श्री प्रकाश (३ ऑगस्ट, इ.स. १८९०:वाराणसी, उत्तर प्रदेश, भारत - २३ जून, इ.स. १९७१) हे महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल होते. इ.स. १९५६ ते इ.स. १९६२ हे ६ वर्ष त्यांनी हे पद उपभोगले. याशिवाय श्री प्रकाश भारताचे पाकिस्तानातील सर्वप्रथम हाय कमिशनर (१९४७-१९४९), आसामचे राज्यपाल (१९४९-५०), मद्रासचे गव्हर्नर (१९५२-१९६६) आणि बॉम्बे राज्याचे गव्हर्नर (१९५६-१९६०) या पदी होते.