साबरमती आश्रम
साबरमती आश्रम हा भारतातील गुजरात राज्यातील अमदावाद शहराजवळ साबरमती नदीच्या किनाऱ्यावर आहे. याची स्थापना महात्मा गांधींनी १७ जून इ.स. १९१७ साली केली होती.[१] दक्षिण आफ्रिकेतून परत आल्यानंतर महात्मा गांधी आणि त्यांच्या पत्नी कस्तुरबा यांचे हे निवासस्थान बनले.[२]
हरिजनांचा आश्रम
संपादनतत्कालीन समाजातील अस्पृश्य लोकांना गांधीजी यांनी "हरिजन" असे संबोधले आणि या व्यक्तींच्या विकासासाठी साबरमती आश्रमात विशेष कार्य केले गेले.[३]
आश्रमातील प्रदर्शन
संपादनसाबरमती आश्रमात महात्मा गांधी यांचा इतिहास आणि स्वातंत्र्यलढ्यातील योगदान व घडामोडी यांचे दर्शन घडवणारे कायमस्वरूपी प्रदर्शन उभारलेले आहे.या माध्यमातून महात्मा गांधींचे विचार, मूल्ये आणि शिकवण जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ
संपादन- ^ ग्रुप, एसएसजीसी. Monthly Current Affairs August 2017: Monthly Current Affairs August 2017 (हिंदी भाषेत).
- ^ मलिक, शिवा एन. (२००६). बुक्स.गूगल.को.इन - Dehātī Gāndhī: bhakta Phūlasiṃha jīvana-vr̥tta 1885-1942 Check
|url=
value (सहाय्य) (हिंदी भाषेत). शिव लक्ष्मी विद्या धाम. - ^ पासवान, संजय; जयदेवा, प्रमांशी (२००२). Encyclopaedia of Dalits in India: Movements (इंग्रजी भाषेत). ज्ञान पब्लिशिंग हाउस. ISBN 9788178350349.