मंगलमपल्ली बालामुरलीकृष्णा (तेलुगू: మంగళంపల్లి బాలమురళీకృష్ణ ; रोमन लिपी: Mangalampalli Balamuralikrishna), अर्थात डॉ. एम. बालमुरलीकृष्ण, (जन्म : शंकरगुप्तम-आंध्र प्रदेश, जुलै ६, इ.स. १९३०; मृत्यू : चेन्नई, नोव्हेंबर २२, इ.स. २०१६) हे कर्नाटक संगीतातील तेलुगू गायक, पार्श्वगायक, संगीतकार व बहुवाद्य-वादक होते. ते शास्त्रीय गायनाबरोबर वीणावादन, व्हायोलिनवादन, बासरीवादन आणि मृदुंगवादनात निपुण होते. त्यांनी जगभरात संगीताच्या २५ हजार मैफली गाजवल्या आहेत. आाकाशवाणी-दूरदर्शनवरील 'मिले सुर मेरा तुम्हारा' या गीतामुळे त्यांना अफाट प्रसिद्धी मिळाली.

मंगलमपल्ली बालामुरलीकृष्णा
Mangalampalli Balamuralikrishna.jpg
एम. बालामुरलीकृष्ण
आयुष्य
जन्म ६ जुलै १९३०
जन्म स्थान शंकरगुप्तम, पूर्व गोदावरी जिल्हा, आंध्र प्रदेश
मृत्यू २२ नोव्हेंबर २०१६
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
वांशिकत्व तेलुगू
नागरिकत्व भारतीय
मूळ_गाव शंकरगुप्तम, पूर्व गोदावरी जिल्हा, आंध्र प्रदेश
देश भारत
भाषा तेलुगू
संगीत साधना
गुरू श्री. पंतलु
गायन प्रकार कर्नाटक संगीत
संगीत कारकीर्द
पेशा गायक
कारकिर्दीचा काळ इ.स. १९३८ - चालू
गौरव
पुरस्कार पद्मश्री पुरस्कार (इ.स. १९७१),
पद्मविभूषण पुरस्कार (इ.स. १९९१),
संगीत नाटक अकादमी पुरस्कार (इ.स. १९७५)

बालमुरलीकृष्ण यांच्या जन्मानंतर लगेचच त्यांच्या आईचे निधन झाले; पण वडलांची जपणूक आणि गुरूचे सान्निध्य यामुळे त्यांचे बालपण संगीताने उजळून निघाले. शास्त्रीय संगीताचा त्यांचा पहिला जाहीर कार्यक्रम ते आठ वर्षाचे असताना झाला.

चित्रपटसृष्टीतील कामगिरीसंपादन करा

अन्य शास्त्रीय संगीत गायकांपेक्षा त्यांचे एक वेगळे वैशिष्ट्य म्हणजे बालमुरली कृष्ण यांनी कित्येक चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. ४००हून अधिक चित्रपटांचे त्यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे.

जुगलबंदीचे कार्यक्रमसंपादन करा

कर्नाटक संगीत गायक आणि हिंदुस्तानी संगीत गाणारे गायक यांव्यांत साधारणपणे जुगलबंदी होत नाही; पण बालमुरलीकृष्णांची खास गोष्ट अशी की त्यांनी भीमसेन जोशी, पं. हरिप्रसाद चौरासिया, किशोरी अमोणकर आदि संगीत कलावंतांबरोबर एकाच रंगमंचावर संमिश्र गायनाचे कार्यक्रम केले आहेत.

नवीन रागांची निर्मितीसंपादन करा

डॉ. एम बालमुरली कृष्ण यांनी गणपति, सर्वश्री, महती, लवंगी यांसह संगीतात काही नवे राग निर्माण केले. सिद्धि, सुमुखम् आदी काही रागांमध्ये त्यांनी तीन आणि चार तालांचे प्रयोग केले.

बालमुरलीकृष्ण यांना मिळालेले पुरस्कारसंपादन करा

चित्रदालनसंपादन कराकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.