बाबा भांड
बाबा भांड (जन्म : २८ जुलै, इ.स. १९४९) हे औरंगाबादमध्ये राहणारे मराठी भाषेतील लेखक, कादंबरीकार व प्रकाशक आहेत. त्यांनी इंग्रजी साहित्यात एम.ए. केले आहे. त्यांनी अल्पकाळ अध्यापनाचे काम केले आहे.
बाबा भांड | |
---|---|
जन्म | रा. वडजी तालुका पैठण |
सहावीत असताना डायरी लिहिली. हे पहिले लिखाण अलीकडं २००१ साली पुस्तकरूपाने २००१ साली प्रकाशित झाली.
विद्यार्थीजीवनात स्काउटबरोबर त्यांना युरोपचा प्रवास करायला मिळाला. या अनुभवावर त्यांनी ’लागेबांधे’ नावाचे प्रवासवर्णन लिहिले आहे. बाबा भांड यांनी १९७५ मध्ये पत्नी सौ. आशा सोबत धारा व नंतर साकेत प्रकाशनाची स्थापना केली.. त्यांनी आजवर (ऑगस्ट २०१५) १७००हून अधिक पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यांच्या स्वतःच्या मराठीत दहा कादंबऱ्या प्रकाशित झाल्या असून, तीन कथासंग्रह, चार ललित गद्य, चार प्रवासवर्णने, दोन आरोग्यविषयक पुस्तके, तीन एकांकिका संग्रह, चार अनुवाद, नऊ संपादित पुस्तके, पंधरा किशोर कादंबऱ्या, अठरा बालकथा संग्रह आणि नवसाक्षरांसाठी सत्तावीस पुस्तके व इतर काही, अशा एकूण ८५ पुस्तकांचे लेखन, संपादन व निर्मिती त्यांच्या हातून झाली आहे.
मुलांसाठी `साकेत सवंगडी' नियतकालिकांचे त्यांनी दीर्घकाल संपादन, प्रकाशन केले आहे.
त्यांच्या "दशक्रिया" ह्या कादंबरीच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. या कादंबरीसाठी त्यांना डझनावारी पुरस्कार मिळाले.
‘टीकास्वयंवर’सारखा साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त ग्रंथ प्रकाशित करणाऱ्या ‘साकेत प्रकाशनाचे’ ते संचालक आहेत.
बाबा भांड यांच्या साहित्याचा हिंदी, इंग्रजी, कानडी, गुजरातीत अनुवाद झाला आहे.
५०१ अभंगांची रचना करणारा कृष्णा हा बाबा भांड यांचा पुतण्या देवभक्त योगी होता. त्याने २००६ साली अवघ्या पंचविशीत अग्निप्रवेश करून आयुष्य संपवले त्याच्या जीवनावर बाबा भांड यांनी 'योगी' ही कादंबरी, चरित्र, अभंगावर समीक्षा, ओवीबद्ध चरित्रे अशी लहान-मोठी पंधरा पुस्तके प्रकाशित केली.
बाबा भांड यांनी वयाच्या पासष्टीनंतर सर्व संस्थात्मक कामातून स्वेच्छा निवृत्ती घेतली असून, ते आणि पूर्णवेळ वाचन, लेखन, प्रकाशनासह शेती, प्रवास आणि छायाचित्रणाच्या छंदासाठी घालवतात. त्यांचे बहुतांशी जग बघून झाले आहे..
प्रकाशित साहित्य
संपादन- आनंदाश्रम (संस्थेचा परिचय)
- काजोळ (कादंबरी)
- कृष्णा: अग्निसमाधीतला योगी (हे पुस्तक nhunt.in/jDIk येथे वाचता येते.
- कोसलाबद्दल (साहित्य आणि समीक्षा)
- क्रांतिकारक खासेराव जाधव (चरित्र)
- जरंगा (कादंबरी)
- झेलम ते बियांस
- तंट्या (ऐतिहासिक चरित्रात्मक कादंबरी) (जननायक तंट्या भील या नावाने हिंदीतही भाषांतरित)
- तंट्या भिल्ल आणि शेतकरी-आदिवासी उठाव (संदर्भ साहित्य)
- दशक्रिया (कादंबरी)
- धर्मा (कादंबरी) (१६ आवृत्त्या)
- पांगोऱ्या (कथासंग्रह)
- पारंब्या (कथासंग्रह)
- पांढऱ्या हत्तीची गोष्ट (कादंबरी)
- मलाला (चरित्र)
- युगद्रष्टा महाराज (ऐतिहासिक चरित्रात्मक कादंबरी)
- योगी
- श्रेष्ठ भारतीय बालकथा
- सादाको आणि कागदी बगळे (कथासंग्रह, मूळ लेखक कोअर एलिनॉर; अनुवादक बाबा भांड).
- स्वातंत्र्य लढ्याचे पाठीराखे सयाजीराव गायकवाड (चरित्र)
अभ्यासक्रमांत बाबा भांड यांचे साहित्य
संपादन- अनेक विद्यापीठांत काजोळ, दशक्रिया, सादाको, अभ्यासक्रमात
- नाशिकच्या मुक्त विद्यापीठात अभ्यासामध्ये ’धर्मा’ कादंबरीचा समावेश
- मराठी नववी पाठ्यपुस्तकात पाठ
सन्मान आणि पुरस्कार
संपादन- १३ ऑगस्ट २०१३ रोजी सासवड येथे झालेल्या १६व्या आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद बाबा भांड यांनी भूषविले होते.
- नवी दिल्ली येथील साहित्य अकादमीचा बालसाहित्याचा राष्ट्रीय पुरस्कार
- नादेड जिल्हा परिषदेचा नरहर कुरुंदकर पुरस्कार.. हा पुरस्कार दिला तेव्हा, ज्यांची पुस्तके बाबा भांड यांनी प्रकाशित केली त्या मधू सावंत यालेखिका जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा होत्या.
- पुणे जिल्हा परिषदेचा आचार्य अत्रे पुरस्कार (२०१०)
- बालवीर चळवळीसाठी राष्ट्रपती पदक
- बालसाहित्याचा राष्ट्रीय पुरस्कार
- भैरूरतन दमाणी पुरस्कार, सोलापूर
- अखिल भारतीय जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्या ९व्या अखिल भारतीय मराठा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
- बाबा भांड यांची मराठी साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. (५-८-२०१५)
- महाराष्ट्र फाउंडेशनसह इतर संस्थांचे विविध पुरस्कार
- महाराष्ट्र शासनाचा 2009चा श्री.पु. भागवत उत्कृष्ट प्रकाशक पुरस्कार साकेत प्रकाशनास २००९ साली मिळाला.
- महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठीचे एकूण दहा पुरस्कार. त्यांतला एक "दशक्रिया"साठी
- महाराष्ट्र साहित्य परिषदेचा हरी नारायण आपटे पुरस्कार
- वर्ध्याचा दाते कादंबरी पुरस्कार
- सांगाती अकादमीचा पुरस्कार
- साहित्य संमेलन पुरस्कार
- बाबा भांड हे मराठवाडा साहित्य परिषदेच्या ३४व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
बाबा भांड यांचे सामाजिक कार्य
संपादन- बाबा भांड यांनी आपल्या जन्मगावी ग्रामविकासाअंतर्गत पाणलोट क्षेत्र विकासाचे काम केले आहे.
- गावी छत्रपती शाहू वाचनालयाची स्थापना केली.
- खेड्यातील गरीब शेतमजुरांच्या अपंग-मूकबधिर मुलांसाठी निवासी शाळा काढली.
- काहीकाळ वृद्धाश्रम, शरीर व मनस्वास्थ्यासाठी योगसाधना संस्थेत विश्वस्त म्हणून काम केले..
- मराठी बालकुमार साहित्य संमेलन आयोजनात सहभाग
संदर्भ
संपादनबाह्य दुवे
संपादन- म.टा. मधील "कृष्णा : अग्निसमाधीतला योगी" बद्दल लेख[permanent dead link]
- दशक्रियाचे हिंदी भाषांतर
- तंट्या भिल्लचे आकाशवाणीकडून अपहरण Archived 2020-09-22 at the Wayback Machine.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |