मकबूल फिदा हुसेन
मकबूल फिदा हुसेन (१७ सप्टेंबर, इ.स. १९१५ ; - ९ जून, इ.स. २०११), एम. एफ. हुसेन नावाने प्रसिद्ध, हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतीय चित्रकार होते.[१]
मकबूल फिदा हुसेन | |
मकबूल फिदा हुसेन | |
पूर्ण नाव | मकबूल फिदा हुसेन |
जन्म | सप्टेंबर १७, इ.स. १९१५ पंढरपूर, महाराष्ट्र |
मृत्यू | जून ९, इ.स. २०११ लंडन, युनायटेड किंग्डम |
राष्ट्रीयत्व | भारतीय , कतारी |
कार्यक्षेत्र | चित्रकला |
प्रशिक्षण | जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई |
चळवळ | प्रोग्रसिव आर्ट ग्रुप |
प्रसिद्ध कलाकृती | मदर इंडिया, इलस्ट्रेशन ऑफ रामायण, महाभारत |
पुरस्कार | पद्मश्री (१९५५) पद्मभूषण (१९७३) पद्मविभूषण (१९९१) |
वडील | फिदा हुसेन |
आई | झुनैब हुसेन |
एमएफ हुसेन यांचा जन्म १७ सप्टेंबर १९१५ रोजी भारत देशाचे महाराष्ट्र राज्यातील पंढरपूर नगरीत सुलायमणी बोहरा या कुटुंबात झाला. त्यांचे २०० वर्षाच्या इतिहासाचे मूळ शोधले तर ते येमेण या देशापर्यंत जाते. तेथून ते घराने गुजरातमध्ये पोहचले आणि नंतर पंढरपूर ! ते जेव्हा बडोदा येथे मदरसा मध्ये राहत होते तेव्हा त्यांनी कलेची परीक्षा देऊन हस्ताक्षर कला प्राप्त केली होती. त्यांचे शिक्षण सर जे.जे.स्कूल ऑफ आर्ट मध्ये झाले. त्यांची पेंटर, ड्राइंग, लेखक, फिल्म मेकर ही ओळख आहे. त्यांनी केलेले मिनाक्षी ए टेल ऑफ थ्री सिटीज या पेंटिंगने ते जगप्रशिद्द झाले. सुरुवातीच्या काळात हे सिनेमाच्या जाहिरातीचे पेंटिंग काढीत असत. जादा पैसे कमविण्यासाठी त्या काळात ते खेळण्याच्या कारखान्यात खेळणी तयार करून तसेच त्यांचे आराखडे करून देण्याचे काम करीत असत. कधी कधी गुजरातमध्ये जाऊन निसर्गचित्रे रेखाटत.
राष्ट्रीय एकात्मतेसाठी यांच्यासारख्या तरुण कलाकारांनी भविष्य उज्ज्वल करण्यासाठी बंगाल स्कूल ऑफ आर्टचे मदतीने इतरांना आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचण्यासाठी प्रोच्छाहान देऊन सांघिक योजना आखली पण १४ ऑगस्ट १९४७ रोजी भारत पाकिस्तान असे देशाचे विभाजन झाल्याने आणि धार्मिकतेचा उदय झाल्याने या योजनेस फार मोठी हानी पोहचली आणि हा कलाकारांचा मुंबई संघ डिसेंबर १९४७ मध्ये उध्वस्त झाला. भारतीय कलाकारांना हा एक टर्निंग पॉइंट ठरला.
भारतातील आधुनिक चित्रकलेच्या क्षेत्रात लक्षणीय कामगिरी करणाऱ्या कलावंतांमध्ये गणला जाणारे हुसेन इ.स. १९४० च्या दशकापासून चित्रकार म्हणून नावारूपास येऊ लागले. फ्रान्सिस न्यूटन सूझा याने मुंबईत स्थापलेल्या प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स ग्रुप या समूहात हुसेन इ.स. १९४७ साली दाखल झाले. तत्कालीन भारतीय कलाक्षेत्रात बंगाल स्कूल म्हणून ओळखल्या गेलेल्या कलापरंपरेतील राष्ट्रवादी मर्यादा उल्लंघून आंतरराष्ट्रीय कलाक्षेत्रातील प्रवाहांशी संवाद साधू पाहणाऱ्या कलाकारांचा या समूहात समावेश होता. इ.स. १९५२ साली झुरिच येथे एम.एफ.हुसेन यांचे पहिले एकल चित्रप्रदर्शन भरले. काही वर्षांतच युरोप व अमेरिकेतही त्याच्या कलेची ख्याती पसरली. इ.स. १९५५ साली भारतीय केंद्र शासनाने त्याला पद्मश्री पुरस्काराने गौरवले.
१९६६ - १९९०
संपादनसन १९६७ मध्ये हुसेन यांचा “Through The Eyes of a Painter” हा पहिला सिनेमा बर्लिन आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये दाखविला आणि त्यांना गोल्डन बियर शॉर्ट फिल्म अवॉर्ड मिळाला.[२] सन १९७१ मध्ये ब्राझीलचे साओ पाउलो बींनियल येथे पाब्लो पिकासो यांचे बरोबर एमएफ हुसेन हे खास निमंत्रित होते. सन १९७३ मध्ये त्यांना पद्मभूषण अवॉर्ड मिळाला.[३] सन १९८६ मध्ये त्यांना राज्य सभेचे सदस्यत्व मिळाले. सन १९९१ मध्ये त्यांना पद्मविभूषण अवॉर्ड मिळाला.
१९९० – २००५
संपादन१९९० मध्ये हिंदुत्ववादी लोकांनी त्यांच्या चित्रांचा निषेध केला. वास्तविक ती चित्रे सन १९७० मध्ये बनविलेली होती. पण त्यावर कोणताही विरोध १९९६ पर्यंत झाला नव्हता. पण जेव्हा विचार भारती या हिंदी साप्ताहिकात त्याबद्दल समाचार येऊ लागला तेव्हापासून विरोध होऊ लागला. त्यांच्या विरोधात आठ फौजदारी गुन्हे दाखल झाले. सन २००४ मध्ये दिल्ली कोर्टाने ते फेटाळले. पुढील काळात हिंदूत्ववादी लोकांनी तडजोड केली. सन १९९८ मध्ये बजरंग दल सारख्या संघटनांनी हुसेन यांच्या घरावर हल्ला केला. तेव्हा शिवसेनेने त्यांना पाठिंबा दिला. पोलिसांनी बजरंग दलाचे २६ कार्यकर्त्यांना अटक केली. इंग्लंडमध्ये सुद्धा हुसेन यांच्या चित्रांना विरोध झाला.
सन २००० मध्ये गज गामिनी हा सिनेमा त्यांनी निर्माण केला आणि दिग्दर्शितही केला. त्यांच्या फिदा सिनेमात माधुरी दीक्षितचा फोटो सीन आहे आणि मोहब्बत सिनेमात मुख्य भूमिका आहे. त्यांच्या A tale of two cities या सिनेमातील एका गाण्याला मुस्लिमांनीही विरोध केला होता.
२००६ - २०११
संपादनफेब्रुवारी २००६ मध्ये हिंदू देवदेवतांच्या चित्राने लोक नाराज आहेत हे त्यांचेवर आरोप झाले. हुसेन हे भारतातील बेस्ट पेड पेंटर आहेत. २००८ मध्ये त्यांचे एक चित्र १.६ मिललियन पाउंडला सर्वात जास्त किमतीला विकले होते. हुसेन बहुतेक दोहा येथे राहत असत पण उन्हाळ्यात ते लंडनला जात. सन २०१० मध्ये त्यांनी कतारीचे नागरिकत्व स्वीकारले आणि भारताचा पासपोर्ट परत केला.[४] तेथे त्यांनी दोन मोठी कामे हाती घेतली त्यात एक होते अरब लोकांचा इतिहास आणि दूसरा विषय होता भारतीय लोकांचा इतिहास ! ते दोहा येथील संग्रहालयात हे लिखाणाचे काम करत असत. हुसेन ९५ वर्षाचे असताना त्यांना ९ जून २०११ रोजी हार्ट अट्याक आला. त्यापूर्वी ते बरेच महीने अत्यवस्थ होते. लंडन येथील रोयल ब्रोंटोण हॉस्पिटल मध्ये त्यांचा अंत झाला.[५]
वादग्रस्त
संपादन- जून १९७५ दुर्गा आणि उधळलेले घोडे यांच्याभोवती मतमतांतरे व्यक्त झाली. तत्कालीन वादग्रस्त पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाच त्यांनी दुर्गेच्या रूपात साकारले आहे.
- २००६ मध्ये हुसेन यांनी काढलेल्या सरस्वती व अन्य हिंदू देवतांच्या नग्न चित्रांविरोधात खटल्यांचा सिलसिला चालू झाला.[६]
- फेब्रुवारी २००६मध्येच इंडिया टुडे या पाक्षिकातील 'आर्ट फॉर मिशन कश्मिर' या शीर्षकाच्या या जाहिरातीत भारतमाता म्हणून एका विवस्त्र स्त्रीचे चित्र भारताच्या नकाशाच्या पार्श्वभूमीवर चितारले होते आणि भारतातील विविध राज्यांची नावे तिच्या शरीरावर ठिकठिकाणी लिहिली होती. विश्व हिंदू परिषद आणि हिंदू जनजागृती समितीने याविरोधात निदर्शने केली. हुसेन यांना माफी मागून चित्र काढून टाकावे लागले.
चित्रपट निर्मिती
संपादनसंदर्भ
संपादन- ^ "भारतीय चित्रकार एम.एफ.हुसेन यांच्या बद्दल".
- ^ "पुरस्कार आणि सन्मान १९६७". 2013-10-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-09-02 रोजी पाहिले.
- ^ "एम.एफ.हुसेन यांना पद्मभूषण अवॉर्ड मिळाला" (PDF). 2015-10-15 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2016-09-02 रोजी पाहिले.
- ^ "एम.एफ.हुसेन यांना कतारचे नागरिकत्व स्वीकारले".
- ^ "भारतातील सर्वात प्रसिद्ध पेंटर मकबूल फिदा हुसेन यांचे वृद्धापकाळाने ९५ व्या वर्षी निधन झाले".
- ^ "हिंदू देवतांच्या नग्न चित्रांविरोधात एम.एफ.हुसेन यांच्यावर खटला दाखल करण्यात आला".