लक्ष्मीनिवास मित्तल

लक्ष्मीनिवास मित्तल ऊर्फ लक्ष्मी मित्तल (जून १५, इ.स. १९५० - ) हा लंडन येथील उद्योजक व सर्वांत श्रीमंत अनिवासी भारतीय आहे.

लक्ष्मीनिवास मित्तल
जन्म लक्ष्मीनिवास मित्तल
१५ जून, इ.स. १९५०
सादुलपूर, राजस्थान
निवासस्थान लंडन, युनायटेड किंग्डम
राष्ट्रीयत्व भारतीय
वांशिकत्व मारवाडी
नागरिकत्व भारतीय
धर्म हिंदू
अपत्ये वनिशा, आदित्य
वडील नारायण मित्तल
पुरस्कार पद्मभूषण(२००७)
संकेतस्थळ
http://www.arcelormittal.com/stainlesseurope/node/558

पोलाद उद्योग

संपादन

सुरुवातीच्या काळात लक्ष्मी मित्तलांच्या वडिलांची भागीदारी असलेल्या 'ब्रिटिश इंडिया रोलिंग मिल्स' या लोखंडाच्या रसापासून पट्ट्या, कांबी व सळ्या तयार करण्याच्या कारखान्यात लक्ष्मी मित्तल सुट्टीच्या वेळी काम करत असत.

लोखंडाच्या कारखान्यासाठी परवाने मिळवणे अवघड असल्याने लक्ष्मी मित्तलांच्या वडील आणि चुलत्यांनी मिळून जुने डबघाईला आलेले कारखाने सुरुवातीला ताब्यात घेण्याचे धोरण राबवले. इ.स. १९६३ साली मित्तलांच्या वडिलांना आंध्र प्रदेशात लोखंडाचे उत्पादन करणारा कारखाना काढण्याचा परवाना मिळाला. त्या कारखान्याला त्यांनी मित्तल इस्पात असे नाव दिले. मित्तल कुटुंबाचा तो पहिला उत्पादन प्रकल्प ठरला.

इंडोनेशियातील पूर्व जावा बेटात लोखंडाचे उत्पादन करण्याचा कारखाना काढण्याची तेथील सरकारची निविदा बघून मित्तलांच्या वडिलांनी तेथे जाऊन जागा विकत घेतली. परंतु पुढे तेथील शासनाने जाचक अटी लादल्या व वेळकाढूपणाचे धोरण अवलंबले. वीज पुरवठ्याची व्यवस्था करायलाही तिथले सरकार तयार नव्हते. या सर्व कारणांमुळे लोखंडाचा कारखाना उभारण्यासाठी घेतलेली जमीन विकण्याचा निर्णय मित्तलांच्या वडिलांनी घेतला व ही घेतलेली जमीन विकून टाकण्यासाठी त्यांनी लक्ष्मीनिवास मित्तल यांना जावाला पाठविले.