शिवाजीराव रामोजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत (तमिळ: ரஜினிகாந்த்; तेलुगू भाषा: రజనికాంత్; कन्नड: ರಜನೀಕಾಂತ್) (डिसेंबर १२, १९५०, - हयात) हे एक बहुभाषिक भारतीय अभिनेता आहेत.मनोरंजन व्यवसायातील तमिळ चित्रपट अभिनेता आहेत.

रजनीकांत
जन्म शिवाजीराव रामोजीराव गायकवाड
१२ डिसेंबर, १९५० (1950-12-12) (वय: ७३)
बंगळूर, कर्नाटक
इतर नावे रजिनी, थलैवा, सुप्परस्टार ,बॉस.
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय (चित्रपट : कन्नड, तेलुगू, तमिळ, हिंदी, मल्याळम, इंग्लिश, बंगाली)
कारकीर्दीचा काळ इ.स. १९७५ पासून
भाषा मराठी, तमिळ
प्रमुख चित्रपट शिवाजी द बॉस, बिल्ला, दळपती, चंद्रमुखी, बाशा, मुतू, हम, पडैयप्पा
वडील रामोजीराव गायकवाड
आई जिजाबाई गायकवाड
धर्म हिंदू

त्यांचे प्रमुख क्षेत्र तमिळ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी भाषा, कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला आहे. त्यांची मातृभाषा मराठी असली, तरीही त्यांनी मराठी चित्रपटांत अद्याप पर्यंत काम केलेले नाही.[ संदर्भ हवा ]

इ.स.२००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शिवाजी द बॉस' या तमिळ चित्रपटानंतर रजनीकांत हे भारतातील आणि आशिया खंडातील सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार ठरले.[ संदर्भ हवा ] या चित्रपटाकरिता त्यांना तब्बल २६ कोटी रुपये मानधन देण्यात आले होते. रजनीकांत हे भारताबाहेरही अनेक देशांत लोकप्रिय अभिनेते आहेत, तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुक मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे. भारताखालोखाल जपान मध्येही त्यांचे चित्रपट लोकप्रिय आहेत. दक्षिणपूर्व आशिया आणि जपान मध्ये रजनीकांत ह्यांचा मोठा चाहतावर्ग आहे आणि त्यांचे फॅनक्लब्सही आहेत.[ संदर्भ हवा ]

पूर्वायुष्य आणि कुटुंबीय

संपादन

रजनीकांत ह्यांचा जन्म १२ डिसेंबर १९५० रोजी बंगळूर येथे एका महाराष्ट्रीय मराठा हेन्द्रे पाटील मराठा समाजात झाला. त्यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड असून वडिलांचे रामोजीराव गायकवाड आणि आईचे जिजाबाई गायकवाड असे आहे.[] गायकवाड कुटुंबियांच्या चार अपत्यांपैकी रजनीकांत सर्वात धाकटे आहेत. त्यांचे मूळ गांव पुणे जिल्ह्यातील, पुरंंदर तालुक्यातील मावडी कडेपठार हे सांगितले जाते. तसेच जेजुरीचा खंडेराया त्यांचे कुलदैवत असल्याचे मध्यंतरी रजनीकांत ह्यांनी सकाळ ह्या वृत्तपत्रास दिलेल्या एका मुलाखतीत म्हणले होते. रजनीकांत ह्यांना सत्यनारायण राव गायकवाड आणि नागेश्वर राव गायकवाड हे दोन मोठे भाऊ आणि एक अश्विनी बाळुबाई गायकवाड नावाची एक बहिण ही आहे. रजनीकांत ह्यांच्या सहचारिणी लता रंगाचारी ह्या असून त्यांना ऐश्वर्या शिवाजीराव गायकवाड ऊर्फ ऐश्वर्या रजनीकांत आणि सखुबाई शिवाजीराव गायकवाड ऊर्फ सौंदर्या रजनीकांत ह्या दोन मुली आहेत.[][]

पार्श्वभूमी

संपादन

शाळेत असतांना दारिद्र्यामुळे त्यांना खूप कठिण परिस्थितीत दिवस काढावे लागले. बंगळूर येथील आचार्य पाठशाळा ह्या शाळेत त्यांचे शालेय शिक्षण झाले आणि रामकृष्ण मिशनच्या बंगळूरमधील महाविद्यालयात त्यांचे उच्चशिक्षण पूर्ण झाले.१९६८-१९७३ दरम्यान रजनीकांत मद्रास आणि बंगळूर मध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळी कामे केली. त्यानंतर ते बंगळूर बस ट्रान्स्पोर्ट सर्व्हिसमध्ये कंडक्टर (वाहक) म्हणून नियुक्त झाले. कंडक्टर असताना त्यांची तोंडाने शिट्टी वाजविण्याची कला लोकप्रिय झाली होती. नंतर चित्रपटात काम करण्याच्या इच्छेमुळे एका मित्राच्या मदतीने ते चेन्नईला चित्रपटातील अभिनय शिकण्याकरीता गेले. मद्रास फिल्म इंस्टिट्यूटमध्ये अभिनयाचा अभ्यासक्रम पूर्ण करून त्यांनी आपल्या अभिनयाची कारकीर्द १९७४-७५ मध्ये सुरू केली.

अभिनय कारकीर्द

संपादन

सह अभिनेता : १९७५-१९७७

संपादन

प्रमुख भूमिकेत : १९७८-१९८९

संपादन

कारकिर्दीचे शिखर : १९८९-१९९९

संपादन

बाबा : २००२

संपादन

गौरव, पुरस्कार आणि सन्मान

संपादन
  • २००० मध्ये भारत शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या पद्मभूषण ह्या नागरी गौरवाचे मानकरी.
  • जर्मनीतील सर्वोच्च नागरी सन्मान/पुरस्कार द फ्युरिअरने सन्मानित.
  • जपानचा एमटीव्ही सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार, जागतिक चित्रपटातील योगदानाबद्दल.
  • टाईम्स मॅगझीनने रजनीकांत ह्यांना जगातील सर्वात प्रभावी १०० व्यक्तींच्या यादीत स्थान दिले आहे.
  • आशिया खंडातील चित्रपट उद्योगात जॅकी चॅननंतरचे सर्वात अधिक मानधन मिळविणारे कलाकार.
  • आंतरराष्ट्रीय चित्रपट जगतात सर्वाधिक प्रसिद्धीबद्दल गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड्‌समध्ये नोंद.(सर्वाधिक जागतिक चाहते असणारा कलाकार.)
  • ६ वेळा (सर्वोत्कृष्ट अभिनेता) तमिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार विजेता तसेच अनेकदा नामांकन.
  • ९ वेळा (सर्वोत्कृष्ट अभिनेता) सिनेमा एक्सप्रेस चित्रपट पुरस्कार विजेता तसेच अनेकदा नामांकन.
  • १० वेळा फिल्मफेर सर्वोत्कृष्ट अभिनेता तसेच लेखक, निर्माता,सहकलाकार, अशा अनेक भूमिकांबद्दल अनेक नामांकन आणि पुरस्कार.
  • महाराष्ट्र शासनाचा २००७चा सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार (राज कपूर पुरस्कार) विजेता.
  • १९९५मध्ये आध्यात्मिकतेकरिता "ओशोबिस्मित" पुरस्काराने सन्मानiत.
  • भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोत्तम कामगिरीचा शेव्हलियर शिवाजी गणेशन पुरस्कार विजेता.
  • २०१६ पद्मविभूषण पुरस्कार[]
  • दादासाहेब फाळके पुरस्कार

परोपकार/लोककल्याण

संपादन

रजनीकांत यांनी वेळोवेळी तमीळ लोकांकरिता आणि लोकाधिकारांकरिता उपोषणे केली आहेत. शासनावर दबाव टाकण्याकरिता त्यांनी नेहमीच समाजघटकांना मदत केली आहे. रजनीकांत त्यांच्या दानशूरतेसाठीही ओळखले जातात.

राजकारण

संपादन

३१ डिसेंबर २०१७ रोजी चेन्नैमधील श्रीराघवेन्द्र मण्डपम् ह्या ठिकाणी रजनीकांत ह्यांनी एका भव्य सभेमध्ये पत्रकार आणि रसिकांसमक्ष आपण सक्रिय राजकारणात प्रवेश करत असल्याचे, तसेच २०१८ मध्ये आपण रीतसर पक्षस्थापना करणार असून संपूर्ण तमिळनाडू राज्यातील येत्या निवडणूका लढविणार असल्याचे अधिकृतरित्या घोषित केले.रजनीकांत यांनी 12 जुलै 2021 रोजी त्यांचा पक्ष रजनी मक्कल मंद्रम (RMM) विसर्जित केला आणि भविष्यात राजकारणात प्रवेश करण्याची त्यांची कोणतीही योजना नाही असेही सांगितले.

उल्लेखनीय चित्रपट

संपादन
वर्ष नाव व्यक्तिरेखा भाषा नोंदी
1975 अपूर्व रागंगळ आभास्वरम् तमिळ
1976 मून्ड्र मुडिचु तमिळ
1977 १६ वयत्तिनिले परट्टै तमिळ
भुवन ओरु केळ्विकुरि अरविंद तमिळ
1978 मुळ्ळुम मलरुम काली तमिळ
1979 निनैतले इनिक्कुम तमिळ
आरिलिरुन्दु अरुबदु वरै संदनम् तमिळ
1980 बिल्ला (१९८०) बिल्ला,
राजा
तमिळ
मुरट्टु कालै (१९८०) कालैयन् तमिळ
1981 तिल्लु मुल्लु इंद्रन्/
चंद्रन
तमिळ
1982 मून्ड्र मुगम अलेक्स पांडियन,
अरुण,
जॉन
तमिळ विजेता:उत्कृष्ट अभिनेता तामिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार
1984 नल्लवनुक्क नल्लवन मणिकम् तमिळ विजेता:उत्कृष्ट अभिनेता तामिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार
1985 श्री राघवेंद्र वेंकटनाद
/ राघवेंद्र स्वामी
तमिळ
1991 तलपती सुर्या तमिळ
1992 अण्णामालै (चित्रपट) अण्णामालै तमिळ
1993 येजमान वानवरायन/येजमान तमिळ
1995 बाद्षा मणिकम् तमिळ
मुत्तु (चित्रपट) मुत्तु,
येजमान
तमिळ विजेता:उत्कृष्ट अभिनेता तामिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार
Nominated: [[फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेता (तमिळ)|Filmfare Best तमिळ Actor Award]]
1997 अरुणाचलम अरुणाचलम,
वेदाचलम
तमिळ
1999 पडयप्पा आरुपडय्यपम तमिळ विजेता:उत्कृष्ट अभिनेता तामिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार
2005 चंद्रमुखी डॉ. सर्वणन,
किंग वेट्टैयन
तमिळ विजेता:उत्कृष्ट अभिनेता तामिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार
2007 शिवाजी द बॉस शिवाजी अरुमुगम तमिळ विजेता:उत्कृष्ट अभिनेता तामिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार
Nominated: [[फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेता (तमिळ)|Filmfare Best तमिळ Actor Award]]
2010 एंदिरन वसीगरन,
चित्ती
तमिळ

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ Ramachandran, Naman (2012). Rajinikanth: The Definitive Biography. Penguin Books|Penguin Books Limited. p. 244. ISBN 978-81-8475-796-5.
  2. ^ "'थलाइवा' रजनीकांत की राजनीति में एंट्री, कुछ ऐसा रहा है अब तक का सफर". ५ मार्च २०२१ रोजी पाहिले.
  3. ^ "चित्रपटसृष्टीचा बॉस". ५ मार्च २०२१ रोजी पाहिले.
  4. ^ पद्मविभूषण पुरस्कार (२०१६).