-कुरबकांज वीक्षणालिंगनांनीं ॥

मंदारा नर्मवाक्यें, सुरूचिर हंसनें चंपका येई बार ।

आम्रा फुंकें ; नमेरू फुलति कलरवें नर्तनें कर्णिकार

३, मृगाचे किडे आषाढात दिसते कीं, पृथ्वी ऋतुस्नात झाली असें समजतात.

४. ग्रीष्मऋतूच्या (पावसाळ्याच्या) आरंमीं हंस मानस सरोबराकडे जातात.

५. फक्त मेघजल पिऊनच चातक आपली तहान भागवितो.

६. अतिशयोक्तींतच कविप्रतिमेचा विलास आहे. असा प्राचीन संकेत आहे.

७. चंद्रकांत मणी हा त्याच्यावर चंद्रकिरणे पडली की पाझरतो.

८. कामधेनु ही स्वगींय धेनु. चिंतामणि हें स्वागींय रत्न व कल्पतरु हा स्वर्गीय वृक्ष हे ईप्सितांची परीपूर्ति करणारे आहेत असा कविसंकेत आहे.

९. पावसाळ्याच्या आरंमीं पहिली मेघगर्जना झाली कीं कदंव फुलतात.

१०. लोहाला परीस नावाच्या मण्याचा (दगडाचा) स्पर्श झाला कीं लोखंडाचें सोनें होतें.

११. राजहंस हा दूध आणि पाणी वेगळे करतो.

१२. सत्तावीस तारकांपैकीं कलंकित चंद्राबद्दल एकनिष्ठा ठेवणारी रोहिणीच होती असा कविसंकेत आहे. (रोहिणी, जून १९६१)

१३. ढेकणाच्या रक्तानें हिरा भंगतो. ढेकणाच्या संगें । हिरा तो मंगला । कुसंगें नाडळ । साधु तैसा ॥ (तुकाराम)

१४. स्वाती नक्षत्राच्या पावसानें शिंपल्यांत मोती उत्पन्न होतात.

१५. संध्याकाळची वेळ व पाणवठयाचें स्थळ प्रणयलीलांना अनुकूल मानण्याचा कविसंकेत आहे.

१६. मोती हा पाण्यापासून बनतो त्याचें पुन्हा जर पाणी करावयाचे असेल तर त्याला हंसाची चोंच लागावी असा कविसंकेत आहे. (गीतेच्या श्लोकांवरील प्रवचनें)

१७. हत्तीच्या गंडस्थळांतून स्त्रवणाऱ्या मदाचा विशिष्ट सुगंध सेवन करण्याकरितां भ्रमर लुब्ध होतात.

१८. हेमाम्भोज नांवाचीं सुवर्णकमळे फक्त मानस सरोवरांत फुलतात.

१९. अमृताच्या सेवनाने वस्तुमात्राला चैतन्य व चिरजीवन प्राप्त होतें असा संकेत आहे. (गाथा सप्तशती)

२०. शेफालिकेची फुले मध्यरात्रीनंतर दरवळूं लागतात.

२१. सूर्यकांत मणी सूर्यकिरणांच्या संयोगानें पेट घेतो.

२२. सर्व अलंकार असून कपाळी कुंकू नसलें तर खरी शोभा नाहीं असा कविसंकेत आहे.

२३. घनगर्जितामुळें बगळ्या गर्भवती होतात.

२४. चंपक कलिका रम्य असली व भ्रमर रसिक असला तरी तिच्याजवळ भ्रमर जात नाहीं.

२५. आज्ञाभंग करणारा व विश्वासघातकी अशा माणसांचा काव्यारंमी नामोल्लेख करू नये.

भर्तुराज्ञां न कुर्वन्ति येच विश्वासघातकाः ।

तेषां नामापि न ग्राह्मं काव्यस्यादौ विशेषतः ॥ (सुभाषित).