यामिनी कृष्णमूर्ती

भारतीय नर्तकी
(यामीनी कृष्णामुर्ती या पानावरून पुनर्निर्देशित)
Yamini Krishnamurthy (it); যামিনী কৃষ্ণমূর্তি (bn); Yamini Krishnamurthy (fr); યામીની કૃષ્ણમૂર્તિ (gu); Yamini Krishnamurthy (ast); Yamini Krishnamurthy (ca); यामिनी कृष्णमूर्ती (mr); యామిని కృష్ణమూర్తి (de); ଯାମିନୀ କୃଷ୍ଣମୂର୍ତ୍ତି (or); Yamini Krishnamurthy (ga); Yamini Krishnamurthy (sq); ᱭᱟᱢᱤᱱᱤ ᱠᱨᱤᱥᱱᱟᱢᱩᱨᱛᱤ (sat); یامنی کرشنامورتی (pnb); যামিনী কৃষ্ণমূৰ্তি (as); Yamini Krishnamurthy (id); యామినీ కృష్ణమూర్తి (te); يامينى كريشنامورثى (arz); Yamini Krishnamurthy (pl); യാമിനി കൃഷ്‌ണമൂർത്തി (ml); Yamini Krishnamurthy (nl); यामिनी कृष्णमूर्तिः (sa); यमनी कृष्णमूर्ति (hi); ಯಾಮಿನಿ ಕೃಷ್ಣಮೂರ್ತಿ (kn); ਯਾਮਿਨੀ ਕ੍ਰਿਸ਼ਨਾਮੂਰਤੀ (pa); Yamini Krishnamurthy (en); Yamini Krishnamurthy (es); यामिनी कृष्णमूर्ति (gom); யாமினி கிருஷ்ணமூர்த்தி (ta) danzatrice indiana (it); ভারতীয় নৃত্যশিল্পী (bn); danseuse indienne (fr); ભારતીય નર્તકી (gu); راقصه من دومينيون الهند (arz); tancerka (pl); baillarina india (ast); bailarina india (es); भारतीय नर्तक (hi); తెలుగు నాట్యకారిణి (te); ଭାରତୀୟ ନର୍ତ୍ତକୀ (or); damhsóir Indiach (ga); भारतीय नर्तकी (mr); Indian dancer (1940–2024) (en); பரதநாட்டிய, குச்சிப்புடி நடனக் கலைஞர் (ta) यामिनी कृष्णमूर्ति (sa); नृत्य के कुचिपुडी रूप के मशाल भालू ", यामिनी कृष्णमूर्ति, Yamini Krishnamurti (hi); ಯಾಮಿನಿ ಕೄಷ್ಣಮೂರ್ತಿ (kn); କୁଚିପୁଡ଼ି ନୃତ୍ୟର ପଥପ୍ରଦର୍ଶକ (or); torch bearer" of Kuchipudi form of dance, Mungara Yamini Krishnamurthy (en); કુચિપૂડી નૃત્યના મશાલવાહક (gu); Mungara Yamini Krishnamurthy (id); মুঙ্গারা যামিনী কৃষ্ণমূর্তি (bn)

यामिनी कृष्णमूर्ती (२० डिसेंबर, १९४० - ३ ऑगस्ट, २०२४) या भारतीय नर्तकी होत्या. यांचा जन्म मद्रास येथे झाला. अड्यार येथील 'कलाक्षेत्र' ह्या संस्थेची भरतनाट्यम नृत्यशैलीतील पदविका होत्या. नृत्याच्या पुढील शिक्षणासाठी त्यांना सरकारी शिष्यवृत्ती मिळाली. त्यांनी एल्लप्पा पिळ्ळै ह्यांच्याकडे भरतनाट्यमचे शिक्षण घेतले. तसेच कूचिपूडी आणि ओडिसी नृत्याचे शिक्षण हे वेदांतम लक्ष्मीनारायण शास्त्री व वेणुगोपाल कृष्ण शर्मा ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पंकज चरण दास ह्यांच्याकडे घेतले. त्यांनी दिल्ली येथे 'कौस्तुभ' ह्या नृत्यशाळेची इ.स. १९५९ मध्ये स्थापना केली. 'संगीत भारती' ह्या संस्थेत त्यांनी भरतनाट्यम्‌चे अध्यापन केले. तसेच विविध प्रकारचे नृत्यप्रयोगही वेळोवेळी सादर केले. भरतनाट्यम, कुचिपुडी व ओडिसी ह्या नृत्यप्रकारांमध्ये त्यांचे विशेष प्रभुत्व होते.

यामिनी कृष्णमूर्ती 
भारतीय नर्तकी
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखडिसेंबर २०, इ.स. १९४०
Madanapalle (ब्रिटिश राज, मद्रास प्रांत)
मृत्यू तारीखऑगस्ट ३, इ.स. २०२४ (८४)
नवी दिल्ली
नागरिकत्व
व्यवसाय
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

क्षीरसागर मंथनम ह्या कुचिपुडी नृत्य नाट्यात त्यांनी विश्वमोहिनीची प्रमुख भूमिका केली व त्या भूमिकेद्वारे त्यांनी कुचिपुडी नृत्यनाट्यातील पहिली नर्तकी असा लौकिक मिळवला. तोपर्यंत ह्या पारंपारिक नृत्यात फक्त पुरुषच भाग घेत असत. त्यांच्या नृत्याविष्कारातून भावनावेग, गती, लय, चैतन्य व मोहकता ह्यांचा मनोज्ञ प्रत्यय येतो. १९६५ च्या राष्ट्रकुल कला-समारोहात त्यांनी नृत्य सादर केले होते. 'पद्मश्री' हा किताब त्यांना १९६७ मध्ये मिळाला. भारतातील प्रमुख शहरांत तसेच ब्रह्मदेश, नेपाळ आणि ऑस्ट्रेलिया येथेही त्यांच्या नृत्याचे कार्यक्रम झाले आहेत.