बिरजू महाराज
पंडित बिरजू महाराज म्हणून ओळखले जाणारे ब्रिजमोहन मिश्रा, (जन्म ४ फेब्रुवारी १९३८), हे कथक नृत्याच्या अलाहाबादच्या कालका-बिंदादिन घराण्याचे निपुण नर्तक आहेत.[१] ते कथक नर्तकांच्या महाराज घराण्यातील वंशज आहेत, ज्यात त्यांचे दोन काका शंभू महाराज आणि लच्छू महाराज आणि त्यांचे वडील आणि गुरु, अचन महाराज यांचा समावेश आहे. नृत्य हे त्याचे पहिले प्रेम असले तरी ते हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा अभ्यास करतात आणि एक गायक पण आहेत.
कथक नर्तक | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
जन्म तारीख | फेब्रुवारी ४, इ.स. १९३८ लखनौ | ||
---|---|---|---|
कार्य कालावधी (प्रारंभ) | इ.स. १९५१ | ||
नागरिकत्व |
| ||
व्यवसाय |
| ||
पुरस्कार |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
![]() |
वयाच्या १३ व्या वर्षापासून त्यांनी दिल्लीतील संगीत भारती या संस्थेत अध्यापनास सुरुवात केली.भारतीय कला केंद्र, संगीत नाटक अकादमीचे कत्थक केंद्र या ठिकाणी ते शिकवत असत. निवृत्तीनंतर त्यांनी 'कलाश्रम' ही नृत्य/नाट्य संस्था सुरु केली .
शतरंज के खिलाडी, देवदास, उमराव जान, बाजीराव मस्तानी इत्यादी चित्रपटात नृत्य दिग्दर्शन त्यांनी केले आहे.
संदर्भसंपादन करा
- ^ "जानें- कत्थक सम्राट बिरजू महाराज के बारें में ये खास बातें." ४ फेब्रुवारी २०१८.