मल्लिकार्जुन मन्सूर
मल्लिकार्जुन मन्सूर (कन्नड: ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಮನಸೂರ ;) (जानेवारी १, इ.स. १९११ - सप्टेंबर १२, इ.स. १९९२) हे हिंदुस्तानी संगीतातले प्रसिद्ध गायक होते. ते हिंदुस्तानी संगीतातील जयपूर-अत्रौली परंपरेतले गायक होते.
भारतीय गायक | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
स्थानिक भाषेतील नाव | Mallikarjun Mansur | ||
---|---|---|---|
जन्म तारीख | डिसेंबर ३१, इ.स. १९१० Mansur, Dharwad | ||
मृत्यू तारीख | सप्टेंबर १२, इ.स. १९९२ धारवाड | ||
कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||
नागरिकत्व |
| ||
व्यवसाय |
| ||
पुरस्कार |
| ||
| |||
जीवन
संपादनमन्सुरांचा जन्म जनवरि १, इ.स. १९१० रोजी कर्नाटकातील धारवाड येथे झाला. त्यांचे सुरुवातीचे संगीतशिक्षण कर्नाटक संगीतात अप्पय्या स्वामी व हिंदुस्तानी संगीतात मिरजेतील ग्वाल्हेर घराण्याचे गायक नीलकंठबुवा अलूरमठ यांच्याकडे झाले. परंतु त्यांच्या गायकीवर त्यांचे गुरू व अल्लादिया खान साहेबांचे सुपुत्र मंजी खान व भूर्जी खान यांचा सर्वाधिक प्रभाव होता.
सप्टेंबर १२, इ.स. १९९२ रोजी मन्सुरांचे निधन झाले.
सांगीतिक कारकीर्द
संपादनबरेच अप्रचलित राग, जसे शुद्ध नट, आसा जोगिया, हेमनट, लच्छसख, खट, शिवमत भैरव, बिहारी, संपूर्ण मालकंस, लाजवंती, आडंबरी केदार आणि बहादुरी तोडी, अशा अनेक संगीत रागांवर असलेल्या प्रभुत्वासाठी मन्सूर विख्यात होते.
धारवाड येथील मृत्युंजय या त्यांच्या निवासस्थानाचे आता स्मारक संग्रहालयात रूपांतर करण्यात आले आहे.
खासगी जीवन
संपादनमल्लिकार्जुन मन्सुरांचा विवाह गंगम्मांशी झाला होता. त्यांना सात कन्या व एक पुत्र, राजशेखर मन्सूर अशी संतती झाली. पं. मन्सुरांच्या मुलांपैकी त्यांचे पुत्र राजशेखर मन्सूर व कन्या नीला कोदली हे गायक आहेत.
प्रकाशित साहित्य
संपादनमन्सूरांनी कन्नड भाषेत नन्न रसयात्रे नावाचे आत्मचरित्र लिहिले. त्यांचे पुत्र राजशेखर मन्सूर यांनी या आत्मचरित्राचा माय जर्नी इन म्युझिक नावाने इंग्लिश भाषेत अनुवाद केला आहे.
पुरस्कार
संपादन- पद्मश्री पुरस्कार (इ.स. १९७०)
- पद्मविभूषण पुरस्कार (इ.स. १९७६).
बाह्य दुवे
संपादन- ऑलम्यूझिक.कॉम - मल्लिकार्जुन मन्सूर (इंग्लिश मजकूर)