राजस्थानी भाषा

(राजस्थानी या पानावरून पुनर्निर्देशित)

राजस्थानी ही भारत देशामधील एक भाषा आहे. हिंद-आर्य भाषासमूहामधील एक असलेली राजस्थानी भाषा प्रामुख्याने भारताच्या राजस्थान राज्यात तसेच पाकिस्तानच्या सिंधपंजाब प्रांतांमध्ये वापरली जाते. मारवाडी ही भाषा अनेकदा राजस्थानीचीच उपभाषा मानली जाते. मारवाडी व राजस्थानी भाषांचे एकूण ५ कोटी भाषिक आहेत.

राजस्थानी
स्थानिक वापर भारत, पाकिस्तान
प्रदेश राजस्थान
लोकसंख्या २ कोटी
५ कोटी मारवाडीसह
भाषाकुळ
इंडो-युरोपीय
लिपी देवनागरी
भाषा संकेत
ISO ६३९-२ raj
ISO ६३९-३ raj (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)

गुजरातीप्रमाणे राजस्थानी देखील गुर्जर जमातीच्या लोकांमध्ये विकसित होत गेली. राजस्थानीच्या मेवाडी, शेखावती, बाग्री, मेवती, धुंधरी, हडौती, वागडी इत्यादी अनेक बोली आढळतात.